आमदारांची कामगिरी – रायगड जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी:  जिल्हा रायगड (महसूल विभाग कोकण): माविनि ०.८०० मानवविकास स्थिती: अति उच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
प्रशांत ठाकूर / भाजप / पनवेल १५६ १० १३ १४ ९४
सुभाष पाटील / शेकाप / अलिबाग १३४ ११ ९४
मनोहर भोईर /शिवसेना / उरण १०५ १० ९१
भारत गोगावले / शिवसेना / महाड ४८ ८८
सुरेशबाबू लाड / राकॉं / कर्जत २६ ८४
धैर्यशील पाटील /शेकाप / पेण २४ ८८
अवधूत तटकरे /राकॉं / श्रीवर्धन ६२
विष्णू सावरा / भाजप / विक्रमगड: मंत्री उपस्थिती व प्रश्न यांच्या नोंदी लागू नाहीत.                  
रायगड जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न ५०१ २९ ३० ४० १८  

                  निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण ५०१ प्रश्न विचारले गेले.  अभ्यासविषयांमध्ये सर्वाधिक, ४० पाणीविषयक, त्याखालोखाल ३० प्रश्न शिक्षण आणि २९ प्रश्न आरोग्य या विषयांवर उपस्थित केले गेले.  ७ प्रश्न बालकांविषयी मांडले गेले.  
  • आमदार  प्रशांत ठाकूर यांनी सर्वाधिक  १५६ प्रश्न विचारले.  शिक्षणविषयक  सर्वाधिक १३ आणि पाणी या विषयावर सर्वाधिक १४ प्रश्न  त्यांच्याच नावावर आहेत.
  • आरोग्यविषयक सर्वाधिक ११ प्रश्न आमदार सुभाष पाटील यांनी उपस्थित केले.  त्यांनीच शेतीविषयक सर्वाधिक ७ प्रश्न मांडले.
  • घोटाळे – गैरव्यवहारविषयक एकूण ७० प्रश्न मांडले गेले. त्यापैकी सर्वाधिक २० आमदार सुभाष पाटील यांच्या नावावर आहेत.  जिल्ह्यातून महिलाविषयक आणि धोरणविषयक प्रश्न विचारले गेले नाहीत.
  • एकूण ७ पैकी ३ आमदारांची प्रश्नसंख्या तीन अंकी, अन्य तिघांची दोन अंकी आहे. सर्वात कमी, एक अंकी,  ८  प्रश्न आमदार अवधूत तटकरे  यांच्या नावे आहेत.
  • या ५०१ प्रश्नांत १८ वेळा आदिवासी हा शब्द आला आहे.  
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: निकृष्ट दर्जाची बांधकामे, विविध योजनांपासून वंचित राहिलेले लाभार्थी,  प्रलंबित अनुदाने, डहाणू येथील रिलायन्स थर्मल पॉवरच्या चिमणीतून पसरणाऱ्या राखयुक्त धुरामुळे पिकांवर होत असलेला दुष्परिणाम, तानसा नदीवर चांबळे, झाकीवली व मेट या ठिकाणी लघुपाटबंधारे बांधण्याबाबत, वसई, पालघर व डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याबाबत, वसई तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी मंजूर झालेली पोलीस स्टेशन सुरु करणेबाबत, मुंबईतील देवनार कत्तलखाना डहाणूच्या पुढे स्थलांतरीत करण्याबाबत, वैतरणा, सूर्या नदी व खाडी पात्रात अवैध वाळू उत्खनन होत असल्याबाबत वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार प्रशांत ठाकूर आणि सुभाष पाटील.