आमदारांची कामगिरी – सातारा जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी:

  जिल्हा सातारा  (महसूल विभाग पुणे ):  माविनि०.७४२ मानवविकास स्थिती: उच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९०), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
शशिकांत शिंदे  /राकॉ /कोरेगाव ५४       १ ८८
जयकुमार गोरे /कॉं /माण ५१ ७३
शंभूराज देसाई /शिवसेना /पाटण ५२ ८२
पृथ्विराज चव्हाण /कॉं /कराड द २४ ८५
शामराव पाटील /राकॉ /कराड उ १७ ८८
दीपक  चव्हाण /राकॉ /फलटण १६ ९३
मकरंद  पाटील /राकॉ /वाई ६४
शिवेंद्रसिंग भोसले / राकॉ /सातारा ३७
सातारा जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न २१५ १३ २२ १४  

                    निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण २१५ प्रश्न विचारले गेले.  अभ्यासविषयांतील वरील वर्गवारीत, सर्वाधिक २२ प्रश्न पाणी या विषयावर मांडले गेले. त्या खालोखाल १४ प्रश्न शेती आणि १३ प्रश्न शिक्षण या विषयांवर उपस्थित केले गेले. आरोग्यविषयक ७, बेरोजगारीवर २ आणि महिला या विषयावर १ प्रश्न विचारला गेला.
  • आमदार शशिकांत शिंदे यांनी सर्वाधिक ५४ प्रश्न उपस्थित केले.  त्या खालोखाल ५१ प्रश्न  आमदार जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांनी विचारले. आमदार शिवेंद्रसिंग भोसले यांनी एकही प्रश्न विचारला नाही. आमदार मकरंद पाटील यांची १ ही प्रश्नसंख्या वगळता अन्य आमदारांची प्रश्नसंख्या दोन अंकी होती.
  • वरील वर्गवारीखेरीजच्या अन्य प्रश्नांत, घोटाळे-गैरव्यवहारविषयक २६ प्रश्न विचारले गेले. त्यात,  शशिकांत शिंदे यांनी सर्वाधिक 8 प्रश्न उपस्थित केले. 
  • धोरणविषयक १ प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी विचारला. राज्य शासनाने जाहीर केलेल्या स्टार्ट अप धोरणाच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा उभारण्याबाबतचा, २०१८ च्या पावसाळी अधिवेशनातील हा तारांकित प्रश्न.
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे:  जिल्हा रुग्णालयात कर्करोग रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याबाबत, खटाव तालुक्यातील पिंगळी तलावातून गाळ काढण्याऐवजी होणारी वाळूची चोरी, जिल्हयातील पाणलोट कार्यक्रमांतर्गत बंधाऱ्यांची कामे ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण न केल्याबाबत, जिल्ह्यातील शिरवळ, लोणंद, फलटण व बारामती रस्त्याचे चौपदरीकरण, पाचगणी येथील महू धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, कोयना धरण प्रकल्प येथे भूकंपाच्या नोंदी घेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत, वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे आमदार दीपक चव्हाण.

जिल्ह्यातील गाभ्याच्या सामाजिक समस्या (सरकारी माहितीअनुसार)

स्तनपानाचे प्रमाण कमी; जन्मावेळी वजन कमी असण्याचे प्रमाण जास्त; महिला व बालके यांच्यासाठी शासकीय उपचार घेण्याचे प्रमाण कमी; वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी निवासव्यवस्था असण्याचे प्रमाण कमी.