दिवस गुरूपौर्णिमेचा. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमधला सेवाभावी मिशन ओ टू ग्रुप. या ग्रुपने घाटपुरी गावाजवळ उजाड माळरानावर गुरुदक्षिणेचा कार्यक्रम आयोजित केला होता. निसर्ग हा आपला गुरू या भावनेतून निसर्गाला गुरुदक्षिणा देण्याचा कार्यक्रम. कसा तर 500 झाडे लावून. यंदाचे वृक्षारोपण आरोग्य, स्वछता, पत्रकारिता अशा विविध माध्यमातून कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी काम करणार्यानच्या हस्ते. त्यांच्या हस्ते 205 आणि उरलेली इतर मान्यवरांच्या हस्ते. खड्डे खणण्यासाठी ग्रामपंचायतीने मदत केली.
प्राणवायू देणार्या झाडांचे महत्त्व सांगणारी मिशन ओ टू. वृक्ष लागवड आणि संगोपन करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ही टीम काम करते. टीम पडित जमीन, गावमाळ अशा ठिकाणी झाडे लावते. लिंब, कडुनिंब,जांभूळ अशी कमी पाणी लागणारी झाडे. या झाडांचे संगोपनही टीम करते. या उपक्रमाला शहरातल्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
मास्क, सेनिटाइज़र सोशल डिस्टेंसिन्ग, स्वच्छता आणि सुरक्षा नियमांचे पालन करत आनंदाने दिवस साजरा केल्याचं मिशन ओ टू संस्थेच्या डॉ. गायत्री थानवी यांनी सांगितले.
– अमोल सराफ, बुलढाणा