महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी
जिल्हा पालघर (महसूल विभाग कोकण):माविनि ०.८०० मानवविकास स्थिती: अति उच्च
आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.
माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.
क्र | आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ | एकूण प्रश्न | आरोग्य | शिक्षण | पाणी | शेती | बेरोजगारी | बालक | महिला | उपस्थितीची सरासरी % |
१ | पास्कल धनारे / भाजपा / डहाणू | ५० | ० | १ | ३ | १ | १ | ० | ० | ९० |
२ | विलास तारे / बविआ / बोईसर | ४० | ३ | ३ | ० | ३ | ० | १ | ० | ६० |
३ | हितेंद्र ठाकूर / बविआ / वसई | ३१ | ३ | ० | ३ | २ | ० | १ | ० | ५५ |
४ | क्षितीज ठाकूर / बविआ / नालासोपारा | १८ | ० | ० | १ | ० | ० | ० | ० | ६८ |
५ | कृष्णा घोडा / शिवसेना / पालघर | ९ | ० | ० | ० | ० | ० | १ | ० | ९६ |
६ | विष्णू सावरा/ भाजपा /विक्रमगड मंत्री. प्रश्न व उपस्थिती लागू नाही. | |||||||||
पालघर जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न | १४८ | ६ | ४ | ७ | ६ | १ | ३ | ० |
निरिक्षणे
- जिल्ह्यातून एकूण १४८ प्रश्न विचारले गेले. हा आदिवासीबहुल जिल्हा. जिल्ह्यातून आदिवासीविषयक एकूण १८ प्रश्न मांडले गेले.
- आमदार पास्कल धनारे यांनी सर्वाधिक ५० प्रश्न विचारले. अभ्यासविषयांमध्ये पाणी या विषयावर सर्वाधिक ३ प्रश्न त्यांनीच विचारले. घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण ४२ प्रश्न विचारले गेले. त्यापैकी सर्वाधिक २६ पास्कल धनारे यांनी मांडले.
- आरोग्यविषयक सर्वाधिक ३ प्रश्न प्रत्येकी आमदार विलास तारे आणि हितेंद्र ठाकूर यांनी विचारले. शिक्षण आणि शेतीविषयक सर्वाधिक ३ प्रश्न आमदार विलास तारे यांनी उपस्थित केले. तसेच, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पाणी या विषयावर सर्वाधिक ३ प्रश्न मांडले. सर्वात कमी, ९ प्रश्न विचारणारे आमदार कृष्णा घोडा.
- जिल्ह्यातून, महिलाविषयक आणि धोरणविषयक प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत.
- वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: समुद्रकिनारी बांधलेले धूपप्रतिबंधक बंधारे निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत, दमण बनावटीच्या दारु आणि बिअर बॉटलचे झाकण बदलून दारु विकणा-या टोळीला केलेली अटक, वसई तालुक्यात मंजूर झालेली पोलीस स्टेशन सुरु करण्याबाबत, जिल्ह्यातील तानसा, वैतरणा, सूर्या नदीपात्रातील वाळूउपसा, तारापूर अणुऊर्जा केंद्रामुळे बाधित झालेल्यांचं पुनर्वसन, आदिवासींच्या जमिनींबाबतचे गैरव्यवहार वगैरे.
- सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार पास्कल धनारे.