आमदारांची कामगिरी – सिंधुदुर्ग जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी  

जिल्हा सिंधुदुर्ग (महसूल विभाग कोकण): माविनि ०.७५३ मानवविकास स्थिती: अतिउच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
नितेश राणे / कॉंग्रेस / कणकवली ११० ११ ७३
वैभव नाईक / शिवसेना / कुडाळ ५९ ८२
दीपक केसरकर / शिवसेना / सावंतवाडी: मंत्री प्रश्न, उपस्थिती या नोंदी लागू नाहीत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न १६९ १६ १०  

 निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण १६९ प्रश्न विचारले गेले.  अभ्यासविषयांपैकी शिक्षणविषयक सर्वाधिक १६ प्रश्न उपस्थित केले गेले.
  • आमदार नितेश राणे यांनी सर्वाधिक ११० प्रश्न उपस्थित केले.  त्यांनी शिक्षणविषयक सर्वाधिक ११ आणि पाणीविषयक सर्वाधिक ७ प्रश्न विचारले. आमदार वैभव नाईक यांनी  एकूण ५९ प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आरोग्यावर २, शिक्षणावर ५ आणि पाणी-शेतीविषयक प्रत्येकी ३ प्रश्न विचारले.
  • जिल्ह्यातून घोटाळे-गैरव्यवहारविषयक ३२ प्रश्न मांडले गेले. यापैकी २१ प्रश्न आमदार नितेश राणे यांनी विचारले. महिला आणि धोरणविषयक एकही प्रश्न विचारला गेला नाही.
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: माणगाव (ता कुडाळ) खो-यात दुकानवाड परिसरातील विस्थापितांचे  पुनर्वसन, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स मच्छीमारी करत असल्याबाबत, जिल्ह्यातील बेकायदेशीर दगडखाणी, आंबोली बस स्थानकात सोयीसुविधांचा अभाव, जिल्हयातील नापणे (ता.वैभववाडी), सावडाव (ता.कणकवली) व आंबोली (ता.सावंतवाडी) धबधब्याच्या ठिकाणी पयर्टन केंद्रे उभारण्याबाबत उपलब्ध करुन देण्याबाबत, आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतून शासनास प्राप्त झालेल्या जमिनीची नियमांचे उल्लंघन करुन विक्री केल्याबाबत, समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारे,  वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार वैभव नाईक.