महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी: जिल्हा भंडारा (महसूल विभाग नागपूर ):माविनि ०.७१८ मानवविकास स्थिती: मध्यम
आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.
माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८ ), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.
क्र | आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ | एकूण प्रश्न | आरोग्य | शिक्षण | पाणी | शेती | बेरोजगारी | बालक | महिला | उपस्थितीची सरासरी % | |
१ | चरण वाघमारे/ भाजप / तुमसर | ५४ | १ | ३ | ७ | ६ | ५ | ० | १ | ९८ | |
२ | राजेश काशीवर/भाजप/साकोली | २९ | १ | ० | ३ | ६ | १ | २ | ० | ९० | |
३ | रामचंद्र अवसरे/भाजपा / भंडारा | २१ | ० | ० | ३ | ३ | ० | २ | ० | ९६ | |
भंडारा जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न | १०४ | २ | ३ | १३ | १५ | ६ | ४ | १ |
निरिक्षणे
- जिल्ह्यातून एकूण १०४ प्रश्न विचारले गेले / आमदार चरण वाघमारे यांनी सर्वाधिक ५१ प्रश्न विचारले. जिल्ह्यातील तीनही आमदारांची प्रश्नसंख्या दोन अंकी आहे.
- वरील वर्गवारीत, जिल्ह्यातून शेती या विषयावर सर्वाधिक १४ आणि त्याखालोखाल पाणीविषयक १३ प्रश्न उपस्थित केले गेले. महिलाविषयक अवघा १ प्रश्न विवारला गेला.
- वरील वर्गवारीत समावेश नाही असे घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण २२ प्रश्न उपस्थित केले गेले. याच प्रकारे, अन्य प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: बावनथडी नदीवरील प्रकल्पाविषयी, तुमसर तालुक्यातील पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन, जिल्ह्यातील घरकुल वाटपाची प्रलंबित प्रकरणे, जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांना मानधन योजनेअंतर्गत मानधन न मिळाल्याबाबत, वगैरे.
- सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे आमदार चरण वाघमारे.