आमदारांची कामगिरी – गडचिरोली जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी

जिल्हा गडचिरोली  (महसूल विभाग नागपूर ) माविनि ०.६०८  मानवविकास स्थिती: अल्प, राज्यात शेवटून दुसर्‍या क्रमांकावर

तक्ता १

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८ ), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

  क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
  डॉ देवराव होळी/ भाजप / गडचिरोली १२ ८१
  कृष्णा गजबे / भाजप / आरमोरी ८३
  अंबरीश अत्राम / भाजप / अहेरी: मंत्री प्रश्न आणि उपस्थिती लागू नाही.                  
  जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न १७  

निरिक्षणे

 • जिल्ह्यातून एकूण १७  प्रश्न  विचारले गेले. आमदार  देवराव होळी  यांनी सर्वाधिक  १२ प्रश्न विचारले.  आरोग्य आणि बेरोजगारी या विषयांवर सर्वाधिक २ प्रश्न त्यांनीच विचारले.
 • पाण्यासंबंधी प्रत्येकी दोन प्रश्न आमदार देवराव होळी आणि कृष्णा गजबे यांनी विचारले.  एक सिंचनसुविधाविषयक तारांकित आणि एक ‘मामा’ तलावातून पाणीपुरवठा व्हावा याविषयी अर्धा तास चर्चा.
 • शिक्षण या विषयावरचा एक प्रश्न आमदार कृष्णा गजबे यांचा होता. नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी एसटी बसची सुविधा या विषयावरची ती लक्षवेधी सूचना होती.  
 • शेतीविषयक एकही प्रश्न उपस्थित केला गेला नाही. बालक आणि महिला या विषयांवरही एकही प्रश्न विचारला गेला नाही.  धोरणविषयक प्रश्नही मांडला गेला नाही.
 • घोटाळे – गैरव्यवहार यासंबंधी एकूण ३ प्रश्न विचारले गेले.  या आदिवासी जिल्ह्यातून वनहक्काविषयी एकच प्रश्न उपस्थित केला गेला आहे. तो मुंबईमधल्या आदिवासी जमिनीबाबतचा आहे.
 • सर्वात कमी, ५  प्रश्न आमदार कृष्णा गजबे यांनी उपस्थित केले.
 • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: प्रलंबित प्रकल्प, वैनगंगा नदीतील अवैध वाळूउपसा, सौरऊर्जा पंप कार्यान्वित करण्याबाबत वगैरे.
 • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार कृष्णा गजबे.

तक्ता

आमदारांची मतदारसंघातील कामगिरी

(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरीक्षणे त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश जिल्ह्यातील संकटप्रसंगी मदतीला धावणे गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम
डॉ देवराव होळी भाजप .गडचिरोली हो अपवादाने ‘मेक इन गडचिरोली’ प्रकल्प हाती घेतला. तो यशस्वी झाला नाही.
कृष्णा गजबे / भाजप / आरमोरी हो हो नाही
अंबरीश अत्राम / भाजप / अहेरी / मंत्री सहज नाही नाही नाही

निरिक्षणे

 • गडचिरोलीतले प्राधान्याचे प्रश्न आरोग्य, रस्ते व वीजपुरवठा.
 • अनेक आरोग्यकेंद्रांतमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वानवा आहे. परिणामी सहजासहजी आरोग्यसुविधा मिळणे दुरापास्त आहे.  
 • अनेक गावांना जोडणारे व अंतर्गत रस्ते होणे आवश्यक आहे. रस्ते नसल्याने दळणवळणासाठी अडचणी जाणवतात.
 • अनेक गावांमध्ये वीज अजूनही पोचलेली नाही.
 • मुलचेरा तालुक्यात मुकडी गावाजवळ चेन्ना नदीवर बांधण्यात येणारा चेन्ना हा हजारो एकर जमीन सिंचनाखाली आणू शकणारा प्रकल्प रखडला आहे

जिल्ह्यातील गाभ्याच्या समस्या (सरकारी माहितीअनुसार)

६ ते ९ महिने वयाच्या मुलांना मिळणार्‍या आहाराचं कमी प्रमाण, बालकांमधील अतिसार आणि त्याविषयी जागरुकतेचा अभाव, गावपातळीवरील दुबळी आरोग्यव्यवस्था, शाळांमधील अपुरा वीजपुरवठा, महिलांमधीलमधील ॲनिमिया, फक्त ४१ टक्के शाळांमध्ये कम्प्युटर उपलब्ध, शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण पन्नास टक्क्यांच्या जवळ; महिलांमधील साक्षरतेचे अल्प प्रमाण; अत्यल्प दर डोई उत्पन्न, माविनि अल्प, राज्यात शेवटून दुसरा क्रमांक.