आमदारांची कामगिरी – चंद्रपूर जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी  

जिल्हा चंद्रपूर  (महसूल विभाग नागपूर ):माविनि ०.७१८ मानवविकास स्थिती:मध्यम

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८ ),

त्यातील  अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

  क्र आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
  विजय वडेट्टीवार / कॉं / ब्रह्मपुरी २२३ २० १० १५ ८१
  सुरेश धानोरकर / शिवसेना / वरोरा ५९ ७८
  संजय धोटे / भाजप / राजुरा ३५ ८८
  नानाजी शामकुळे / भाजप / चंद्रपूर ३१ ९१
  बंटी भांगडिया / भाजप / चिमूर ८२
  सुधीर मुनगंटीवार/भाजप/ बल्लारपूर: मंत्री       प्रश्न-उपस्थितीच्या नोंदी लागू नाहीत.                  
    चंद्रपूर जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न ३५५ ३० १७ २१ २७ १०  

             निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण ३५५ प्रश्न विचारले गेले. अभ्यासविषयांपैकी सर्वाधिक ३० प्रश्न आरोग्य या विषयावर, त्या खालोखाल २७ प्रश्न शेतीसंबंधित  मांडलेले गेले.  आरोग्याविषयी २० आणि शेतीविषयक १५ प्रश्न आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले. बालकांविषयी सर्वाधिक ९ प्रश्नही त्यांनी विचारले. विजय वडेट्टीवार यांनीच सर्वाधिक २२३ प्रश्न मांडले. 
  • महिलाविषयक अवघा १ प्रश्न मांडला गेला. धोरणविषयक प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत. घोटाळे-गैरव्यवहारविषयक ७१ प्रश्न विचारले गेले. विजय वडेट्टीवार यांनीच सर्वाधिक ४९ प्रश्न मांडले.
  • सर्वात कमी, ७ प्रश्न आमदार बंटी भांगडिया यांनी विचारले.
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: इरई नदीकाठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्याबाबत, कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांना वेतन देण्याबाबत, चंद्रपूर शहरात बिबट्याचा वावर, जिल्ह्यातील भूसंपादन व पुनर्वसनाची प्रकरणे निकाली काढण्याबाबत, मामा तलावदुरुस्ती, आदिवासी विकास विभागाने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारास चिक्कीपुरवठ्याचे आदेश दिल्याबाबत, चंद्रपूर एमआयडीसी परिसरातील उद्योग बंद पडल्याबाबत, सागवान वृक्षतोड, वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार नानाजी शामकुळे.