कोरोना युद्धातले देवदूत

 

नागपुरातील होमिओपॅथी डॉक्टर रिता सूपसांडे. या लॉकडाऊन काळात खऱ्या अर्थाने आपल्या डॉक्टरी पेशाला शोभेल असं काम सुरू केलं. एकीकडे क्लिनिक सुरू ठेवलं आणि ते काम सांभाळून घराबाहेर पडून गरजू लोकांना सेवा देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. यासाठी सर्वप्रथम त्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधांचा साठा जमा केला. दोन असिस्टंट डॉक्टरांना सोबत घेऊन खुर्द गावात त्यांनी २५०/३०० लोकांची तपासणी करून मोफत औषधवाटप केलं.


त्यानंतर त्यांनी बंदोबस्तात असणाऱ्या पोलीसांपर्यत पोहोचून रोगप्रतिकारक औषधांचं वाटप सुरू केलं. आतापर्यत शहरातील ८ ते ९ पोलीस ठाण्यापर्यतच त्या पोहोचू शकल्या आहेत. शिवाय त्या प्रत्येक चौकात तैनात असलेल्या पोलीसांना व गरजूंनाही मोफत औषध वाटप करीत आहेत. रोज त्या ३०० /३५० लोकांपर्यत न थकता औषध वाटप करत असतात.

डॉ.रिता या औषध वितरणाव्यतिरीक्त पोलीसांना दिवसभर औषधीयुक्त गुळाचा चहा व आंबील (ज्वारीच्या पिठाचे सूप) वाटप करतात. पोलीसांना फ्रेश वाटावं, त्यांचा थकवा नाहीसा व्हावा हा यामागचा उद्देश. या सेवाकार्यात डॉ.रिता यांचे पती प्रशांत सुद्धा प्रत्येक पोलीस ठाण्यात चहा व आंबील पोहोचविण्याचे काम करत आहेत. शिवाय खारीचा वाटा म्हणून त्यांची ९ वर्षाची चिमुकली सुद्धा मुरमुऱ्याचा कच्चा चिवडा बनवून पोलीसांकरीता पाठवते. हे सेवादानाचे कार्य हे सुपसांडे कुटुंब स्वखर्चाने करीत आहे. लॉकडाऊन संपेपर्यत व त्यानंतरही गरजूंना मदत पुरविण्याचा त्यांचा मानस आहे.

– निता सोनवणे, नागपुर

Leave a Reply