आमदारांची कामगिरी – पुणे जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी:

जिल्हा पुणे (महसूल विभाग पुणे):  माविनि ०.८१४ मानवविकास स्थिती: उच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील  अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
अजित पवार /राकॉ /बारामती ९२ १३ 3 ८८
मेधा कुलकर्णी /भाजप /कोथरूड ८१ ९५
संग्राम थोपटे /कॉं /भोर ७९ १३    १ ७३
बाबुराव पाचारणे/ भाजप /शिरूर ७३    ४ ८७
भीमराव तापकीर /भाजप /खडकवासला ७१ ८८
सुरेश गोरे / शिवसेना/खेड- आळंदी ६३    ३ ९५
दिलीप वळसेपाटील / राकॉ /आंबेगाव ६१    ६ ७८
राहुल कुल /रासप /दौंड ५१    ३ ९६
शरद सोनावणे / मनसे /जुन्नर ३६    १ ९२
१० विजय काळे / भाजप / शिवाजी नगर ३३    ० ८८
११ योगेश टिळेकर /भाजप /हडपसर २१    ० ७३
१२ संजय भेगडे /भाजप / मावळ १५    ०
१३ लक्ष्मण जगताप /भाजप /चिंचवड १४   १ ७१
१४ गौतम चाबुकस्वार /शिवसेना /पिंपरी ११   १ ९०
१५ जगदीश मुळीक /भाजप /वडगाव शेरी १०   ० ७७
१६ माधुरी मिसाळ /भाजप /पर्वती   ० ७५
१७ महेश लांडगे/अपक्ष /भोसरी   १ ८४
१८ दत्तात्रेय भारणे /राकॉ /इंदापूर    १ ८१
१९ विजय शिवतारे /शिवसेना/पुरंदर – मंत्री प्रश्न-उपस्थितीच्या नोंदी लागू नाहीत.                  
२० गिरीश बापट /भाजप /कसबा – मंत्री प्रश्न-उपस्थितीच्या नोंदी लागू नाहीत.                  
२१ दिलीप कांबळे /भाजप /पुणे छावणी – मंत्री प्रश्न-उपस्थितीच्या नोंदी लागू नाहीत.                  
पुणे जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न ७२७ ३१ ६३ ३८ ३० २१ १०  

