नंदकुमार पवार यांना सुट्टी घेण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी ती घेतली नाही. गावकऱ्यांना आरोग्य सेवा देणं हेच त्यांचं ध्येय आहे.
नंदकुमार पवार जालना इथल्या दुधना काळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातले आरोग्य सेवक . इथे गेल्या चार वर्षांपासून ते कार्यरत आहेत. वय ४५ च्या आसपास.

केमोथेरपीच्या काळातही त्यांनी आपल्या जबाबदारीला महत्त्व दिलं. कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असताना आठ -नऊ हजार लोकसंख्येची त्यांनी काळजी घेतली. घरोघरी जाऊन तपासणी केली. लोकांना माहिती दिली. स्वखर्चानं माहितीपत्रकं लावली. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. पण त्यावर मात करत ते कर्तव्याला लागले.
– अनंत साळी, जालना