आमदारांची कामगिरी – जालना जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी

जिल्हा जालना  (महसूल विभाग औरंगाबाद):  माविनि ०.६६३ मानवविकास स्थिती: अल्प

तक्ता १

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८ ),

त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

  क्र आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
  अर्जुन खोतकर / शिवसेना /जालना ६५ ७९
  संतोष दानवे / भाजप / भोकरदन ६१ ८६
  नारायण कुचे / भाजप /बदनापूर १४ ७९
  राजेश टोपे / राकॉं / घनसावंगी १० ७९
  बबन लोणीकर/भाजप/परतूर: मंत्री प्रश्न आणि उपस्थिती लागू नाही.  
    जालना जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न १५० १२ १०  

 निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण १५० प्रश्न विचारले गेले.
  • आमदार  अर्जुन खोतकर यांनी सर्वाधिक  ६५ प्रश्न विचारले.  अभ्यासविषयांत पाण्याविषयी ६ आणि शेतीविषयी ४ हे सर्वाधिक प्रश्नही त्यांनीच विचारले. त्यांनी उपस्थित केलेल्या अन्य प्रश्नांत २५ घोटाळे-गैरव्यवहारविषयक  प्रश्नदेखील आहेत.  
  • त्या खालोखाल ६१ प्रश्न आमदार संतोष दानवे यांनी विचारले. त्यांनीच आरोग्यविषयक ३, शिक्षणविषयक ३  आणि बालकांविषयी ४ असे सर्वाधिक प्रश्न मांडले.
  • धोरणविषयक १ प्रश्न आमदार राजेश टोपे यांनी विचारला. जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र  जलसंधारण आयुक्तालयाची निर्मिती करण्याविषयीचा हा २०१७ च्या हिवाळी अधिवेशनात १४ डिसें रोजी विचारलेला तारांकित प्रश्न होता. सर्वात कमी प्रश्नही त्यांचेच.
  • सर्वच आमदारांचे सामाजिक विषयांवरचे प्रश्न एक अंकी होते.  महिलाविषयक फक्त १ प्रश्न उपस्थित गेला.  घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण ४० प्रश्न विचारले गेले.
  • एकूण १५० पैकी ७ प्रश्न मुंबईबाबतचे होते.
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: सौर पथदिवे उभारणी, शौचालय बांधकाम, रस्ते दुरुस्ती, बंधार्‍यांची कामे, सांबराची शिकार, नदीपात्रातील वाळूउपसा, लूटमारीच्या घटना, बंधार्‍याच्या दरवाजाची चोरी, निविदाफायली गहाळ होणे,  वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार संतोष दानवे.

तक्ता २

आमदारांची मतदारसंघातील कामगिरी

(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरीक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)

क्र आमदाराचे नाव/पक्ष/मतदारसंघ भेटीसाठीसर्वसामान्यांना सुलभ प्रवेश जिल्ह्यातीलसंकटप्रसंगी मदतीला  धावणे गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम
अर्जुन खोतकर / शिवसेना /जालना होय होय रेशीम खरेदी-विक्री केंद्र सुरु केले.
संतोष दानवे / भाजप / भोकरदन होय होय मतदारसंघात रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणत कामे केली.
नारायण कुचे / भाजप /बदनापूर होय होय विशेष काही नाही
राजेश टोपे / राकॉं / घनसावंगी होय होय साखर कारखाना, दूध डेअरी यांच्या माध्यमातून रोजगार दिला.
बबन लोणीकर / भाजप /परतूर: मंत्री होय होय वॉटर ग्रीड योजना मंजूर केली.

जिल्ह्यातील गाभ्याच्या समस्या

जिल्ह्यात पाणीप्रश्न सततचा आहे. त्यावर मात करण्यासाठी सातत्यपूर्ण व शाश्वत  उपाययोजना आवश्यक आहे.