आमदारांची कामगिरी – बुलढाणा जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी  

जिल्हा बुलढाणा (महसूल विभाग अमरावती):  माविनि ०.६८४ मानवविकास स्थिती: मध्यम

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र          आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
हर्षवर्धन सपकाळ / कॉं /बुलढाणा १५० १०   २३   १४   २   ५   ८७
संजय रायमुलकर/ भाजप /मेहकर ६२ ०   ४   ४   ०   ०   ८४
राहुल बोंद्रे  / कॉं / चिखली ५९ १२   १   ४   ०   ७६
डॉ शशिकांत खेडेकर/शिवसेना/ सिंदखेड राजा ४२   १   २   ६   २   १   १   ८४
आकाश फुंडकर/भाजप /खामगाव १७   ०   ३   ३   १   १   ०   ८८
चैनसुख संचेती/भाजप/मलकापूर १   ०   ०   ०   ०   ८८
डॉ संजय कुटे / भाजप / जळगाव जामोद ८९
  बुलढाणा जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न ३३२ १० २२ ४५ ३४ १०  

 निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण ३३२ प्रश्न विचारले गेले.  आमदार  हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वाधिक १५० म्हणजे तीन अंकी प्रश्न विचारले.  आमदार चैनसुख संचेती आणि डॉ संजय कुंटे यांनी प्रत्येकी अवघा १ प्रश्न विचारला. अन्य चार आमदारांची प्रश्नसंख्या दोन अंकी.
  • अभ्यासविषयांपैकी आरोग्य, शिक्षण, पाणी, शेती आणि बालक या विषयांवर अनुक्रमे ५, १०,२३,१४ आणि ५ असे सर्वाधिक प्रश्न  आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनीच उपस्थित केले.
  • महिलाविषयक एकच प्रश्न मांडला गेला. तो  डॉ शशिकांत खेडेकर यांनी विचारला.
  • धोरणविषयक प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत. अन्य प्रश्नांत घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण ३६ प्रश्न विचारले गेले.  यात, हर्षवर्धन सपकाळ सर्वाधिक १५ प्रश्न विचारले. 
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: खामगाव-शेगाव रस्त्याचे चौपदरीकरण,  खडकपूर्णा नदीवरील दगडी पुलाची दुरुस्ती, तालुक्यातील रिक्त पदे,  स्थानिक केबल नेटवर्कबद्दल,  सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनांतील गैरव्यवहार,  कृषीउत्पन्न बाजारसमितीची नियमबाह्य कामे,  प्राथमिक शिक्षिकेचा खून,  स्थानिक व्यायामशाळांची चौकशी, शेतकर्‍यांची विमा रक्कम वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थिती – आमदार डॉ संजय कुटे यांची.

तक्ता २

आमदारांची मतदारसंघातील कामगिरी

(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरीक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)

क्र आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश जिल्ह्यातील संकटप्रसंगी मदतीला धावणे गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगेलोकहिताचे काम
  १ हर्षवर्धन सपकाळ / कॉंग्रेस / बुलढाणा होय होय नालाजोड प्रकल्प
संजय रायमुलकर / सेना / मेहकर नाही होय नाही
राहुल बोंद्रे  / कॉं / चिखली होय होय नाही
डॉ शशिकांत खेडेकर / शिवसेना / सिंदखेड राजा होय होय नाही
आकाश फुंडकर/भाजप /खामगाव नाही नाही नाही
 ६     चैनसुख संचेती/ भाजप/ मलकापूर होय होय नाही
डॉ संजय कुटे / भाजप/ जळगाव जामोद होय होय नाही

          निरिक्षणे

  • जिल्ह्यातील बहुतांशी रस्ते अजूनही व्यवस्थित नाहीत.
  • ७० वर्षापूर्वी सर्वेक्षण झालेला रेल्वेमार्ग रखडलेला आहे. बुलढाणा येथून औरंगाबादला जोडणारा हा रेल्वेमार्ग होता. चिखली, बुलढाणा व मलकापूर अशा तीन मतदारसंघातून हा रेल्वेमार्ग प्रस्तावित होता. त्याचे काम रखडलेले आहे.
  • खारपानपट्टीचा प्रश्न – जिल्ह्यातील बहुतांशी भागात अतिक्षार असलेले पाणी आहे. ते पिण्यात आल्याने अनेक गंभीर आजार जडतात. त्या अनुषंगाने उपाययोजना होणे आवश्यक आहे.
  • उद्योग, रोजगार प्रश्न  सुटलेले  नाहीत.