अंध व्यक्तींच्या घरी पोहोचवलं जातंय वाणसामान

 

”आपल्या कोणा अंध मित्र-मैत्रिणींना काही मदत हवी का” म्हणून हर्षद जाधवला फोन केला होता. तेव्हा आपल्या प्रकाश पंडागळे यांनी दृष्टी फॉउंडेशनसोबत यासाठी काम सुरू केलं असल्याचं त्यानं सांगितलं.
सध्या नियमित नोकरी असलेल्या आपल्यासारख्या अंधांनाही अडचणीला तोंड द्यावं लागत आहे. पण दररोजच्या कमाईवर ज्यांचं घर चालतं, फेरीवाले किंवा जे नोकरी करत नाहीत अशा आपल्या भावंडांचं काय? त्यांची रोजची चूल कशी पेटणार? या विचारातून काहीं अंध व्यक्तींनीच पुढाकार घेतला आहे.


महिन्याचं वाणसामान त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातंय. पंडागळे आणि त्यांची टीम एका घरासाठी १००० रुपयांचा तरी किराणा भरला जाईल याची काळजी घेत आहेत. आतपर्यंत त्यांनी १ लाखांची मदत जवळपास १०० कुटुंबापर्यंत पोहचवली आहे. त्यात मुंबईशिवाय सोलापूर ,नांदेड ,पुणे,अहमदनगर इथल्या अंध व्यक्तीही आहेत.
नालासोपाऱ्याच्या एका अंध कुटुंबापर्यंत जेव्हा घरपोच किराणा सामान आलं तेव्हा त्या ताईचा आनंद अवर्णनीय होता. दुकानदार ,मित्र-मंडळी सगळ्यांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. एका दुकानदाराकडे पैसे स्वीकारण्यासाठी काहीच डिजिटल माध्यम नव्हतं त्याने फक्त सामान न्या ,पैशाचं नंतर बघू असं सांगितलं.
तुम्हाला सुद्धा मदत करायची असले तर तुम्ही त्यांच्या किराणा सामनाचं बील थेट भरू शकता किंवा ते शक्य नसल्यास पैसे ट्रान्सफर करू शकता . चला माणुसकीचा हा दिवा असाच तेवत ठेऊया, या कार्यात आपला थोडा हातभार लावूया.
Drishti foundationBank name- Dena Bank Account no- 001610022526IFSC code- BKDN0460016.
MICR- 400018035.
Branch name- Trimurti, S.V.Road Santacruz West, Mumbai

– मेघना धर्मेश, मुंबई

Leave a Reply