Navi-Umed

Slide Slide Slide Slide चांगलं घडवू, शेअर करू!

नवी उमेद

समाजमाध्यमांमध्ये चालणारं तू-तू-मैं-मैं टाळून समाजात घडणाऱ्या चांगल्या घटना लोकांपर्यंत पोचवणारा मंच, नवी उमेद.

आपल्या नजरेला बर्‍याचदा वाईटच पटकन दिसतं. कमतरताच लक्षात येतात. पण, नवी उमेद शोधून, निवडून चांगल्या सकारात्मक गोष्टी, आणि चांगली कामं घडवणारी माणसं लोकांसमोर आणण्याचं काम करतं. महाराष्ट्रकेंद्री असणं ही २०१६ मध्ये सुरू झालेल्या नवी उमेदची ओळख. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या, छोट्यातल्या छोट्या गावातल्या गोष्टी इथे वाचायला मिळतात. सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टी सांगणारा हा मंच, नवी उमेद. चांगलं काही घडू शकतं, घडवता येतं याबद्दल लोकांचा विश्वास वाढवणारा, मनामनात उमेद जागवणारा मंच.

Navi Umed, the social media platform created by Sampark in the year 2016, brings the neglected change-makers from the small towns and villages of Maharashtra into the mainstream. Navi Umed finds and promotes extraordinary activities being done by otherwise ordinary people. Against the trolling and negativity that are commonly seen on social media, Navi Umed’s stories offer a ray of hope that good deeds are still being done in our society. Read more about our mission

