आमदारांची कामगिरी – मुंबई

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी:  

जिल्हा मुंबई (महसूल विभाग कोकण) : माविनि०.८४१ मानवविकास स्थिती: राज्यात सर्वोच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
सुनील शिंदे /शिवसेना / वरळी ८९ ११ ८४
अमीन पटेल / कॉं / मुंबादेवी ६० ८५
वर्षा गायकवाड /कॉं / धारावी ५८ ८९
अजय चौधरी / शिवसेना/ शिवडी ४६   ० ८६
मंगलप्रसाद लोढा  / भाजप / मलबार हिल ३९   ० ८७
कालिदास कोळंबकर /कॉंग्रेस/वडाळा ३६   १ ९५
राज पुरोहित /भाजप / कुलाबा २८   ० ८९
सदा सरवणकर / शिवसेना / माहीम १९   ० ८७
अॅड वारीस पठाण / एमआयएम / भायखळा १३   ० ७२
१० कॅप्टन आर सेलवन /भाजप / सायन-कोळीवाडा   ० ८५
मुंबई  जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न ३९५ ३७ ३८ १३   ५ ३०  

निरिक्षणे

 • जिल्ह्यातील १० मतदारसंघांपैकी एकाचे प्रतिनिधित्व महिला आमदार करतात.
 • जिल्ह्यातून एकूण ३९५ प्रश्न विचारले गेले.  यात सर्वाधिक ३७ प्रश्न आरोग्यविषयक आणि सर्वात कमी ३ प्रश्न बेरोजगारीविषयक आहेत.
 • आमदार सुनील शिंदे यांनी सर्वाधिक ८९ प्रश्न विचारले. आरोग्यविषयक सर्वाधिक ११, शिक्षणविषयक सर्वाधिक ९ प्रश्नदेखील त्यांच्याच नावावर आहेत.
 • बालकांबद्दल सर्वाधिक ८ प्रश्न आमदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केले.   
 • धोरणविषयक प्रश्न मांडले गेले नाहीत. घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण ४० प्रश्न मांडले गेले. त्यापैकी ८ आमदार अमीन पटेल आणि आमदार अजय चौधरी यांच्या नावावर जमा आहेत.
 • सर्वात कमी, ७ प्रश्न आमदार आर सेलवन यांच्या नावावर आहेत.
 • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: झुला मैदान, मदनपुरा येथील मैदानाच्या जागेत भूमिगत वाहनतळासाठी निविदा प्रक्रिया, जे.जे.रुग्णालयात अनुदानाअभावी औषधे व सर्जिकल साहित्यांची खरेदी न झाल्याबाबत व रुग्णालयात कर्करोग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत, मा.मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिकावाटप मंजुरीआदेश गहाळ झाल्याबाबत, काळाचौकी (मुंबई) येथे झोपडपट्टी पुनर्विकासाचे काम करतांना विकासकाने पापकोटेश्वर मंदिर जमिनदोस्त केल्याबाबत, मुंबईतील बंद कापड गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना हक्काची घरे देण्याबाबत, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या २७४ पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याबाबत, मच्छीमारांच्या समस्या, मुंबईतील दूधभेसळ, वीज आणि पाणीटंचाई, मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची दुरूस्ती आणि नूतनीकरण याचा निकृष्ट दर्जा, मुंबई शहराच्या चोहो बाजूंनी असलेल्या समुद्रात विलीन होणार्‍या मिठी, ओशिवरा, दहीसर व पोईर या नद्यांचे संवर्धन, समुद्रात मिसळणारा कचरा, प्लॅस्टीकच्या पिशव्या, बाटल्या यांना रोखणे, मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त आणि खासगी इमारती, बीआयटी चाळी, पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत येणा-या इमारती आणि  डोपडपट्ट्या व जुन्या चाळींच्या पुनर्विकासाबाबत, सन २००० पर्यंतच्या वैध झोपड्यांचा वरचा मजला नियमित करण्याबाबत वगैरे.
 • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार कालिदास कोळंबकर.

