आमदारांची कामगिरी – जळगाव जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी

जिल्हा जळगाव  (महसूल विभाग नाशिक):माविनि ०.७२३  मानवविकास स्थिती: उच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील  अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
संजय सावकारे/भाजप/भुसावळ ९० ८६
गुलाब पाटील/शिवसेना/जळगाव ग्रा ४२ ८१
डॉ सतीश पाटील/ राकॉं/एरंडोल ३७ ७३
किशोर पाटील/शिवसेना/पाचोरा २८ ८३
उन्मेष पाटील/भाजप/ चाळीसगाव २६ ९२
चंद्रकांत सोनावणे/शिवसेना/चोपडा २२ ७५
एकनाथ खडसे/ भाजप /मुक्ताईनगर २२ ७४
हरिभाऊ जावळे / भाजपा / रावेर २० ८७
सुरेश भोले / भाजपा/जळगाव शहर १९ ८९
१० शिरीष चौधरी /अपक्ष /अमळनेर ८५
११ गिरीश महाजन / भाजपा /जामनेर: मंत्री  प्रश्न व उपस्थितीच्या नोंदी गैरलागू                  
  जळगाव जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न ३१२ १२ २३ २४ २१ १५  

 निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण ३१२ प्रश्न विचारले गेले. वरील वर्गवारीत जिल्ह्यातून सर्वाधिक २४ प्रश्न  पाणी या विषयावर, त्या खालोखाल २३ प्रश्न शिक्षण या विषयावर उपस्थि केले गेले.
  • महिलाविषयक अवघा १ आणि बेरोजगारीविषयी फक्त २ प्रश्न मांडले गेले.  धोरणविषयक एकही प्रश्न विचारला गेला नाही. वरील वर्गवारीखेरीज विचारल्या गेलेल्या अन्य प्रश्नांत घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण ४३ प्रश्न होते.
  • आमदार संजय सावकारे यांनी सर्वाधिक ९०  प्रश्न विचारले.  त्यांनीच आरोग्य, शिक्षण, पाणी आणि शेती या विषयांवर सर्वाधिक, अनुक्रमे ४,७,५,६ असे प्रश्न  विचारले .
  • सर्वात कमी म्हणजे ६ प्रश्न आमदार शिरीष चौधरी यांनी उपस्थित केले. एक अंकी प्रश्नसंख्या असणारे ते एकच आमदार.
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: स्वस्त धन्य दुकान परवाने, अनधिकृत भूखंड, रस्ते कामांतील बोगसगिरी, नियुक्त्यांचे रखडलेले प्रश्न, विविध योजनांचे प्रलंबित अनुदान वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे आमदार उन्मेष पाटील.                                                                                                                                                                                        

जिल्ह्यातील गाभ्याच्या सामाजिक समस्या (सरकारी माहितीअनुसार)

गरोदर मातांची सर्व टप्प्यांवरील सर्व प्रकारची अपुरी काळजी; गरोदर मातांना मिळणारे लोह, फॉलिक अॅसिड यांची कमी उपलब्धता; बालकांचे पोलिओ लसीकरण अपुरे; जन्मानंतर एका तासात स्तनपान करण्याविषयी जागृती अपुरी; पुरुष, महिला व बालके यांमधील ॲनिमिया; ग्रामीण भागातील उपआरोग्यकेंद्रावरील निवासी व्यवस्थेचा ANM कडून अल्प वापर; अतिरिक्त ANMयुक्त उपआरोग्य केन्द्रे; शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण अर्ध्यापेक्षा कमी.