दुबई टूरसाठी वाचवलेली रक्कम दिली कोरोना निधीसाठी!

 

सोलापूरच्या मुरारजी पेठ परिसरात राहणारे विजय कुंदन जाधव. वय ३०. एमबीए आणि तीन विषयात एमए. सोलापूरमधल्या अनेक सामाजिक उपक्रमातलं आघाडीचं नाव.
भ्रमंतीची, विशेषतः गिर्यारोहणाची त्यांना आवड. विजय यांचं दुबईला जाण्याचं नियोजन सुरू होतं. त्यासाठी एक लाख रुपयांची मुदतठेव ठेवली होती. मात्र कोरोनाचं संकट आलं. आता गरजूंसाठी निधीची गरज असल्याचं त्यांनी ओळखलं. त्यांनी एफडी मोडली. पंतप्रधान आपत्ती निवारण निधीसाठी आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये त्यांनी दिले.


उरलेली रक्कम आणि ऑनलाईन माध्यमातून जमवलेला काही मदतनिधी शहरातल्या गरिबांसाठी वापरला जाणार आहे. त्यासाठी विजय यांच्या गिरिकर्णिका फाऊंडेशन आणि सेव्ह सोलापूर सिटीझन फोरम या संस्था काम करत आहे.
गिरिकर्णिका फाऊंडेशन पर्यावरणासाठी काम करते. १० हजार झाडं संस्थेनं लावली आहेत. सेव्ह सोलापूर सिटीझन फोरम शहर विकासासाठी काम करते
सध्याच्या संकटात या संस्थांनी ‘मिशन एक टन रेशन’ ही संकल्पना मांडली आहे. गरजूंच्या अन्नपाण्यासाठी शिधा गोळा करण्याकरिता.
”संकटाच्या काळात सर्वच सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत.”विजय जाधव सांगतात. ”त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकानं मदत केली तर हे संकट नक्कीच टळेल.”

Leave a Reply