जिल्हा मुंबई उपनगर (महसूल विभाग कोकण): माविनि ०.८४१ मानवविकास स्थिती: अतिउच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
सुनील प्रभू / शिवसेना / दिंडोशी १६१ ११ १४ ८२
अतुल भातखळकर / भाजप / कांदिवली पू १२६ १३ ९९
अॅड आशिष शेलार / भाजप / वांद्रे प ११४ १२ १२ ९३
सरदार तारासिंग / भाजप / मुलुंड ९१  २ ९०
अस्लम शेख / कॉंग्रेस  / मालाड प ७९  १ ८५
योगेश सागर / भाजप / चारकोप ७५  ० ९४
संजय पोतनीस / शिवसेना / कालिना ५६  १ ६९
अमीत साटम / भाजप / अंधेरी प ५९  ० ९६
अबू आझमी /समाजवादी /मानखुर्द-शिवाजीनगर ४९  १ ९१
१० पराग अळवणी / भाजप /विलेपार्ले ४२ १०  ० ९२
११ मनिषा  चौधरी / शिवसेना / दहिसर ३५  ०       ० ९९
१२ रमेश लटके / शिवसेना / अंधेरी पू ३५  ० ९४
१३ अशोक पाटील / शिवसेना / भांडूप प ३३  ० ७६
१४ मंगेश कुडाळकर / शिवसेना / कुर्ला २४  १ ९६
१५ तृप्ती सावंत / शिवसेना / वांद्रे पू २२  १ ९५
१६ सुनील राऊत / शिवसेना / विक्रोळी २१  ० ९४
१७ तुकाराम काटे / शिवसेना / अणूशक्तीनगर २६  ० ९३
१८ प्रकाश फातर्पेकर /शिवसेना /  चेंबूर १६  १ ८१
१९ प्रकाश सुर्वे / शिवसेना / मागाठणे १५  ० ९३
२० डॉ भारती लव्हेकर /भाजप / वर्सोवा १२  ० ९२
२१ मोहम्मद आरिफ (नसीम) खान/ कॉंग्रेस / चांदिवली १०  ० ७७
२२ राम कदम / भाजप / घाटकोपर  प ५५
२३ प्रकाश मेहता / भाजप / घाटकोपर पू: मंत्री उपस्थिती व प्रश्न यांच्या नोंदी लागू नाहीत.                  
२४ रवींद्र वायकर / शिवसेना / जोगेश्वरी: मंत्री उपस्थिती व प्रश्न यांच्या नोंदी लागू नाहीत.                  
२५ विद्या ठाकूर / भाजप / गोरेगाव: मंत्री उपस्थिती व प्रश्न यांच्या नोंदी लागू नाहीत.                  
२६ विनोद तावडे / भाजप / बोरिवली: मंत्री उपस्थिती व प्रश्न यांच्या नोंदी लागू नाहीत.                  
मुंबई उपनगर जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न ११०१ ९० ८३ २८ १४ ४३ १३  

