अलिशान हॉटेल कोरोनाशी लढा देणाऱ्यांना खुलं

देवेंद्र कोठे हे सोलापुरातील प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात श्रीकृष्ण आणि राधाकृष्ण ही त्यांची दोन आलिशान हॉटेल आहेत. यातील ४५ खोल्यांचे राधाकृष्ण हॉटेल त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी खुलं करत असल्याचे जाहीर केलं होतं. यासाठी त्यांनी हॉटेल ताब्यात घेण्याची विनंती करणारं पत्र प्रशासनाला दिलं आहे.

 

देवेंद्र कोठे म्हणाले, “कोरोनाशी लढा देण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, पोलिस प्रशासन, आरोग्य कर्मचारी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून कोरोना संसर्ग थांबव

त आहेत. त्यांना आपलं कर्तव्य पार पाडल्यानंतर घरी जाण्यासाठी भीती वाटत आहे. आपल्या घरातील सदस्यांना याची लागण होईल या चिंतेत वावरतात. भारतात अशी अनेक प्रकरणं देखील घडली आहेत ज्यात या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला. म्हणूनच मी सामाजिक बांधिलकी म्हणून माझे हॉटेल या लोकांसाठी खुले करत आहे. यातील वीस खोल्या प्रशासन अधिग्रहण करणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी फोनद्वारे मला दिली आहे.”
यापूर्वी टाळेबंदीच्या काळात हाताला काम नसल्यामुळे अनेक लोकांची उपासमार होत होती. यादरम्यान नगरसेवक कोठे यांनी माणुसकी दाखवत त्यांच्या प्रभागातील दोन हजारपेक्षा अधिक लोकांना घरपोच धान्य देऊन मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेकांची भूक भागण्यास मदत झाली. देवेंद्र कोठे यांनी प्रशासन आणि जनतेला दिलेल्या मदतीमुळे त्यांच्यावर सोलापूरमध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply