महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी
जिल्हा परभणी (महसूल विभाग औरंगाबाद): माविनि ०.६८३ मानवविकास स्थिती: मध्यम
आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.
माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८ ),
त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.
तक्ता १
क्र | आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ | एकूण प्रश्न | आरोग्य | शिक्षण | पाणी | शेती | बेरोजगारी | बालक | महिला | उपस्थितीची सरासरी % | |
१ | डॉ . राहुल पाटील, शिवसेना / परभणी शहर | २४ | १ | ० | ४ | ६ | ० | ० | ० | ७७ | |
२ | विजय भामले, राकॉ / जिंतूर | १४ | ० | ० | १ | ० | ० | १ | ० | ६४ | |
३ | मोहन फड, शिवसेना / पाथरी | ९ | ० | ० | १ | ० | ० | ० | ० | ७१ | |
४ | मधुसूदन केंद्रे, राकॉ / गंगाखेड | २ | ० | ० | ० | ० | १ | ० | ० | ८२ | |
५ | परभणी जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न | ४९ | १ | 0 | ६ | ६ | १ | १ | ० |
निरिक्षणे
- जिल्ह्यातून एकूण ४९ प्रश्न विचारले गेले. आमदार राहुल पाटील यांनी सर्वाधिक २४ प्रश्न विचारले. पाणी आणि शेती या विषयांवर सर्वाधिक, प्रत्येकी ४ आणि ६ प्रश्न त्यांनीच विचारले.
- शिक्षण या विषयावर एकही प्रश्न मांडला गेला नाही. जिंतूर आणि सेलू तालुक्यात निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार पुरविण्यात आल्याबाबतचा हा प्रश्न आमदार विजय भामले २०१५ च्या पावसाळी अधिवेशनात १४ जुलै २०१५ ला विचारलेला तारांकित प्रश्न होता.
- धोरणविषयक, आणि महिला यांच्या समस्यांशी संबंधित एकही प्रश्न मांडला गेला नाही. घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण १३ प्रश्न मांडले गेले.
- सर्वात कमी म्हणजे २ प्रश्न आमदार मधुसूदन केंद्रे यांनी उपस्थित केले.
- औरंगाबाद महसूल विभागातील सर्व ८ जिल्ह्यांतून विचारल्या गेलेल्या एकूण प्रश्नांत सर्वात कमी प्रश्न परभणी जिल्ह्यतून विचारले गेले.
- वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: श्रीक्षेत्र माहूर येथील पांडव लेण्याची दुरवस्था, विहिरींचे प्रलंबित प्रकल्प, अखर्चित निधी, खंडित विद्युतपुरवठा, पाणीटंचाई, बोगस कर्जवाटप, रेशीम उत्पादक शेतकर्यांचे थकित अनुदान वगैरे.
- सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार मधुसूदन केंद्रे.
तक्ता २
आमदारांची मतदारसंघातील कामगिरी
(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरिक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)
क्र | आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ | भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश | जिल्ह्यातील संकटप्रसंगी मदतीला धावणे | गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम |
१ | डॉ . राहुल पाटील / शिवसेना / परभणी शहर | होय | होय | पावसात पूर येत असे. ते पाणी वाया जायचे. शिवाय परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत असे. या नाल्याची दुरुस्ती करत ते पाणी साठवता यावे, या दृष्टीने आमदार राहुल पाटील यांनी पुढाकार घेत काम केले.,पुणे येथील तज्ञांकडून लोकांना मोफत उपचार मिळवून दिले. अनेक शस्त्रक्रियाही केल्या.प्रश्नाचा पाठपुरावा |
२ | विजय भांबळे / राकॉ / जिंतूर | सहज नाही | अपवादात्मक स्थितीत | विशेष असे नाही |
३ | मोहन फड / शिवसेना /पथारी | होय | होय | आरोग्यसुविधा |
४ | मधुसूदन केंद्रे / राकॉ / गंगाखेड | होय | नाही | ‘गंगाखेड शुगर्स’ने शेतकऱ्यांच्या नावे कर्ज देताना रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार केवायसीची पूर्तता केली नव्हती. कर्जरक्कम शेतकऱ्यांच्या बचतखात्यांत जमा करून त्यांच्या परवानगीविनाच, पुन्हा ‘गंगाखेड शुगर्स’च्या खात्यात जमा करण्यात आली होती. ३२८ कोटी रुपयांचा हा घोटाळा आमदार केंद्रे यांनी उघडकीस आणला. यासह पीकविमा, दुष्काळामुळे पिकांचे झालेले नुकसान त्यांनी मांडले. |
निरिक्षणे
- परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न रखडलेले आहेत.
- जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याचा प्रश्न सातत्याने भेडसावतो आहे.
- रोजगाराच्या दृष्टीने मोठे उद्योग जिल्ह्यात यावेत अशी युवकांची अपेक्षा आहे. तो मार्गी लागणे आवश्यक आहे.