॥ गोड साखरेची कडू गोष्ट ॥भाग – 5- गुणवत्ता आहे, हवे दिशादर्शन- अनंत वैद्य''आई आणि बापूंचं उभं आयुष्य माझ्यासाठी कष्ट करण्यात गेलं आहे. तेव्हा मी कुठे इथपर्यंत पोहोचलो. माझं सर्व यश आई-वडीलांच्या कष्टाचं चीज आहे,'' नुकताच निकाल जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेत एनटीडी प्रवर्गातून राज्यात प्रथम आलेला संतोष आजिनाथ खाडे सांगत होता. सावरगाव (जि.बीड) येथील ऊसतोड कामगार कुटुंबातील संतोषनं पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवत अभ्यास केला. ग्रामस्थ, नातेवाईकांनी सहकार्य केलं. यातून त्याने हे नेत्रदीपक यश मिळवले. बीड जिल्ह्यातीलच आणखी एका ऊसतोडी केलेल्या युवकानेही यंदाच्या एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. त्याचं नाव नागेश राम लाड. चिखली गावातील स्वतः ऊसतोड मजुरी केलेला नागेश सांगतो, "बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून मी गेली अनेक वर्ष एमपीएससीमध्ये तयारी करत होतो. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये बऱ्याच अडचणी आल्या आणि मला अडचणीचा सामना करावा लागला. मला मिळालेल्या यशाचे श्रेय मी माझ्या ऊसतोड कामगार कुटुंबाला देतो. त्यांच्या कष्टाची जाणीव मला स्वस्थ बसू देत नव्हती."संतोष आणि नागेश यांच्याप्रमाणेच अनेक ऊसतोड कामगार पाल्यांनी एमपीएससीचं नव्हे तर विविध क्षेत्रात यश मिळवलेले आहे. योग्य वयात आलेली समज आणि मिळालेले मार्गदर्शन यातून हे विद्यार्थी घडले. परंतु, ८० टक्क्यांहून अधिक ऊसतोड कामगार पाल्य हे पालकांच्या उसतोडणीच्या कामातच गुंततात व पुढे याच कामात वाहून घेतात. या व्यवसायात सुरक्षिततेची हमी नसल्याने आणि कामाचा पुरेसा मोबदला न मिळाल्याने बहुतांश जणांना आयुष्य विवंचनेत घालवावे लागते. वास्तविक कुठल्याही मजुराला त्याची मुलं या वेठबिगारीच्या व्यवसायात येऊ नयेत, असंच वाटत असतं. शासन सुविधा देण्यात कमी पडल्याने त्यांचा नाईलाज होतो. नाथापूर (ता.बीड) येथील सुदाम काळे हे ४८ वर्षांचे मजूर सांगतात, ''मी दरवर्षी कारखान्यावर जातो. दहा वर्षांपासून माझी मुलेही जातात. त्यांना शिकवायचे होते. पण आर्थिक अडचणी आणि सुविधा नसल्याने दोघांनाही कारखान्यावर न्यावे लागले. आज त्यांच्याही हाती कोयता कायमचा आलेला आहे. शाळा, शिक्षण झाले असते तर फायदा झाला असता.''शासनाने मध्यंतरी ऊसतोड कामगार संख्या अधिक असलेल्या तालुक्यांच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याचे निश्चित केलेले होते. घोषणेला दोन वर्षे लोटली. तरी एकही वसतिगृह उभे नाही. शिवाय शासनाने जाहीर केलेल्या वसतिगृहाच्या ठिकाणी केवळ शंभर मुलांची व्यवस्था होऊ शकते. ज्या तालुक्यात पाच हजारांच्या पुढे ऊसतोड कामगार आहेत तिथे शंभर संख्या असलेले वसतिगृह कसे पुरेसे ठरेल. त्यामुळे नागरी उत्थानाचा विचार करताना शासनाने व्यापक अशी योजना राबवत उसतोडणी मजुरांच्या मुलांची शाळागळती थांबवायला हवी. अनेक अशासकीय संस्था, कंपन्याही या कामी मदतीचा हात देऊ शकतात. मात्र, त्यासाठी हवी ती इच्छाशक्ती. सुरक्षित निवारा आणि दोन वेळचे पुरेसे जेवण शासन देऊ शकले तर वर्षाकाठी शाळाबाह्य होणाऱ्या हजारो मुलांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते, यात शंका नाही. ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता सुटण्यासाठी त्यांची मुलं शिक्षण प्रवाहात राहणे अत्यंत गरजेचे आहे. (मालिका समाप्त )#नवीउमेद #बीड #ऊसतोड #ऊसतोडणी_कामगार #स्थलांतर #शिक्षण #मुले #शासन_मदत नवी उमेदची टीम दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली सकारात्मक कामं, घटना, व्यक्ती तुमच्यापर्यंत आणत असते. या कामाला खर्च येतो. त्यातला काही वाटा वाचक म्हणून तुम्ही उचलावा, ही विनंती. त्यासाठी ही लिंक:https://naviumed.org/support/अकाऊंट डिटेल्सःSampark account detailsName: SAMPARKAccount No: 50100547410322Account Type: SavingsBranch Name: HDFC Bank, Goregaon EastIFSC Code: HDFC0000212सोबतच नवी उमेदविषयी तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा ... See MoreSee Less
View on Facebook

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरसुद्धा  चांगलं पोटभर खायला मिळतं म्हणून शाळेत येणाऱ्यांची संख्या आजही लक्षणीय आहे.  विद्यार्थ्यांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या या योजनेचं नाव आहे - शालेय पोषण आहार योजना.
@SnehalBansode @lokmat
#पोषण #आहार
लेखाची लिंक :
https://www-lokmat-com.cdn.ampproject.org/v/s/www.lokmat.com/editorial/do-children-come-to-school-because-they-get-khichdi-so-yes-a-a309/amp/?usqp=mq331AQIUAKwASCAAgM%3D&amp_js_v=a9&amp_gsa=1#referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&csi=0&ampshare=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Feditorial%2Fdo-children-come-to-school-because-they-get-khichdi-so-yes-a-a309%2F

Load More...

