महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी
अकोला जिल्हा (महसूल विभाग अमरावती): माविनि ०.७२२ मानवविकास स्थिती: उच्च
आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.
माहितीआधार: विधिमंडळाचं संकेतसथळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.
क्र | आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ | एकूण प्रश्न | आरोग्य | शिक्षण | पाणी | शेती | बेरोजगारी | बालक | महिला | उपस्थितीची सरासरी % | |
१ | रणधीर सावरकर/ भाजप/ अकोला पू | ५० | १ | ५ | ५ | २ | १ | १ | ० | ८४ | |
२ | गोवर्धन शर्मा /भाजप / अकोला प | ३२ | ३ | ० | ३ | १ | २ | ० | ० | ७५ | |
३ | हरीश पिंपळे /भाजप / मूर्तिजापूर | १७ | १ | १ | ० | १ | ० | २ | ० | ८३ | |
४ | बळीराम शिरस्कार/भारिप बम/बाळापूर | १२ | ० | १ | ० | ० | ० | ० | ० | ६९ | |
५ | प्रकाश भारसाकळे /भाजप / अकोट | ३ | ० | ० | ० | १ | ० | ० | ० | ७२ | |
अकोला जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न | ११४ | ५ | ७ | ८ | ५ | ३ | ३ | ० |
निरिक्षणे
- अकोला जिल्ह्यातून एकूण ११४ प्रश्न विचारले गेले. अभ्यासविषयांपैकी आरोग्य,शिक्षण, पाणी, शेती, बेरोजगारी आणि बालक या प्रत्येक विषयावर जिल्ह्यातून एक अंकी प्रश्न विचारले गेले. महिला या विषयावर एकही प्रश्न विचारला गेला नाही. अन्य प्रश्नांत घोटाळे-गैरव्यवहारविषयक ३७ प्रश्न विचारले गेले. यात, गोवर्धन शर्मा यांनी सर्वाधिक १४ प्रश्न मांडले.
- कापूसउत्पादक शेतकर्यांसाठी ठोस धोरण अणि महाविद्यालयांना वित्तीय स्वायत्तता हे धोरणविषयक विचारल्या गेलेल्या दोन प्रश्नांचे विषय होते.
- आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वाधिक एकूण ४९ प्रश्न विचारले. शिक्षण आणि पाणी या विषयांवर प्रत्येकी ५ असे सर्वाधिक प्रश्नही त्यांनीच विचारले.
- सर्वात कमी ३ प्रश्न आमदार प्रकाश भारसाकळे यांनी उपस्थित केले.
- वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे असे: मतदारसंघातले प्रकल्प, बांधकामांतील अनियमितता, विद्यापीठांतील गैरव्यवहार, शेतकर्यांची विमा रक्कम वगैरे.
- सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार रणधीर सावरकर.