आमदारांची कामगिरी – बीड जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी

जिल्हा बीड  (महसूल विभाग औरंगाबाद):माविनि ०.६७८ मानवविकास स्थिती: मध्यम

तक्ता १

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८ ),

त्यातील  अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा. आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
भीमराव धोंडे / भाजप / आष्टी ४३ ८९
लक्ष्मण पवार  / भाजप / गेवराई १० ८६
जयदत्त क्षीरसागर / राकॉ /  बीड ८०
संगीता ठोंबरे / भाजप / केज ८१
आर टी देशमुख / भाजप / माजलगाव ८६
पंकजा मुंडे / भाजप / परळी:   मंत्री       प्रश्न- उपस्थितीची नोंद लागू नाही.                  
  बीड जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न ७४  

निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण ७४ प्रश्न विचारले गेले. आमदार  भीमराव धोंडे यांनी सर्वाधिक ४२ प्रश्न विचारले. अभ्यासविषयांपैकी शिक्षण आणि पाणी या विषयांवर सर्वाधिक अनुक्रमे  ५ आणि ३ प्रश्नही त्यांनीच विचारले.
  • घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण ५ प्रश्न विचारले गेले. धोरणविषयक एकही प्रश्न विचारला गेला नाही. बेरोजगारी, बालक या विषयांवर प्रत्येकी एक आणि महिला आणि आरोग्य या विषयांवर प्रत्येकी दोन प्रश्न विचारले गेले.
  • सर्वात कमी, एकूण ३ प्रश्न आमदार आर टी देशमुख यांनी उपस्थित केले. त्यांनी  वरील वर्गवारीविषयी एकही प्रश्न विचारलेला नाही.  
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: मनरेगा योजनेतील बनावट मजुरांबाबत, विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या नावातील चुकांबाबत, राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती, देवस्थानांतील / साखर कारखान्यांतील गैरव्यवहार,  मोरांच्या अस्तित्वास धोका वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार भीमराव धोंडे.

तक्ता २

आमदारांची मतदारसंघातील कामगिरी

(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरीक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश संकटप्रसंगी मदतीला धावणे  गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम
भीमराव धोंडे / भाजप /आष्टी     स्वीय सहायकामार्फत नाही रस्ते कामांव्यतिरिक्त नाही.
लक्ष्मण पवार /भाजप / गेवराई   सहज होय जायकवाडी-गेवराई जलयोजनेला मंजुरी
 संगीता ठोंबरे /भाजप /  केज   सहज अपवादाने नाही  
आर.टी.देशमुख/ भाजप / माजलगाव  स्वीय सहायकामार्फत  अपवादाने     रस्ते कामांव्यतिरिक्त नाही

निरिक्षणे

बीड जिल्ह्यात एकूण सहा मतदारसंघ असून परळी मतदारसंघाच्या आमदार पंकजा मुंडे या सन २०१४ पासून राज्यात महिला व बालविकास तथा ग्रामविकास मंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. यासह बीड मतदारसंघाचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे नुकतेच रोजगार व फलोत्पादन मंत्री बनले आहेत. पालकमंत्री म्हणून काम करताना पंकजा यांनी जिल्ह्यात भरीव निधी आणला. परंतु, रोजगाराच्या अनुषंगाने तसेच जिल्हा विकासाच्या दृष्टीने एकही मोठा प्रकल्प सुरु झालेला नाही.

जिल्ह्यातील गाभ्याच्या सामाजिक समस्या (सरकारी माहितीअनुसार)

गरोदर मातांना आवश्यक अशा लोह, फॉलिक अॅसिडचा अपुरा पुरवठा; प्रसूतीपूर्व काळजी; गरोदरपणा, प्रसूती, प्रसूतीनंतर, या सर्व काळात उद्भवणाऱ्या समस्या; पदर जाणे व त्यावरील उपचार पुरेसे नसणे; किमान चार खाटा असलेली प्रथमिक आरोग्य केंद्रांची अपुरी संख्या; गरोदर महिलांमधील ॲनिमिया; शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण एकूणपैकी अर्ध्यापेक्षा कमी; अल्प दर डोई उत्पन्न. ऊसतोड कामगारांचा, स्थलांतर करणार्‍यांचा, दुष्काळग्रस्त जिल्हा.