कर्फ्यु दरम्यान रूग्णांसाठी घरगुती जेवण देत केला मुलाचा वाढदिवस

 

रविवार, 22 मार्च रोजी शाहिदचा वाढदिवस. यावेळी नेमका याच दिवशी कर्फ्यु होता. उमरग्यातही हा कर्फ्यु काटेकोरपणे पाळण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यात दि. २१ व २२ हे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.अर्थात, जनता कर्फ्यु दिवशी हॉस्पिटल व मेडिकल वगळता सर्वच बाजारपेठ, हॉटेल, वाहतूक सेवाही बंद होती.


उमरग्यातल्या हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातून आलेले अनेक रुग्ण ऍडमिट होते. त्यांच्यासोबतीला थांबलेले नातेवाईकही होते. वाहतूक बंद असल्याने गावाकडून कुणाचा जेवणाचा डबाही येऊ शकत नव्हता. तर रुग्णालय परिसरातील व शहरातील सर्व हॉटेल बंद असल्यामुळे या रुग्णांना व रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांना उपाशीपोटी बसावे लागत होते. हे कळल्यावर उमरगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा मुजावर यांनी रुग्णांसाठी घरगुती भोजनाची व्यवस्था केली. याच दिवशी त्यांचा मुलगा शाहिद याचाही वाढदिवस होता. त्यामुळे त्याच्या हस्तेच त्यांनी भोजन वाटप केलं. आणि मुलाचा वाढदिवसही आगळ्या पद्धतीने साजरा केला.

गिरीश भगत, उस्मानाबाद

Leave a Reply