 निरिक्षणे

  • जिल्ह्यातील एकूण मतदारसंघ २१. त्यापैकी २ मतदारंसंघांचं प्रतिनिधित्व महिला आमदारांनी केले.  
  • जिल्ह्यातून एकूण ७२७ प्रश्न विचारले गेले. अभ्यासविषयांत, वरील वर्गवारीत सर्वाधिक ६३ प्रश्न शिक्षणविषयक, त्या खालोखाल ३८ पाणीविषयक, ३१ आरोग्याविषयक, ३० शेतीविषयक, २१ बालकांसंबंधी आणि १० महिलाविषयक आहेत. सर्वात कमी ४ प्रश्न बेरोजगारीविषयक विचारले गेले.
  • आमदार अजित पवार यांनी सर्वाधिक ९२ प्रश्न विचारले. त्या खालोखाल, ८१ प्रश्न आमदार मेधा कुळकर्णी यांचे.  या दोघांसह एकूण ८ आमदारांची प्रश्नसंख्या पन्नासच्या वर आहे.  ३ आमदारांची प्रश्नसंख्या एक अंकी आहे.  सर्वात कमी, ३ प्रश्न विचारणारे आमदार दत्तात्रेय भारणे.
  • आमदार मेधा कुलकर्णी यांनी आरोग्यविषयक सर्वाधिक ६ प्रश्न मांडले. शिक्षणविषयक  सर्वाधिक १३, शेतीविषयक सर्वाधिक ८ प्रश्न आमदार अजित पवार यांनी उपस्थित केले.  
  • वरील वर्गवारीत समाविष्ट नाही असे घोटाळे-गैरव्यवहारविषयक १२२ प्रश्न जिल्ह्यातून उपस्थित केले गेले.  त्यात, आमदार बाबुराव पाचारणे यांनी  सर्वाधिक १९ प्रश्न मांडले.
  • धोरणविषयक मांडल्या गेलेल्या ६ प्रश्नांचा तपशील:
  • राज्यात जिल्हापातळीवर विद्यापीठ उपकेंद्रे सुरू करणे (२०१७ च्या बजेट अधिवेशनात ९ मार्च रोजी विचारलेला तारांकित प्रश्न) – आमदार बाबूराव पाचारणे.
  • राज्यातील अपंगांसाठीचा कृती आराखडा व धोरण प्रलंबित असल्याबाबत (२०१६ च्या हिवाळी अधिवेशनात १५ डिसें रोजी विचारलेला तारांकित प्रश्न)-  आमदार मेधा कुळकर्णी
  • ३ जानेवारी, २००९ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ७९ (अ) अन्वये निर्गमित केलेल्या पुर्नविकास नियमावलीत सहकारी संस्था आणि सदस्यांच्या हितासाठी आमूलाग्र बदल करणे (२०१८ च्या पावसाळी अधिवेशनात १५ जुलै रोजी मांडलेली लक्षवेधी सूचना) – आमदार मेधा कुळकर्णी
  • राज्यात कोणत्याही टोलनाक्यावर नागरिकांना ३ मिनिटापेक्षा जास्त काळ थांबावे लागल्यास टोल न घेताच सोडण्याचे धोरण लागू करण्याबाबत (२०१६ च्या बजेट अधिवेशनात ४ एप्रिल रोजी विचारलेला तारांकित प्रश्न) – आमदार राहुल कुल
  • इ-कचर्‍याच्या पुनर्वापराबाबतचे धोरण ठरवणे (२०१४ च्या हिवाळी अधिवेशनात मांडलेला तारांकित प्रश्न) – लक्ष्मण जगताप
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: क्रीडास्पर्धांच्या आयोजनासाठी बालेवाडी, पुणे विभागीय/जिल्हाक्रीडा संकुलातील मैदाने, हॉल इत्यादींचे भाड्याचे दर जास्त, कामशेत गावाच्या हद्दीतील जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत होणारे अनधिकृत उत्खनन, पिंपरी – चिंचवड शहरातील पवना व इंद्रायणी नद्या प्रदुषणाच्या विळख्यात, ससून सर्वोपचार रुग्णालय येथील विविध समस्या, पुणे जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्वच शाळांची वीज जोडणी तोडली असणे, रांजणगाव पंचतारांकीत एमआयडीसीमधील कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण, पुणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनयोग्यता प्रमाणपत्रे देताना झालेली अनियमितता, रुपी सहकारी बँकेच्या कर्मचा-यांकरिता स्वेच्छा निवृत्ती योजना लागू करणे, पुणे येथे मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ५०० चौ.फूटापर्यंतच्या सदनिकाधारकांचा मिळकतकर रद्द करणे,  आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव घटल्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आल्याबाबत, राज्यातील प्रत्येक जिल्हयातील एका गावाचा स्मार्ट दलित गाव म्हणून विकास करण्याच्या निर्णयाबाबत, राज्यातील प्रत्येक जिल्हयात अहिल्याबाई होळकर महिला बाजारपेठ स्थापन करणे, कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या मारेक-यांना अटक करण्याबाबत, वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे आमदार राहुल कुल.

जिल्ह्यातील गाभ्याच्या सामाजिक समस्या (सरकारी माहितीअनुसार)

महिला, पुरुष व बालके या सर्वांच्यात तीव्र ॲनिमियाग्रस्त असलेल्यांचे प्रमाण जास्त; प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अधिकारी निवास सुविधेचे प्रमाण कमी; एक-शिक्षकी शाळांची संख्या जास्त