Causes

Technology

Read more

तंत्रज्ञान

Child Rights

Read more

बालहक्क

Environent

Read more

पर्यावरण

Women Empowerment

Read more

महिला सबलीकरण

Agriculture

Read more

शेती

Drought

Read more 

दुष्काळ

MENSTRUAL HYGIENE

Read more 

मेन्स्ट्रुअल हायजिन

Districts

News

333

जलपरिषदेमुळे सुटतोय पाणीप्रश्न

नाशिक जिल्ह्यातले पेठ, सुरगाणा,इगतपुरी,त्र्यंबकेश्वर,दिंडोरी तालुके. या तालुक्यामधल्या आदिवासी भागात उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नाची तीव्रता यंदा कमी भासेल, अशी आशा आहे. जलपरिषदेनं अवघ्या दोन महिन्यात २०५ बंधारे श्रमदानातून बांधले आहेत.

३८ दिवसात १३२ बाधितांना पैसे न घेता सेवा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतल्या या आठवणींनी अक्षय अस्वस्थ होतो पण त्याच वेळी बरे झालेल्यांच्या नातलगांच्या शुभेच्छा आठवून त्याला समाधानही वाटतं. अक्षय नारळे नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरचा. तो रुग्णवाहिका चालवतो.

हॉकीचं ग्राऊंड गाजवणारी भावना

हिंगोली जिल्ह्यातलं छोटंसं गाव, सेनगाव. इथं राहणारी भावना सतिशराव खाडे. भावनाला लहानपणापासून खेळाची आवड. हे लक्षात आलं तिच्या आजी सरोजिनीताई खाडे यांच्या. त्यांनी तिला क्रीडा क्षेत्रात पाठवायचं ठरवलं. भावनाने पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीची परीक्षा सहजच उत्तीर्ण केली.

Youtube

आपल्या अवतीभवती चांगलं घडतंय, लोक काही नवं घडवतायत, एनजीओ समस्यानिवारणात पुढाकार घेतायत, सरकारी व्यवस्था नोंद घेण्याजोगं काम करतेय, आपले लोकप्रतिनिधी आपल्याला मदत करतायत आणि यासारख्या अनेक सकारात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठीं आमच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या. इथले व्हिडीओ पाहून नवी उमेद जागेल, वाढेल. उमेद असली की पुन्हा चांगलं काही घडवायला, शेअर करायला हुरूप येईल.

More Articles

7-1

चला, ‘जांभूळबेट’ बघायला

जिल्हा परभणी. इथल्या पालम आणि पूर्णा तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीत मध्यभागी अद्भुत आणि नयनरम्य असं जांभूळबेट आहे. बेटावर जायचं तर होडी गरजेचीच.

महिला सुरक्षेसाठी अंकिताने तयार केला सूट

वरवर पाहता हा नेहमीसारखाच कोट, जॅकेट वाटते. पण त्याला जोड आहे, तंत्रज्ञानाची ! त्यामुळे हा सूट घातलेली महिला सुरक्षित राहू शकते. हा सूट तयार केला आहे अंकिता रोटे या मुलीनं.
अंकिता सोलापूरमधल्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातली. सध्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षात शिकत आहे.

संवादाचा मास्क

गेल्या वर्षभरापासून बाहेर जाताना नाका-तोंडाला मास्क लावलाच पाहिजे, हे आपल्या सर्वांना कळलं आहेच. पण मास्कच्या वापरामुळं आपल्या सभोवतालच्या काही व्यक्तींना संवाद साधण्यात, समजून घेण्यात अडचणी येत आहेत. कर्ण आणि मूकबधीर व्यक्ती समोरच्याचं बोलणं समजून घेण्याकरता ओठांच्या हालचाली वाचत असतात. पण मास्कमुळे या संवादात अडथळे येतात.

वनसंवर्धनात महिला आणि शाळकरी मुलांचा सहभाग वाढविणाऱ्या भारतीताई

अत्यंत आखीव रेखीव, स्वच्छ अश्या हिरवळीने नटलेल्या बंधारपाड्याच्या रोपवाटिकेची जबाबदारी भारती सयाईस यांच्या खांद्यावर आहे. या रोपवाटिकेत उभारण्यात आलेले रोपवन हे भारतीताईंच्या कामाची चुणूक दाखवते. महिलांना आणि मुलांना निसर्ग सर्वधानांची गोडी निर्माण झाली पाहिजे या हेतूने भारती ताई यांनी तयार केलेलं रोपवन राज्यात आदर्श म्हणावं लागेल.

