कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

 

अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया प्रांतातल्या सॅन जोस शहरात आम्ही राहतो. पूर्वी इथले रस्ते गजबजलेले असायचे. आता मात्र परिसर सुनसान आहे. एखाद्दुसराच माणूस दिसतो, तेही मास्क आणि ग्लोव्हज घातलेला. फक्त एखाद-दुसरी गाडीच रस्त्यावरून जाता-येताना दिसते. रस्त्यावर गाड्या stand-still आहेत. जणू सगळे जीवनच stand-still झाले आहे.
इतना सन्नाटा छाया है I
कि डर सा लगने लगा है II
धान्य आणि भाज्यांची ग्रोसरी स्टोअर्स चालू आहेत पण फक्त ७ वाजेपर्यंतच. Subway, Safeway, Star Buck, Cost Co etc. चालू आहेत. हॉटेलसुद्धा काही काही चालू आहेत. पण फक्त Home-Delivery किंवा स्वतः जाऊन आणणे. कॉफी शॉप पण Drive-in….म्हणजे गाडीत बसून ऑर्डर देणे व पुढे जाऊन गाडीत बसूनच आपली ऑर्डर पिक अप करणे.


इंडिअन ग्रोसरीइजसुद्धा एका वेळी एकालाच सोडतात. ते पण प्रथम थर्मल स्कॅनरने टेम्परेचर चेक करून, सॅनीटाइजरने हात स्वच्छ करून मग आत घेतात. पूर्वीप्रमाणे वस्तू बॅग्समध्ये देत नाहीत तर कार्टमध्ये टाकूनच देतात. Bill-Counter ला सुद्धा Plastic Bans उभे केले आहेत. सगळे मास्क आणि ग्लोव्हज घालूनच असतात. क्रेडिट कार्ड एका डब्यात घालून द्यायचे मग ते स्वॅप करून कार्ड आणि पावतीसुद्धा डब्यातच देतात. किंवा फोनवर सामानाची यादी दिली तर ते विशिष्ठ वेळ देतात. आपण पार्किंगमध्ये जायचं. ते तिथे सामान घेऊन येतात. आपलं सामान गाडीच्या डिकीतच डिलिव्हर करतात आणि पैसे घेऊन जातात. ऑनलाईन पेमेंटची सोय आहेच.


इथेही लोक घाबरलेले आहेतच. हे कधी संपणार हे प्रश्नचिन्ह सगळ्यांपुढेच आहे. तरीही या परिस्थितीतही लोक सहकार्य आहेत. सरकारच्या आदेशांचे पालन करतात. अमेरिकेत State wise Lockdown आहे. बाधित लोकांच्या टक्केवारीप्रमाणे लॉकडाऊन लागू केले आहे. पण तरीही अमेरिका भूखंड मोठा असल्यामुळे कंट्रोल करण्यास कठीण जात आहे. तरीही प्रयत्न चालू आहेत. वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. वरचेवर बातम्या दाखवल्या जातात.
माझ्या मुलांचे Work from home चालू आहे. ऑफिस, मॉल्स, शाळा, पार्क्स, गार्डन्स, लायब्ररीज, देवळं, चर्च सगळी सार्वजनिक ठिकाणं बंद आहेत. कायम घरातच राहावं लागत असल्याने सगळेच कंटाळले आहेत. मुलांना सध्या अभ्यास नाही, मित्रांना भेटता येत नाही की बाहेर जाऊन खेळता येत नाही म्हणून ती चिडचिडी होत आहेत. माझी नात तर अजून वर्षाचीही नाही तरी पार्कमध्ये जाण्याचा हट्ट करते. तिला सवय झालेली होती ना? मुलगा व सून मित्रांसोबत Group Video Call करतात. आम्हीही नातलगांसोबत Group Video Call करतो आणि त्यातच समाधान मानतो.
‘Be-Positive’ असं बोलण जरी सोप असलं तरी अवलंबणं कठीण आहे. तरीही आशावादी रहा. प्रत्येक रात्रीनंतर आशेचा सूर्य उगवतोच. त्यामुळे धीर सोडू नका पण गाफिलही राहू नका. सरकारच्या आदेशांचं पालन करा. गरज असेल तरच बाहेर पडा. ‘स्व’ सुरक्षा हवी असेल तर ‘स्व’ पासूनच नियमही पाळा. घरातच बसून किती तरी Creative Work करता येतं. उदा. कोडे सोडवा, सुंदर चित्र काढा, लिखाण करा, डायरी लिहा, कपडे शिवा, विणकाम-भरतकाम करा. या सर्व गोष्टी What app वर Share करा. मी स्वतः १० ते १२ कविता केल्या, लेखही लिहिले आहेत. स्वनिर्मितीचा आनंद काही वेगळाच असतो. शेवटी सर्व तारणहार देव आहेच. त्याचे चिंतन करा. वेळ मिळाला आहे तर तुमचा सत्कारणी घालवा. सर्वम शुभम भवतु.

-छाया शहा, अमेरिका

Leave a Reply