महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी
जिल्हा नांदेड (महसूल विभाग औरंगाबाद ): माविनि०.६५७ मानवविकास स्थिती: अल्प
आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.
माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८ ), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.
तक्ता १
क्र | आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ | एकूण प्रश्न | आरोग्य | शिक्षण | पाणी | शेती | बेरोजगारी | बालक | महिला | उपस्थितीची सरासरी % | |
१ | प्रतापराव चिखलीकर/ शिवसेना /लोह | ६४ | ५ | ३ | ६ | ३ | ० | ३ | ० | ८१ | |
२ | अमिता चव्हाण / कॉं /भोकर | ५८ | ५ | २ | ८ | ५ | ० | ४ | १ | ६८ | |
३ | सुभाष साबणे / शिवसेना / देगलूर | ४० | ० | ० | ३ | ३ | ० | ० | ० | ८५ | |
४ | डी पी सावंत / कॉं / नांदेड उत्तर | ३७ | ४ | २ | ३ | ३ | २ | १ | ० | ७७ | |
५ | वसंतराव चव्हाण / कॉं / नायगाव | २६ | १ | ० | ३ | ३ | १ | ० | ० | ६३ | |
६ | हेमंत पाटील / शिवसेना /नांदेड दक्षिण | १९ | १ | १ | ० | ० | ० | २ | ० | ८१ | |
७ | तुषार राठोड / भाजप /मुखेड | १८ | ६ | ० | ० | ० | ० | ० | १ | ८७ | |
८ | प्रदीप जाधव / राकॉं /किनवट | ७ | ० | ० | ० | १ | १ | ० | ० | ७९ | |
९ | नागेश पाटील अष्टीकर /शिवसेना/हदगाव | १ | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ७४ | |
नांदेड जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न | २७० | २२ | ८ | २३ | १८ | ४ | १० | २ |
निरिक्षणे
- जिल्ह्यातून एकूण २७० प्रश्न विचारले गेले. आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी सर्वाधिक ६४ प्रश्न विचारले. त्याखालोखाल आमदार अमिता चव्हाण यांनी एकूण ५८ प्रश्न विचारले. त्यांनी अभ्यासविषयांपैकी पाणी या विषयांवर सर्वाधिक ८, बालकांविषयी ३ आणि महिलाविषयक १, असे प्रश्न उपस्थित केले. त्या जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार.
- तुषार राठोड यांनी आरोग्य या विषयावर सर्वाधिक ६ प्रश्न विचारले.
- अन्य प्रश्नांत घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण ६७ प्रश्न विचारले गेले. यात, सर्वाधिक १४ प्रश्न आमदार सुभाष साबणे यांनी उपस्थित केले.
- धोरणविषयक २ प्रश्न आमदार डीपी सावंत यांचे. अंगणवाडी सेविकांचं निवृत्तीवय ६५ आणि शेतकरी कर्जमाफीच्या अटी आणि नियम शिथिल करण्याबातचे हे तारांकित प्रश्न २०१८ सालच्या पावसाळी अधिवेशनात मांडले गेले.
- सर्वात कमी, म्हणजे अवघा १ प्रश्न आमदार नागेश पाटील अष्टीकर यांचा.
- वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: पाणलोटाच्या कामांचा निकृष्ट दर्जा, शासकीय रिक्त पदे भरणे, रुग्णालयदुरुस्ती, रस्ते दुपदरीकरण, बंधार्याच्या जागेतील बदल, जिल्ह्याला कायमस्वरूपी पाणीपुरवठा वगैरे.
- सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार तुषार राठोड.
तक्ता २
आमदारांची मतदारसंघातील कामगिरी
(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरीक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)
क्र | आमदाराचे नाव पक्ष,मतदारसंघ | भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश | जिल्ह्यातील संकटप्रसंगी मदतीला धावणे | गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम |
१ | प्रतापराव चिखलीकर / शिवसेना /लोहा | होय | होय | लोहा-कंधार भागात रस्ते, जलयोजना व इतर विकासकामे केली. |
२ | अमिता चव्हाण / कॉं /भोकर | नाही | अपवादात्मक स्थितीत | रस्त्यांची कामे व भोकर शहरात फ्लायओव्हेरचे काम पूर्ण केले. |
३ | सुभाष साबणे / शिवसेना / देगलूर | होय | अपवादात्मक स्थितीत | सीमावर्ती भागात स्थानिक स्वराज्य संस्थाकडून नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष होते. अशा वेळी, पाठपुरावा केला. भाषिक कारण व इतर कारणांवरून वादाचे प्रसंग उद्भवल्यास स्वतः पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावले. |
४ | डी पी सावंत / कॉं / नांदेड उत्तर | नाही | अपवादात्मक स्थितीत | अंतर्गत रस्ते व जलयोजनांना निधी दिला. |
५ | वसंतराव चव्हाण / कॉं / नायगाव | होय | होय | नायगाव भागात रस्ते केले. शेतीयोजना लोकांपर्यंत पोचवल्या. |
६ | हेमंत पाटील / शिवसेना /नांदेड दक्षिण | होय | होय | रस्त्यांची कामे केली. गोदाकाठच्या शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडवला. |
७ | तुषार राठोड / भाजप /मुखेड | अपवादात्मक स्थितीत | अपवादात्मक स्थितीत | विशेष असे नाही. |
८ | प्रदीप जाधव / राकॉं /किनवट | होय | होय | आदिवासींसाठी विशेष शिबिरे घेऊन तसेच व्यक्तिगत संपर्कातून योजनांचा लाभ मिळवून दिला. |
९ | नागेश पाटील अष्टीकर /शिवसेना/हदगाव | होय | होय | रस्ते व जलयोजनांची कामे मार्गी लावली. |
निरिक्षणॆ
लेंडी प्रकल्प, चाफळी धरणाचे काम व्हायला हवे. विष्णुपुरी प्रकल्पाचे शेष काम पूर्ण होणे आवश्यक आहे. यासह जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न कायम आहे. मोठे उद्योगधंदे यायला हवेत.
जिल्ह्यातील गाभ्याच्या सामाजिक समस्या (सरकारी माहितीअनुसार)
गरोदर मातांची सर्व टप्प्यांवरील सर्व प्रकारची अपुरी काळजी, महिलांच्या गरोदरपणात, प्रसूतीवेळी, प्रसूतीपश्चात उद्भवणाऱ्या समस्या; पोलिओ सोडून अन्य लसीकरण;ॲनिमिया; गावपातळीवरील अपुरी आरोग्य व्यवस्था; शाळा सोडण्याचे मोठे प्रमाण; महिला शिक्षकांचे अल्प प्रमाण. महिलांची साक्षरता; IHHLविना घरांचे मोठे प्रमाण; अल्प दरडोई उत्पन्न.