More Articles

पढेंगे लिखेंगे तो बनेंगे नवाब, खेलेंगे कुंदेंगे तो बनेंगे कामयाब!

‘पढेंगे लिखेंगे तो बनेंगे नवाब, खेलेंगे कुंदेंगे तो बनेंगे खराब!‘ अशी हिंदीमध्ये एक प्रचलित म्हण आहे. यावर बऱ्याच पालकांचा कळत नकळत विश्वास असतो. त्यामुळेच खेळात मुलांचा वेळ वाया जातो असं मानणारे पालक आपल्या आसपास पाहायला मिळतात. मग ‘खेळ’ ही व्यक्तिमत्व विकास आणि स्त्री सक्षमीकरणाची पहिली पायरी मानणे म्हणजे ‘मृगजळामागे धावणे’च नाही का? हा समज खोडून काढला तो माया पवार या शिक्षिकेने. कसा? वाचा तर मग.

ज्या शाळेत कुंभार सर, तिथला सूचनाफलक होतो विद्यार्थीप्रिय

प्रत्येक शाळेमध्ये एक सूचना फलक असतो.  तिथे विद्यार्थ्यांना सूचना देणार्‍या कागदांची गर्दी असते, मात्र डॉ. सुधीर कुंभार ज्या शाळेत शिक्षक म्हणून येतात, त्या शाळेतील सूचना फलक वाचायला विद्यार्थ्यांची गर्दी असते. या फलकांवर दर आठवड्याला असतात सरांनी केलेली नवी भित्तिपत्रकं.  नाव-‘निसर्गज्ञान’.  दर आठवड्याला लागणाऱ्या या भित्तिपत्रकांची संख्या लवकरच १ हजारवर पोहोचणार असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं या उपक्रमाची यापूर्वीच दखल घेतली आहे.

सेवाभावी पुंडलिक

‘ते’ पोलीससेवेत, 26-11 च्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे त्यांचे वरिष्ठ, त्यांची शिकवण लक्षात ठेऊन वाटचाल करणे हे यांचे धोरण, त्यातून वारांगनांच्या मुलांसाठी शाळा, व्यवसाय प्रशिक्षण, जनजागृती कार्यशाळा, किन्नारांचे प्रबोधन, त्यांच्या प्रश्नांवर काम, दरवर्षी शहीद पोलिसांना मानवंदना म्हणून एचआयव्हीसह जगणाऱ्या जोडप्यांचे स्वखर्चाने विवाह अशी यांच्या कामांची न संपणारी यादी.

ताप येण्याची कारणे आणि निदान

मलेरिया: प्लाझमोडियम ह्या एकपेशीय सजीवामुळे हा रोग होतो. हे जीव ऍनाफेलीस ह्या डासाच्या मादीच्या लाळ ग्रंथीत वाढतात आणि तिथे साठून राहतात. जेव्हा ती माणसाला चावते तेव्हा हे जंतू माणसाच्या रक्तात सोडले जातात. ते तांबड्या पेशींमध्ये शिरतात आणि हळूहळू वाढू लागतात. त्यांच्यापासून स्त्री आणि पुबीजे(गॅमेट्स) तयार होतात.

Impact Posts

विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा: मलकापूर पॅटर्न
बाबाचं मनोगत: राम जगताप, संपादक, http://www.aksharnama.com
उमेद अपडेट
सामान्य माणूस ते असामान्य माणूस असा प्रवास घडला तो केवळ नवी उमेदमुळे
शाळेतील मुलींना पाच रूपयात सॅनेटरी नॅपकीन देणार - पंकजा मुंडे