      निरिक्षणे

 • मतदारसंघांची संख्या विचारात घेता मुंबई उपनगर जिल्हा हा राज्यातला, सर्वात मोठा जिल्हा.  या जिल्ह्यातून विचारले गेलेले प्रश्न एकूण विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या टक्के आहेत.
 • जिल्ह्यातील २६ पैकी चार मतदारसंघांचे प्रतिनिधित्व महिला आमदार करतात. त्यापैकी एक मंत्री आहेत. शिवाय, चारपैकी दोन महिला आमदार, मनीषा चौधरी आणि त्यांनंतर डॉ भारती लव्हेकर या विधिमंडळाच्या महिला-बाल हक्क आणि कल्याण समितीच्या अध्यक्ष होत्या.
 • जिल्ह्यातून एकूण ११०१ प्रश्न विचारले गेले.  यापैकी, अभ्यासविषयांमध्ये सर्वाधिक ९०  प्रश्न  आरोग्यविषयक, त्या खालोखाल ८३ शिक्षणविषयक या आहेत.  सर्वात कमी ४ प्रश्न बेरोजगारीविषयक आहेत.
 • आमदार  सुनील प्रभू  यांनी सर्वाधिक १६१  प्रश्न विचारले. त्यांच्या खालोखाल १२६ प्रश्न आमदार अतुल भातखळकर आणि ११४ प्रश्न  आशिष शेलार यांच्या नावावर जमा आहेत. तीन अंकी प्रश्नसंख्या याच तीन आमदारांची आहे.  १८ आमदारांची प्रश्नसंख्या दोन अंकी आहे.  आमदार  राम कदम  यांच्या नावावर एकही प्रश्न नाही.   त्यांची उपस्थितीही  सर्वात कमी नोंदली आहे.
 • आरोग्यविषयक सर्वाधिक १३ प्रश्न अतुल भातखळकर यांनी मांडले.  पाणी या विषयावर सवाधिक ५ प्रश्न आमदार अस्लम शेख यांनी विचारले.  बालकांविषयी सर्वाधिक ६ आणि  शिक्षणविषयक सर्वाधिक १४ प्रश्न आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केले.
 • राज्यात होत असलेल्या बालविवाहांना प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांबाबतचा तारांकित प्रश्न १६ मार्च २०१६ रोजी नोंदलेला, अॅड आशिष शेलार यांनी विचारला आहे.
 • (महाराष्ट्र, हे देशातलं तिसरं श्रीमंत राज्य (दर डोई उत्पन्नाला अनुसरून) आहे. मात्र, बालविवाहांचं वाढतं प्रमाण असणार्‍या देशभरातल्या ७० जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातले  १६ जिल्हे आहेत. त्यात एक मुंबई उपनगर जिल्हा आहे.)
 • घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण २४७ प्रश्न उपस्थित केले गेले. यापैकी सर्वाधिक ४३ प्रश्न सरदार तारासिंग यांच्या नावावर आहेत.
 • धोरणविषयक एकूण ९ प्रश्नांपैकी आशिष शेलार यांच्या नावे सर्वाधिक ४ आहेत. धोरणविषयक प्रश्नांचे विषय असे: राज्यात ततृीयपथी कल्याण मंडळ कार्यान्वित करण्याबाबत, पाळणाघरांवर नियंत्रण ठेवणारी नियमावली करण्याबाबत, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता तसेच राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळण्याबाबत, राज्यात न्यायालयातील कामकाजाची भाषा व सर्व कायदे मराठीत करण्याबाबत, राज्यात मानसिक आरोग्य प्राधिकरण स्थापन करण्याबाबत, मुंबई शहराला लागणार्‍या एकूण विजेपैकी निम्मी वीज सौर उर्जेतून उपलब्ध करण्याबाबत, राज्यात अवयवदान चळवळ सक्रीय करण्याबाबत, राज्यातील बंद पडलेले लघुउद्योग सुरू करण्याबाबत,  संपूर्ण राज्यभर ‘आरे’ दुधाचा एकच ब्रॅण्ड विकसित करण्याबाबत, मुंबई विमानतळ परिसरात इमारतीच्या उंचीमर्यादेचे उल्लंघन करणा-या विकासकावर कारवाई करण्याबाबत,
 • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: राज्यातील अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय ६५ करण्यास सरकार करीत असलेली टाळाटाळ, विविध उपनगरांतील प्रलंबित / अपूर्ण झोपु प्रकल्प, विविध उपनगरांतील पुनर्विकास वा गृहनिर्माण प्रकल्पांमधील समस्या, विविध उपनगरांतील  अनधिकृत बांधकामे, चेंबूर, माहूल व अंबापाडा येथील रासायनिक कंपन्यांमुळे होणारे  घातक वायुप्रदषूण, टाटा रुग्णालयामध्ये कर्करोगावर उपचार घेण्यासाठी येणा-या रुग्णांच्या निवा-याची व्यवस्था करण्याबाबत,  मुंबई क्रिकेट असोसिएशनने एमएमआरडीएची परवानगी न घेता  करारनामा करुन मुंबईतील बीकेसी येथील जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याबाबत, मुंबईतील वाढत्या रहदारी आणि पार्किंगविषयक समस्यांवर उपाय,  पश्चिम द्रुतगती महामार्गाची झालेली दुरवस्था, मुंबईतील डोंगराळ भागांतील पाणीसमस्या, भेसळयुक्त दूध, रेनवॉटर हार्वेस्टिंग, राज्यातील पोलीस दलाचे आधुनिकिकरण करण्याबाबत, सेंट्रल लायब्ररी एशियाटीक सोसायटी येथे छतामधनू पाणी गळती होऊन शेकडो दुर्मिळ पुस्तके भिजल्याबाबत, चित्रपट अभिनेत्यांनी निर्मात्यांबरोबर केलेले करार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे नोंदविले जात नसल्याबाबत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ खेळाडुंबरोबरच्या करारांची नोंदणी मुद्रांक कार्यालयात करत नसल्याबाबत, मुंबईमधील रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ, मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात गभर्पात होत असल्याबाबत, मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील बेस्ट उपक्रम सेवेमध्ये सुधारणा करण्याबाबत, मुंबईत मानवी वस्तीमध्ये अजगरांचा वावर वाढल्याबाबत वगैरे.
 • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार अतुल भातखळकर.