महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी
जिल्हा नंदुरबार (महसूल विभाग नाशिक ) माविनि ०.६०४ मानवविकास स्थिती: राज्यात सर्व जिल्ह्यांत अल्प
तक्ता १
आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.
माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.
क्र | आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ | एकूण प्रश्न | आरोग्य | शिक्षण | पाणी | शेती | बेरोजगारी | बालक | महिला | उपस्थितीची सरासरी % |
१ | सुरूपसिंग नाईक/ कॉं / नवापूर | १ | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ५२ |
२ | के सी पाडवी / कॉ /अक्कलकुवा | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ७७ |
३ | उदयसिंग पाडवी/ भाजप / शहादा | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ६७ |
४ | विजयकुमार गावित/भाजप/नंदुरबार | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ८७ |
जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न | १ | ० | ० | ० | ० | ० | ० | ० |
निरिक्षणे
- जिल्ह्यातून अवघा एक प्रश्न विचारला गेला. आमदार सुरूपसिंग नाईक यांनी २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात २२ डिसें रोजी विचारलेला हा प्रश्न यवतमाळ जिल्ह्याविषयीचा: उमरखेड (जि.यवतमाळ) तालुक्यातील पळशी, देवसरी व चिंचोली (संगम) या गावांचे पुनर्वसन करण्याबाबत.
- अन्य तीन आमदारांनी एकही प्रश्न उपस्थित केला नाही.
- वरील वर्गवारीत्ल्या कोणत्याही विषयाशी संबंधित एकही प्रश्न नंदुरबार जिल्ह्यातल्या आमदारांनी विचारलेला नाही. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील काही समस्यांविषयीचे प्रश्न धुळे जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केलेले दिसतात.
- नाशिक महसूल विभागातून विचारल्या गेलेल्या १० प्रश्नांत नंदुरबार जिल्ह्याचा उल्लेख आहे. यापैकी ६ प्रश्न विविध योजनांमधल्या घोटाळे-गैरव्यवहारांविषयीचे आहेत. आणि गुटखाविक्री, आदिवासी विद्यार्थ्याना वसतीगृहात प्रवेश, क्रीडाकेंद्र आणि पथदिवे या विषयांवर प्रत्येकी एकेक प्रश्न आहे.
- सर्वाधिक उपस्थिती आमदार विजयकुमार गावित यांची राहिली.
तक्ता २
आमदारांची मतदारसंघातील कामगिरी
(संपर्क जिल्हा प्रतिनिधीचे निरीक्षण आणि नागरिकांच्या मतांवर आधारित)
क्र | आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ | भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश | संकटप्रसंगी मदतीला धावणे | गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम |
१ | सुरूपसिंग नाईक / कॉं / नवापूर | त्यांच्या गावाला गेल्यास सहज | हो | नाही |
२ | के सी पाडवी / कॉ / अक्कलकुवा | सहज नाही | सहसा नाही | दळणवळण साधने सक्षम केली. |
३ | उदयसिंग पाडवी / भाजप / शहादा | सहज | हो | महत्वाचे पाच पूल बांधले. |
४ | विजयकुमार गावित भाजप / नंदुरबार | सहज नाही | नाही | नाही |
जिल्ह्यातील गाभ्याच्या सामाजिक समस्या (सरकारी माहितीअनुसार)
६ ते ९ महिने वयाच्या मुलांना मिळणारा आहार, बालकांमधील अतिसाराचे अधिक प्रमाण व त्यासंबंधी जागृती कमी, गावपातळीवरील आरोग्यव्यवस्था सक्षम नाही, महिलांमधीलमधील ॲनिमियाचं जास्त प्रमाण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीच्या वेळेची काळजी, गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी उपचार नसणे, महिलांमधील साक्षरतेचे अल्प प्रमाण फक्त ४१ टक्के शाळांमध्ये कम्प्युटर उपलब्ध, शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण पन्नास टक्क्यांच्या जवळ, मुलींचा शाळाप्रवेश, स्त्रीशिक्षकांची अनुपलब्धता, नव्या प्रा शाळा स्थापित न होणे, शाळांमधील खंडित वीजपुरवठा, सरकारी सेवांचा अपुरा वापर, अत्यल्प दरडोई उत्पन्न आणि राज्यात सर्वात अल्प मानव विकास निर्देशांक.