आमदारांची कामगिरी – यवतमाळ जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी

जिल्हा यवतमाळ (महसूल विभाग अमरावती):  माविनि  ०.७०१ मानवविकास स्थिती: मध्यम

तक्ता १

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव/ पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
प्रो.डॉ अशोक वुइके /भाजप/ राळेगाव ५७ 3 ९३
मदन येरावार / भाजप /यवतमाळ ३७ ८०
राजू  तोडसम / भाजप /अरणी २२ ९४
राजेंद्र नाजरधाने / भाजप /उमरखेड ११ ९२
मनोहर  नाईक / राकॉं / पुसद ५५
संजीव  बोदकुरवार / भाजप / वणी ६०
  यवतमाळ जिल्ह्यातून एकूण विचारले गेलेले एकूण प्रश्न १३२ १७  

 निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण १३२ प्रश्न विचारले गेले. आमदार अशोक वुइके यांनी सर्वाधिक  ५७ प्रश्न विचारले.  त्यांनीच अभ्यासविषयांपैकी पाणी या विषयांवर सर्वाधिक  ९ प्रश्न  विचारले.
  • वरील वर्गवारीत, जिल्ह्यातून सर्वाधिक १६ प्रश्न पाण्याविषयी उपस्थित केले गेले.  महिलाविषयक अवघा १ प्रश्न मांडला गेला. आरोग्य आणि बेरोजगारी या विषयांवर एकही प्रश्न विचारला गेला नाही. धोरणविषयक प्रश्नही विचारले गेले नाहीत. अन्य प्रश्नांत घोटाळे-गैरव्यवहारविषयक ४१ प्रश्न विचारले गेले. यात, मदन येरावार सर्वाधिक १६ प्रश्न विचारले.  
  • सर्वात कमी, म्हणजे प्रत्येकी १  प्रश्न आमदार मनोहर नाईक आणि संजीव बोदकुरवार यांनी विचारला. अन्य तीन आमदारांची प्रश्नसंख्या दोन अंकी होती.
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: पैनगंगा नदीतील वाळूउपसा, ठक्करबाप्पा योजनेच्या कामामध्ये अनियमितता, आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचे शिक्षणसाहित्य विनावाटप पडून, अवैध गौण खनिज उत्खनन, लाकडांची चोरी, शेतकर्‍यांची विमा रक्कम  वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार अशोक वुइके.                                                                                                              

तक्ता

आमदारांची मतदारसंघातील कामगिरी

(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरीक्षणे त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)

क्र आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश जिल्ह्यातील संकटप्रसंगी मदतीला धावणे गेल्या वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम
डॉ अशोक वुइके /भाजप/ राळेगाव होय होय मतदारसंघात आदिवासी सूतगिरणी आणली.
मदन येरावार / भाजप /यवतमाळ होय होय विशेष असे काही नाही
राजू  तोडसम / भाजप /अरणी होय होय विशेष असे काही नाही
राजेंद्र नाजरधाने / भाजप /उमरखेड होय होय विशेष असे काही नाही
मनोहर  नाईक / राकॉं / पुसद होय होय विशेष असे काही नाही
संजीव  बोदकुलवार / भाजप / वणी नाही होय विशेष असे काही नाही

निरिक्षणे

  • रोजगाराचा प्रश्न कायम असून मोठे उद्योग जिल्ह्यात येणे अपेक्षित आहे.
  • शिक्षण, सिंचन आदी विषयांवरही प्रभावीपणे काम होणे अपेक्षित आहे.