आमदारांची कामगिरी – सोलापूर जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी:  

जिल्हा  सोलापूर  (महसूल विभाग पुणे ): माविनि ०.७२८ मानवविकास स्थिती: उच्च

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील  अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
भारत भालके /कॉं / पंढरपूर ६६ १४ १३ ८४
प्रणिती शिंदे /कॉं /सोलापूर शहर ६१ ७४
हनुमंत  डोळस /राकॉ /माळशिरस ३६ ८१
नारायण पाटील/ शिवसेना / करमाळा २७ ७१
बबनराव  शिंदे/ राकॉ /माढा २४ १३ ८७
गणपतराव  देशमुख/ शेकाप / सांगोले १६ ९४
रमेश कदम /राकॉ / मोहोळ  १३ ४५
सुभाष  देशमुख /भाजप /सोलापूर द १२ ८८
सिद्धराम म्हेत्रे /कॉं /अक्कलकोट ६६
१० दिलीप सोपल /राकॉ / बार्शी ७२
११ विजयकुमार देशमुख /भाजप /सोलापूर उ: मंत्री  प्रश्न-उपस्थितीच्या नोंदी लागू नाहीत.                  
सोलापूर जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न २५६ ११ १७ ३५ ३५  

निरिक्षणे

  • जिल्ह्यातील ११ मतदारसंघांपैकी एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व महिला आमदार करतात.
  • जिल्ह्यातून एकूण २५६ प्रश्न विचारले गेले. आमदार भारत भालके यांनी सर्वाधिक ६६ प्रश्न विचारले. महिलाविषयक एकमेव प्रश्न यांनीच मांडला. आमदार प्रणिती शिंदे यांची ५९ ही प्रश्नसंख्या दुसर्‍या क्रमांकावर आहे.    
  • अभ्यासविषयांत, पाणी या विषयावर सर्वाधिक ३५ प्रश्न आमदार भारत भालके यांनी, आरोग्य आणि शिक्षणविषयक प्रत्येकी ७, हे सर्वाधिक प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केले. शेतीविषयक सर्वाधिक १३ प्रश्न आमदार भारत भालके आणि बननराव शिंदे या दोघांनीही मांडले.
  • जिल्ह्यातून, घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण २६ प्रश्न उपस्थित केले गेले.  त्यात, आमदार भारत भालके यांनी सर्वाधिक ७ प्रश्न विचारले.
  • आमदार सिद्धराम म्हेत्रे  यांच्या नावावर अवघा १ प्रश्न आहे.    
  • धोरणविषयक २ प्रश्न प्रणिती शिंदे आणि हनुमंत डोळस यांनी उपस्थित केले. ते असे: राज्यात रेशन धान्यवितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याबाबत हा २०१५ च्या पावसाळी अधिवेशनात १४ जुलै रोजी मांडला गेला.  राज्यात प्रत्येक जिल्हयात सार्वजनिक-खाजगी सहभागातून वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबत हा २०१६ च्या हिवाळी अधिवेशनात ६ डिसें रोजी मांडला गेला.
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नपूर्णा योजनेचे धान्य वितरीत केले नाही, माण, भीमा या नद्यांसंबधित, उजनी जलाशयातील प्रदूषण, पंढरपूर नगरपालिकेचे मलनिस्सारण केंद्र बंद असल्यामुळे मैलामिश्रीत पाणी चंद्रभागा नदीत सोडले  गेले, मातंग समाजाच्या विविध समस्या, विडी कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबत, मंगळवेढा तालुक्यातील डाळिंबांच्या झाडांवर ‘तेलकट डाग’ या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याबाबत वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे आमदार गणपतराव देशमुख (वय ९२)