आमदारांची कामगिरी – कोल्हापूर जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी

 जिल्हा  कोल्हापूर  (महसूल विभाग पुणे): माविनि ०.७७० मानवविकास स्थिती: अतिउच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८),

त्यातील  अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
प्रकाश आबिटकर /शिवसेना /राधानगरी १०५ ८७
डॉ सुजित मिणचेकर /शिवसेना/ हातकणंगले ६५ 3 ७५
हसन मुश्रीफ/ राकॉ /कागल ५८ १० ५३
राजेश क्षीरसागर/ शिवसेना /कोल्हापूर उ ५८ ७९
सत्यजित पाटील-सरुडकर/ शिवसेना/शाहुवाडी ५० १० ९१
चंद्रदीप नरके /शिवसेना /करवीर ४३ ८०
सुरेश हाळवणकर/ भाजप /इचलकरंजी ४१ ८५
संध्यादेवी देसाई – कुपेकर/ राकॉ /चंदगड ४० ६१
उल्हास पाटील/ शिवसेना /शिरोळ २९ ९०
१० अमल महाडिक/ भाजप /कोल्हापूर द १५ ८१
कोल्हापूर जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न ५०४ २६ ३१ ५२ ३१ १५  

 निरिक्षणे

  • जिल्ह्यातील १० मतदारसंघापैकी एकाचे प्रतिनिधित्व महिला आमदार करतात.
  • जिल्ह्यातून एकूण ५०४ प्रश्न विचारले गेले.  आमदार प्रकाश आबिटकर  यांनी सर्वाधिक  १०५ प्रश्न विचारले.  तीन अंकी प्रश्नसंख्या असणारे जिल्ह्यातले ते एकमेव आमदार. त्यांच्या खालोखाल ६५ प्रश्न विचारणारे आमदार सुजित मिणचेकर. त्यांच्यासह सर्व ९ आमदारांची प्रश्नसंख्या दोन अंकी आहे.  सर्वात कमी १५ प्रश्न आमदार  अमल महाडिक यांच्या नावे आहेत.
  • अभ्यासविषयांच्या वरील वर्गवारीत, जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ प्रश्न पाणी या विषयावर उपस्थित केले गेले. त्या खालोखाल ३१ शिक्षण आणि शेतीविषयक प्रत्येकी, आणि २६ आरोग्यविषयक प्रश्न मांडले गेले. महिला या विषयावर २,  बेरोजगारीविषयक ३ आणि बालकांविषयी ९ प्रश्न मांडले गेले आहेत.
  •  वरील वर्गवारीत समाविष्ट नसलेल्या प्रश्नांत गैरव्यवहार-घोटाळेविषयक ८२ प्रश्न उपस्थित केले गेले. त्यात, आमदार सुजित मिणचेकर यांनी सर्वाधिक २१ प्रश्न विचारले.  
  • एकूण ४ प्रश्न धोरणविषयक होते. ते पुढीलप्रमाणे:
  • शालेय पोषण आहारामधे ‘होल मिल्क पावडर’ सारख्या दुध भुकटीचा पुरवठा करण्याबाबत. २०१८ च्या हिवाळी अधिवेशनातील १५ नोव्हेंचा तारांकित प्रश्न.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सर्व बसेसना टोलमधून वगळण्याबाबत. २०१५ च्या पावसाळी अधिवेशनातील १६ जुलैचा तारांकित प्रश्न.
  • राज्यात असंघटित कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत. २०१७च्या बजेट अधिवेशनातील २९ मार्चची लक्षवेधी सूचना.
  • राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात कॅन्सरचे निदान करण्याकरिता मोफत निदान कक्ष (फ्री डिटेक्शन युनिट), स्तनाच्या कर्करोगावरील लस सवलतीच्या दरात, तरुण मुलीना कर्करोगापासून वाचविण्यासाठी मोफत कर्करोग प्रतिबंधक लस देण्याची आवश्यकता.
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेले प्रश्नांचे विषय नमुन्यादाखल पुढीलप्रमाणे: जिल्हयात जलयुक्त शिवाराअंतर्गत गावनिवडीमध्ये झालेला गैरव्यवहार,  कनार्टक सीमाभागातून येणा-या मद्य तस्करीस आळा घालण्याबाबत, दाजीपूर वन्यजीव अभयारण्यातील (जि.कोल्हापूर) गवे सीमोल्लंघन करुन लगतच्या शेतात घुसून नुकसान करीत असल्याबाबत, पाटगांव धरणाचे पाणी वेदगंगा नदीत सोडण्याबाबत, कोल्हापूर जिल्हयातील सीपीआर रुग्णालयातील प्रलंबित ट्रामाकेअर सेंटर, कोल्हापूर जिल्हयातील अवैध बॉक्साईट उत्खनन, वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे आमदार सत्यजित पाटील सरूडकर.