आमदारांची कामगिरी – सांगली जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी:  

जिल्हा सांगली   (महसूल विभाग पुणे):  माविनि०.७४२  मानवविकास स्थिती: अति उच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
अनिल बाबर /शिवसेना /खानापूर ७९ १४ ११ ९०
जयंत पाटील /राकॉ /इस्लामपूर ७२ ८५
धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ /भाजप /सांगली ४४ ८५
डॉ.पतंगराव कदम /कॉं /पलुस -कडेगाव २०१७ पर्यंत आणि विश्वजित कदम २०१८ पासून ३९ ७१
शिवाजीराव नाईक /कॉं /शिराळा ३० ९३
सुरेश खाडे /भाजप /मिरज ८०
सुमन पाटील /राकॉ/तासगाव कवठे महांकाळ ६६
विलासराव जगताप /भाजप / जत ७७
सांगली जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न २८० १३ २८ २२ १०  

 निरिक्षणे

  • जिल्ह्यातील ८ मतदारसंघांपैकी एकाचे प्रतिनिधित्व महिला आमदार करत आहेत.
  • जिल्ह्यातून एकूण २८० प्रश्न विचारले गेले. आमदार अनिल बाबर यांनी सर्वाधिक ७९ प्रश्न उपस्थित केले.  त्या खालोखाल आमदार जयंत पाटील यांचे ७२ प्रश्न. ८ पैकी ५ आमदारांची प्रश्नसंख्या दोन अंकी आणि तिघांची एक अंकी आहे. सर्वात कमी, ३ प्रश्न आमदार विलासराव जगताप यांनी विचारले. 
  • अभ्यासविषयांतील, वरील वर्गवारीत, जिल्ह्यातून  पाणी या विषयावर सर्वाधिक २८ प्रश्न विचारले गेले. त्या खालोखाल,  शेतीविषयक २२, आरोग्यविषयक १३, बालकांविषयी १०, शिक्षणविषयक ७ प्रश्न उपस्थित केले गेले.  सर्वात  कमी, २ प्रश्न  महिलांविषयी मांडले गेले.
  • जिल्ह्यातून १ धोरणविषयक प्रश्न मांडला गेला. राज्यातील पाणीपट्टी दर व वीजदर यांमध्ये सुसूत्रता आणण्याचे धोरण आखले जावे. २०१६ च्या बजेट अधिवेशनातील १३ एप्रिलची ही लक्षवेधी सूचना.
  • वरील वर्गवारीत समाविष्ट नसलेल्या प्रश्नांत घोटाळे-गैरव्यवहारविषयक ३९ प्रश्न आहेत.  यात, धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ यांनी सर्वाधिक ११ प्रश्न उपस्थित केले आहेत. अन्य प्रश्न नमुन्यादाखल पुढीलप्रमाणे:  येरळा नदीतील वाळूउपशास विरोध करणा-यांना गंभीर मारहाण,  आरोग्यपंढरी अशी ओळख असलेल्या मिरज शहराला गॅस्ट्रोचा विळखा, विटा येथील भैरवनाथ यात्रा समितीच्या जागेची बेकायदेशीर विक्री, डॉ.वसंतदादा पाटील शेतकरी शिक्षण मंडळ या संस्थेने शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., कोकळे (सोनी) या साखर कारखान्यात अवैधपणे केलेली गुंतवणूक, आरेवाडी येथील  विरोबा मंदिर हे पर्यटन क्षेत्र होण्याबाबतचा प्रस्ताव, जिल्ह्यातील सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील १४ गावांच्या पुनर्वसनाबाबत  वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे आमदार शिवाजीराव नाईक.

जिल्ह्यातील गाभ्याच्या सामाजिक समस्या (सरकारी माहितीअनुसार)

BCG व गोवर यांच्या लसीकरणाचे प्रमाण कमी.