आमदारांची कामगिरी – नाशिक जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी:  

जिल्हा नाशिक  (महसूल विभाग नाशिक ): माविनि ०.७४६  मानवविकास स्थिती: अतिउच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
छगन भुजबळ/ राकॉं / येवला ८१ १२ ४३
निर्मला गावित / कॉं / इगतपुरी ६५ ८०
सीमा हिरे / भाजप / नाशिक प ६० ७७
अनिल कदम /शिवसेना / निफाड ५१ ७६
राजाभाऊ वाजे / शिवसेना / सिन्नर ४३ ९३
आसिफ रशीद / भाजप / मालेगाव मध्य ३९ ९४
पंकज भुजबळ / राकॉं / नांदगाव ३६ ७६
दीपिका चव्हाण / राकॉं / बागलाण ३२ १००
योगेश घोलप / शिवसेना / देवळाली २७ ८६
१०            देवयानी फरांदे / भाजप /  नाशिक मध्य १९ ८६
११ नरहरी झिरवाळ / राकॉं / दिंडोरी ८७
१२ डॉ राहुल अहेर / भाजप / चांदवड ६९
१३ बाळासाहेब सानप / भाजप / नाशिक पू ८२
१४ जीवा गावित/ मा कम्यु / कळवण ८१
१५ दादासाहेब भुसे/शिवसेना/मालेगाव बाह्य/: मंत्री प्रश्न आणि उपस्थिती नोंदी लागू नाहीत.                  
  नाशिक जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न ४७२ ३७ ३२ ३६ ३४ १४  

 निरिक्षणे

  • जिल्ह्यातले एकूण मतदारसंघ १५. त्यात ४ महिला आमदार आहेत.
  • जिल्ह्यातून एकूण ४७२ प्रश्न विचारले गेले. वरील वर्गावारीत सर्वाधिक ३७ प्रश्न आरोग्यविषयक होते.  त्या खालोखाल ३६ पाण्यावर, ३४ शेती आणि ३२ शिक्षणविषयक होते.  सर्वात कमी ५ प्रश्न बेरोजगारीविषयक होते.
  • आमदार छगन भुजबळ यांनी सर्वाधिक  ८१ प्रश्न विचारले. त्या खालोखाल ६५ प्रश्न आमदार निर्मला गावित यांचे. या दोघांसह १० आमदारांची प्रश्नसंख्या दोन अंकी आहे.  
  • सर्वात कमी, म्हणजे फक्त १ प्रश्न आमदार जीवा गावित यांनी मांडला. एक अंकी प्रश्नसंख्या असणारे अन्य ३ आमदार आहेत.
  • आरोग्यविषयक सर्वाधिक १२ प्रश्न आमदार छगन भुजबळ यांचे.  बालकांविषयी सर्वाधिक ४ प्रश्न  आमदार निर्मला गावित यांचे. महिलाविषयक सर्वाधिक ४ प्रश्न आमदार दीपिका चव्हाण यांचे.  
  • धोरणविषयक एकही प्रश्न विचारला गेला नाही. वरील वर्गवारीत नसलेल्या प्रश्नांपैकी जिल्ह्यातून घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण ६८ प्रश्न विचारले गेले. यात सर्वाधिक २१ प्रश्न सीमा हिरे यांनी विचारले.   
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: सिंहस्थ कुंभमेळा २०१५-१६ साठी राज्यशासनाने मंजूर केलेल्या निधीबाबत, निफाड तालुक्यात बिबट्यांचे मानवी वस्तीवर होणारे हल्ले,  मालेगाव (जि.नाशिक) या तालुक्यात तयार कापडाकरीता प्रोसेसिंग उद्योग सुरु करण्याबाबत, येवला (जि.नाशिक) येथे रेशीम पार्क उभारण्याबाबत, मौजे चाटोरी इथल्या पूरपीडित लोकांसाठी गावठाण,  गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत, नाशिक विमानतळावरील अत्याधुनिक टर्मिनलचे काम पूर्ण होवूनही विमान उड्डानाना अद्यापही सुरवात झाली नसल्याबाबत, द्राक्षबागांना वीजपुरवठा,  रोहित्रखरेदीतील नियमबाह्यता, श्रावणबाळ अर्थसहाय्य योजनेच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, नाशिक शहरातील मोटार सायकलींची चोरी वगैरे.
  • १०० टक्के उपस्थित राहाणार्‍या आमदार आहेत दीपिका चव्हाण. सर्व २८८ आमदारांत उपस्थितीत त्या पहिल्या क्रमांकावर आहेत.