आमदारांची कामगिरी – ठाणे जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी:  

जिल्हा  ठाणे (महसूल विभाग कोकण):  माविनि ०.८००  मानवविकास स्थिती: अति उच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
जितेंद्र आव्हाड /राकॉ / मुंब्रा-कळवा १३६ १२ १५ ८६
रुपेश म्हात्रे/ शिवसेना / भिवंडी पू ९२ ९३
प्रताप सरनाईक /शिवसेना /ओवळा –माजिवडा ५० ९४
डॉ बालाजी किणीकर / शिवसेना /अंबरनाथ ४७ ८९
गणपत गायकवाड / अपक्ष / कल्याण पू ३६ ६६
सुभाष भोईर / शिवसेना / कल्याण ग्रा ३६ ८८
पांडुरंग वरोरा / राकॉं / शहापूर ३५ ९६
संदीप नाईक / राकॉं /ऐरोली ३२ ७१
नरेंद्र पवार / भाजप / कल्याण प ३१ ८९
१० ज्योती कलानी / राकॉं / उल्हासनगर २९ ६९
११ किसान कथोरे / भाजप / मुरबाड २७ ९५
१२ संजय केळकर / भाजप / ठाणे २४ ८६
१३ शांताराम मोरे / शिवसेना /भिवंडी ग्रा १९ ८५
१४ महेश चौघुले/ भाजप / भिवंडी प १४ ८१
१५ नरेंद्र मेहता/ भाजप / मीरा-भायंदर १२ ७७
१६ मंदा म्हात्रे / भाजप / बेलापूर १२ ६९
ठाणे जिल्ह्यातून  विचारले गेलेले एकूण प्रश्न      ६३२ ३१ ३१ ५० ११ १६  

 निरिक्षणे

  • मतदारसंघांची संख्या विचारात घेता ठाणे हा राज्यातला, मुंबई उपनगर जिल्ह्याखालोखालचा, दुसरा मोठा जिल्हा.  इथल्या एकूण १६ पैकी २ मतदारसंघांचं प्रतिनिधित्व महिला आमदार करतात.
  • जिल्ह्यातून एकूण ६३२ प्रश्न उपस्थित केले गेले. यात, अभ्यासविषयांमध्ये सर्वाधिक ५० प्रश्न पाणी या विषयावर, सर्वात कमी ५ प्रश्न प्रत्येकी बेरोजगारी आणि महिला या विषयांशी संबंधित आहेत.
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वाधिक १३६ प्रश्न विचारले.   त्यांची तीन अंकी प्रश्नसंख्या वगळता अन्य १५ आमदारांची प्रश्नसंख्या दोन अंकी आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी, शेती, बालक आणि महिला या आमच्या अभ्यासविषयांवर सर्वाधिक प्रश्नदेखील आमदार आव्हाड  यांनीच मांडले.
  • जिल्ह्यातून सर्वात कमी, १२ प्रश्न आमदार मंदा म्हात्रे आणि नरेंद्र मेहता यांनी विचारले. 
  • घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण १४० प्रश्न मांडले गेले. त्यात, सर्वाधिक ३६ प्रश्न आमदार रूपेश म्हात्रे यांच्या नावावर आहेत.
  • धोरणविषयक  ४ प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड  यांनी मांडले. ते असे: राज्यातील अपंगांसाठी धोरण निश्चित करणे (२०१५, बजेट अधिवेशन, तारांकित प्रश्न) राज्यात औद्योगिक विकासाकरिता परिपूर्ण उद्योगधोरण आखण्याबाबत (२०१५ पावसाळी अधिवेशन, तारांकित प्रश्न), राज्यातील पतसंस्थांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याबाबत, पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या धोरणात बदल करण्याबाबत (२०१६ बजेट अधिवेशन, तारांकित प्रश्न ),
  • सर्वात कमी, १२ प्रश्न आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केले. 
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: भिवंडी येथे, तसंच आंबिवली ते कल्याण गट नं.९ परिसरात, खाड़ी किनारी अवैध रेतीउपसा, कल्याण – शिळ आणि श्रीमलंग रोड तसेच कल्याण पूर्व शहरात बार-रेस्टॉरण्ट तसेच गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात बालधुनी नदीच्या किना-यालगत मोनार्क बिल्डर्सकडून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम, रेल्वे रुळाशेजारी भाज्या पिकवणे, डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासाबाबत, कल्याण– डोंबिवली  शहरात अनधिकृत रिक्षाचालकांमुळे होणारी वाहतूककोंडी, नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील उपकरणे खरेदी, ठाणे महानगरपालिका हद्दीत बेकायदेशीर मोबईल टॉवर्स उभारण्यामुळे शासनाचा बुडालेला महसूल, मुरबाड तालुक्यातील शिधा पत्रिकाधारकांना स्वस्त धान्य उपलब्ध होत नसल्याबाबत, ठाणे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दुपटीने वाढ, ठाणे येथील ग्राहक तक्रारनिवारण मंचाकडील न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्यांबाबत वगैरे.
  • या ६३२ प्रश्नांत आदिवासी या शब्दाचा उल्लेख ५३ वेळा आला आहे.  ठाणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील आदिवासीसमस्याही या आमदारांनी मांडल्या आहेत.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार पांडुरंग बरोरा.