महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी
जिल्हा नागपूर (महसूल विभाग नागपूर ): माविनि ०.७८६ मानवविकास स्थिती: अतिउच्च
आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.
माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८),
त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.
क्र | आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ | एकूण प्रश्न | आरोग्य | शिक्षण | पाणी | शेती | बेरोजगारी | बालक | महिला | उपस्थितीची सरासरी % | |
१ | सुनील केदार / कॉं / सावनेर | ७७ | ६ | १ | ३ | ६ | ० | २ | ० | ८९ | |
२ | डॉ मिलिंद माने / भाजप / नागपूर उ | ६५ | १० | ० | २ | ६ | ० | ६ | १ | ८५ | |
३ | सुधाकर देशमुख /भाजप / नागपूर प | ६३ | १३ | ६ | ४ | ४ | ४ | ० | ० | ९३ | |
४ | विकास कुंभारे / भाजप / नागपूर मध्य | ३१ | ३ | १ | १ | १ | ० | ० | ० | ९३ | |
५ | सुधाकर कोठले / भाजप / नागपूर द | ३० | ११ | २ | ० | ० | ० | १ | ० | ८५ | |
६ | समीर मेघे / भाजप / हिंगणा | १० | १ | ० | २ | १ | ० | ० | ० | ८७ | |
७ | मल्लिकार्जुन रेड्डी / भाजप / रामटेक | ८ | ० | १ | २ | २ | ० | ० | ० | ८३ | |
८ | सुधीर पारवे / भाजप / उमरेड | ७ | १ | ० | १ | ० | ० | ० | ० | ८९ | |
९ | कृष्णा खोपडे / भाजप / नागपूर पू | ६ | १ | ० | ० | ० | ० | ० | ० | ८१ | |
१० | डॉ आशिष देशमुख / भाजप / काटोल | ४ | १ | १ | ० | २ | ० | ० | ० | ८२ | |
११ | चंद्रशेखर बावनकुळे / भाजप / कामठी: मंत्री प्रश्न -उपस्थितीच्या नोंदी लागू नाहीत. | ||||||||||
१२ | देवेंद्र फडणवीस / भाजप / नागपूर द- प: मुख्यमंत्री प्रश्न -उपस्थितीच्या नोंदी लागू नाहीत. | ||||||||||
नागपूर जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न | ३०१ | ४७ | १२ | १५ | २२ | ४ | ९ | १ |
निरिक्षणे
- जिल्ह्यातून एकूण ३०१ प्रश्न विचारले गेले. वरील अभ्यासविषयांत, जिल्ह्यातून सर्वाधिक ४७ प्रश्न आरोग्यविषयक विचारले गेले. महिलाविषयक फक्त १ प्रश्न उपस्थित केला गेला. वरील वर्गवारीत नसलेल्या विषयांत, घोटाळे-गैरव्यवहारविषयक५८ प्रश्न मांडले गेले.
- आमदार सुनील केदार यांनी सर्वाधिक ७७ प्रश्न विचारले. त्या खालोखाल ६३ प्रश्न सुधाकर देशमुख यांनी उपस्थित केले. आरोग्यविषयक सर्वाधिक १३ प्रश्न त्यांनीच मांडले. शिक्षणविषयक सर्वाधिक ६ प्रश्नही त्यांचेच.
- जिल्ह्यातून धोरणविषयक ३ प्रश्न विचारले गेले. तपशील असा:
- राज्य शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत सिकलसेलचा समावेश, हा विदर्भाशी संबंधित प्रश्न १६ डिसें १५ रोजी डॉ मिलिंद माने यांनी उपस्थित केलेला.
- २००१ च्या लोकसंख्येवर आधारीत राज्यात आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखडयाबाबतचा तारांकित प्रश्न २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात ७ डिसें रोजी विकास कुंभारे यांनी विचारलेला.
- नव्याने लागू झालेल्या जीएसटी कराच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील भूखंड हस्तांतराणाच्या दरांमध्ये सुसंगती आणण्यासंबंधी २०१८ च्या पावसाळी अधिवेशनात २० जुलै रोजी उपस्थित झालेली लक्षवेधी सूचना सुधाकर कोठले यांची.
- सर्वात कमी, ४ प्रश्न आमदार डॉ आशिष देशमुख यांनी उपस्थित केले. एक अंकी प्रश्न विचारणारे अन्य आमदार: मल्लिकार्जुन रेड्डी ७, सुधीर पारवे ६ आणि कृष्णा खोपडे ६.
- वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: कन्हान नदीचे प्रदूषण, आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने देण्यात येणा-या गॅस सिलेंडर जोडण्यांमध्ये झालेला गैरव्यवहार, नागपूर शहरातील दीड लाख गुंतवणूकदारांचे ‘पॅन कार्ड क्लब लिमिटेड’ कंपनीत अडकलेले पैसे परत मिळण्याबाबत, दलित वस्ती सुधार योजनेतील अखर्चित निधी, विदर्भातील कोळशावर आधारित विद्युत निर्मिती संचांमुळे होणारे वायूप्रदूषण, वगैरे.
- सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे दोन आमदार सुधाकर देशमुख आणि विकास कुंभारे.