आमदारांची कामगिरी – अमरावती जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी  

जिल्हा अमरावती  (महसूल विभाग अमरावती): माविनि ०.७०१ मानवविकास स्थिती: मध्यम

तक्ता १

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतसथळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८),

त्यातील  अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

  क्र आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
  वीरेंद्र जगताप / कॉं / धामणगाव रेल्वे १२१ ८४
  ॲड यशोमती ठाकूर / कॉं / तिवसा ९५ १२ १५ ६८
  बच्चू कडू / अपक्ष / अचलपूर ६३ ७५
  डॉ अनिल बोंडे/  भाजप / मोर्शी २८ 0 ९५
  डॉ सुनील देश्मुख/  भाजप / अमरावती २३ ९३
  प्रभुदास भिलावेकर / भाजप / मेळघाट १६ ८५
  रमेश बुंदिले / भाजप / दर्यापूर ९८
  रवी राणा / अपक्ष / बडनेरा ७३
    अमरावती जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न ३५९ १३ १७ २९ ४० १६  

       निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण 3५९ प्रश्न विचारले गेले / आमदार  वीरेंद्र जगताप  यांनी सर्वाधिक १२१ प्रश्न विचारले.  
  • अभ्यासविषयांच्या वरील वर्गवारीत जिल्ह्यातून मांडले गेलेले सर्वाधिक ४० प्रश्न शेतीविषयक होते.  अन्य प्रश्नांत घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण ५५ प्रश्न विचारले गेले. यात सर्वाधिक २६ प्रश्न आमदार  वीरेंद्र जगताप यांनी मांडले.
  • आरोग्य, शिक्षण, पाणी, शेती, बालक, महिला या विषयांवर सर्वाधिक प्रश्न ॲड यशोमती ठाकूर यांनी  विचारले.  त्यांनीच विचारलेला धोरणविषयक  एक प्रश्न नर्सरी शाळाप्रवेशाच्या धोरणाविषयी होता.  त्या जिल्ह्यातल्या एकमेव महिला आमदार.
  • सर्वात कमी प्रश्न आमदार  रमेश बुंदिले यांनी उपस्थित केले. त्यांची प्रश्नसंख्या एक अंकी आहे.  
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: मतदारसंघातले प्रकल्प, वनविभागातले गैरव्यवहार, रेतीतस्करी, उपसा, विविध सरकारी योजनांतले गैरव्यवहार,  विमानतळ मागणी वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार रमेश बुंदिले.

तक्ता २

आमदारांची मतदारसंघातील कामगिरी

(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरीक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्यामतांवर आधारित)

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश जिल्ह्यातील संकटप्रसंगी मदतीला धावणे  गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम
वीरेंद्र जगताप / कॉं / धामणगाव रेल्वे  होय होय विशेष असे नाही
ॲड यशोमती ठाकूर / कॉं / तिवसा  होय  होय कौठ्ण्यपूर, राष्ट्रसंत तुकडोजी समाधीस्थळ क्षेत्र विकासात योगदान
बच्चू कडू / अपक्ष / अचलपूर  होय  होय बहिराम यात्रेत जनता दरबार सुरु करत जनता-प्रशासन समन्वय घडवला.
डॉ अनिल बोंडे/  भाजप / मोर्शी होय होय विशेष असे नाही
डॉ सुनील देश्मुख/  भाजप / अमरावती होय होय अमरावती विमानतळासाठी सातत्याने पाठपुरावा 
प्रभुदास भिलावेकर / भाजप / मेळघाट नाही नाही विशेष असे नाही
रमेश बुंदिले / भाजप / दर्यापूर होय नाही विशेष असे नाही
रवी राणा / अपक्ष / बडनेरा होय होय विशेष असे नाही

निरिक्षणे

 जिल्ह्यात सर्वात महत्वाचे प्रश्न पाणी आणि सिंचन हे आहेत. जिल्ह्यात मोठ्या कंपन्यांचे उद्योग आले. परंतु स्थानिकांना रोजगार मिळत नाही. मेळघाट भागात अद्यापही कुपोषण, बालविवाह असे प्रश्न कायम आहेत. त्यावर प्रभावी काम होणे अपेक्षित आहे.

 जिल्ह्यातील गाभ्याच्या सामाजिक समस्या (सरकारी माहितीअनुसार)

 गरोदर मातांना मिळणाऱ्या लोह, फोलिक असिडच्या गोळ्या अपुर्‍या, प्रसूतीपूर्व काळजी; गरोदरपणा, प्रसूती, प्रसूतीनंतर, या सर्व काळात उद्भवणाऱ्या समस्या आणि पदर जाणे यावर पुरेसे उपचार नाहीत; किमान चार खाटा असलेली प्रथमिक आरोग्य केंद्रांची अपुरी संख्या; गरोदर महिलांमधील ॲनिमिया; शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण अर्ध्यापेक्षा कमी.