आमदारांची कामगिरी – वर्धा जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी:  

जिल्हा वर्धा (महसूल विभाग नागपूर): माविनि ०.७२३ मानवविकास स्थिती: उच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८ ),

त्यातील  अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

  क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
  अमर काळे / कॉं /आर्वी ३७ ७९
समीर कुणावर /भाजप / हिंगण घाट २८ ९०
  डॉ . पंकज भोयर /भाजप / वर्धा ९०
रणजीत कांबळे / कॉं/  देवळी ५७
वर्धा जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न     ७४   

 निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण ७४ प्रश्न विचारले गेले.  यापैकी, सुमारे निम्मे प्रश्न वर्धा जिल्ह्यातील समस्यांविषयी आणि अन्य प्रश्न राज्यपातळीवरील वा इतर जिल्ह्यांविषयी होते.
  • आमदार अमर काळे  यांनी सर्वाधिक ३७ प्रश्न विचारले.  आमदार समीर कुणावर यांची २८ ही प्रश्नसंख्या दुसर्‍या क्रमांकाची. अन्य दोन आमदारांची प्रश्नसंख्या एक अंकी राहिली.
  • वरील वर्गवारीत जिल्ह्यातून सर्वाधिक ७ प्रश्न आरोग्यविषयक विचारले गेले. महिलाविषयक एकही प्रश्न विचारला गेला नाही.  धोरणविषयक प्रश्नही उपस्थित केले गेले नाहीत.
  • वरील वर्गवारीत समाविष्ट नसलेल्या प्रश्नांत घोटाळे-गैरव्यवहारविषयक १८ प्रश्न मांडले गेले.  वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या अन्य प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे:  सेवाग्राम विकास आराखडा, वणा नदीवरील पूलदुरुस्ती, वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जिल्हा परिषदेचे ९१ कोटी ३७ लक्ष रु अडकून असल्याबाबत,  विद्युत उपकेंद्रांना मंजुरी, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत, वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे दोन आमदार समीर कुणावर आणि पंकज भोयर.