महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी
जिल्हा धुळे (महसूल विभाग नाशिक) माविनि ०.६७१ मानवविकास स्थिती: अल्प
तक्ता १
आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.
माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८) त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.
क्र | आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ | एकूण प्रश्न | आरोग्य | शिक्षण | पाणी | शेती | बेरोजगारी | बालक | महिला | उपस्थितीची सरासरी % |
१ | कुणाल पाटील कॉं/ धुळे ग्रा | ८२ | ३ | ११ | ७ | ९ | २ | १ | ० | ६६ |
२ | अनिल गोटे/भाजप/धुळेशहर | २६ | १ | ० | ० | ० | १ | ० | ० | ९५ |
३ | धनाजी अहिरे /कॉं / साक्री | २२ | ० | २ | १ | १ | ० | १ | २ | ८८ |
४ | जयकुमार रावल /भाजप / सिंदखेडा / २०१६ पासून मंत्री | १४ | ० | ० | ० | १ | ० | ० | १ | ८७ |
५ | काशिराम पावरा/कॉं/ शिरपूर | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ८२ |
धुळे जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न | १४४ | ४ | १३ | ८ | ११ | ३ | २ | २ |
निरिक्षणे
- जिल्ह्यातून एकूण १४४ प्रश्न विचारले गेले. आमदार कुणाल पाटील यांनी सर्वाधिक ८२ प्रश्न विचारले. अभ्यासविषयांपैकी शिक्षण, पाणी आणि शेती या विषयांवर अनुक्रमे ११, ७ आणि ९ असे प्रश्नही फक्त त्यांनीच विचारले.
- वरील वर्गवारीत जिल्ह्यातून सर्वाधिक मांडले गेलेले १३ प्रश्न शिक्षणविषयक होते. महिला आणि बालक या विषयांवर प्रत्येकी २ प्रश्न विचारले गेले. धोरणविषयक प्रश्नही उपस्थित केले गेले नाहीत.
- गैरव्यवहारविषयक एकूण २३ पैकी सर्वाधिक १२ प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी विचारले विचारले.
- आमदार काशिराम पावरा यांनी एकही प्रश्न विचारला नाही.
- नंदुरबार जिल्ह्यातल्या आमदारांनी स्वतःच्या जिल्ह्यातील समस्यांबद्दल प्रश्न विचारले नसले, तरी आमदार कुणाल पाटील, जयकुमार रावल आणि धनाजी अहिरे या तिघांनी त्यांच्या शेजारील नंदुरबार जिल्ह्याबद्दल प्रत्येकी एक प्रश्न विचारला आहे.
- मुंबईचा उल्लेख ७ वेळा आला आहे. मुंबईतील जमिनीचे गैरव्यवहार, भूखंडांवरील अतिक्रमण, पोलीसदलाची फसवणूक अशा विषयांवरील प्रश्न आहेत.
- वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळे, जिप, महापालिकांमधला भ्रष्टाचार, जातपंचायतींचे निर्णय, तीर्थक्षेत्र परिसराचा विकास, शेतकर्यांचे नुकसान, अनुदान वगैरे.
- सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार अनिल गोटे.
तक्ता २
आमदारांची मतदारसंघातील कामगिरी
(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरीक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)
क्र | आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ | भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश | संकटप्रसंगी मदतीला धावणे | गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम |
१ | कुणाल पाटील कॉं / धुळे ग्रामीण १ | स्वीय सहायकामार्फत | हो | जलसिंचनाची कामे |
२ | अनिल गोटे / भाजप / धुळे शहर १ | सहज | सहसा नाही | धुळे शहारातील पांझरा नदीच्या दोन्ही काठाला लागून साडेपाच किलोमीटर लांबीचे रस्ते |
३ | जयकुमार रावल / भाजप / सिंदखेडा : मंत्री | सहज | हो | सिंचनव्यवस्था बळकट केली, बुराई नदी बारमाही केली, दळणवळणाची साधने सक्षम केली. एमआयडीसी मजबूत केली. |
४ | धनाजी अहिरे / कॉं / साक्री | सहज | सहसा नाही | नाही |
५ | काशिराम पावरा / कॉ / शिरपूर | सहज | सहसा नाही | नाही |
जिल्ह्यातील गाभ्याच्या सामाजिक समस्या (सरकारी माहितीअनुसार)
गरोदर मातांना मिळणारे लोह, फॉलिक अॅसिड यांचा अपुरा पुरवठा, ६ ते ९ महिने वयाच्या मुलांना मिळणारा अपुरा आहार, अपुरे बाललसीकरण, जन्मावेळचे बाळाचे कमी वजन, बालकांमधील ॲनिमिया, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीच्या वेळेची काळजी, जननी सुरक्षा योजनेचे लाभ न मिळणे, गर्भपात आणि मृतजन्म, स्त्री डॉक्टर्स आणि स्त्री शिक्षक यांचे अल्प प्रमाण, अतिरिक्त ANMयुक्त उपआरोग्यकेंद्रांची कमी संख्या, शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण एकूणपैकी अर्ध्यापेक्षा कमी, IHHL नसलेली टॉयलेट्स.