आमदारांची कामगिरी – लातूर जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी

 जिल्हा लातूर  (महसूल विभाग औरंगाबाद): माविनि ०.६६३ मानवविकास स्थिती:अल्प

तक्ता १

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८ )

 त्यातील  अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे

क्र आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
अमित देशमुख / कॉं /लातूर शहर ७४ ११ 8 ७०
बसवराज पाटील /कॉं /औसा ४६ ८०
सुधाकर भालेराव /भाजप /उदगीर ४१ ८८
त्रिंबक भिसे/ कॉं /लातूर ग्रामीण ४१ ५७
विनायक जाधव /अपक्ष/अहमदपूर १९ ८७
संभाजी पाटील निलंगेकर /भाजप /निलंगा: मंत्री. प्रश्न आणि उपस्थिती लागू नाही                  
  लातूर जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न    २२१ १५ १८ १९ १३ १७  

निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण २२१ प्रश्न विचारले गेले.  आमदार अमित देशमुख यांनी सर्वाधिक ७४ प्रश्न विचारले. अभ्यासविषयांतील आरोग्य, शिक्षण, पाणी, शेती आणि बालक यासंबंधी सर्वाधिक प्रश्न त्यांनीच विचारले. 
  • वरील वर्गवारीत, जिल्ह्यातून सर्वात जास्त १८ प्रश्न पाणीविषयक  आणि सर्वात कमी प्रश्न बेरोजगारी आणि महिला या विषयांवर प्रत्येकी २ विचारले गेले.  घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण १४ प्रश्न उपस्थित केले गेले.  धोरणविषयक एकही प्रश्न मांडला गेलेला नाही.
  • सर्वात कमी  प्रश्न आमदार  विनायकराव जाधव यांनी उपस्थित केले. सर्व ५ आमदारांनी दोन अंकी प्रश्न विचारले. एक अंकी  इतके कमी प्रश्न कोणाच्याही नावावर नाहीत.
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: लातूर जिपची बिकट आर्थिक स्थिती, जिल्हा पोलीसदलात भरती, पाणीटंचाई निवारण, वाळूउपसा, शेतकर्‍यांचे थकित अनुदान, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीरक्कम मिळण्यास विलंब वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार सुधाकर भालेराव.

तक्ता २

आमदारांची मतदारसंघातील कामगिरी

(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरिक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ भेटीसाठी सर्वसामान्यांना  सुलभ प्रवेश जिल्ह्यातील संकटप्रसंगी मदतीला धावणे गेल्या ५ वर्षांत केलेले, नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम
अमित देशमुख / कॉं /लातूर शहर नाही अपवादात्मक विशेष असे नाही
 बसवराज पाटील /कॉं /औसा  होय  होय विशेष असे नाही
सुधाकर भालेराव /भाजप /उदगीर  होय होय विशेषअसे  नाही
त्रिंबक भिसे/ कॉं /लातूर ग्रामीण  होय होय विशेष असे नाही
विनायक जाधव /अपक्ष/अहमदपूर  होय होय विशेष असे नाही
संभाजीपाटीलनिलंगेकर/भाजप/निलंगा: मंत्री होय होय रेल्वे कोचची फॅक्टरी मंजूर करून घेतली. त्याचे कामही सुरू आहे. या व्यवसायामुळे हजारोंना रोजगार उपलब्ध होतील.

       निरिक्षणे              

  • उजनीच्या पाण्याचा रखडलेला प्रश्न
  • रेल्वे बोगी निर्मिती प्रकल्पाला गती नाही 
  • माखनी योजना रखडलेली
  • लातूर-बार्शी रस्त्याचे कामही अपुरे.