काळजी करू नका, आपण सगळे सोबत आहोत

 

साईबाबा संस्थानकडून ५१ कोटी रुपये.
सहा हजार पोलिसांसाठी अन्न पाकिटे.
मोहटादेवी संस्थानाकडून ५१ लाख रुपये.
जैन समाज आणि भारतीय जनता पक्षांतर्फे मोफत अन्नछत्र.पोलीस तसंच भारत पवार मित्रमंडळ, व्यंकटेश फाऊंडेशनकडून तृतीयपंथीयांना, गरिबांना जीवनाश्यक वस्तूंचं वाटप.
पारनेर तालुक्यातील सुप्यात औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना मोफत किराणा आणि औषधं.
रोजगार बंद झाल्यानं मध्यप्रदेशात पायी परतत असलेल्या पंचवीस मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची श्रीगोंद्यातल्या तरुणांकडून सोय.


राहुरीत मुस्लीम पंच फाऊंडेशनकडून शंभर कुटुंबाना एक लाख रुपयांचा किराणा. शेवगावात पठाण बंधूंकडून गोरगरीब, विकलांग, मनोरुग्ण, भिकाऱ्यांना अन्नाची पाकिटे.
शिवभोजन केंद्रचालक साईनाथ घोरपडे मोफत थाळी देत आहेत.
नगर शहरातील विघ्नहर्ता रुग्णालयात कामगारांसाठी जेवण.


कोरोना संकटावर मात करण्यासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी नगरमध्ये हजारो हात पुढे आले आहेत. ज्याला जसं जमतंय त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या परीनं मदत करत आहे.
”संकटकाळात गरजूंना मदत करण्याचा मानवधर्म पाळला पाहिजे.”सामाजिक कार्यकर्ते भारत पवार सांगतात. ”मजुरांना शक्य तेवढे साहित्य मोफत देण्याचा प्रयत्न आहे.”

-सूर्यकांत नेटके, अहमदनगर

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading