कोरोनाची महामारी आटोक्यात आणल्याबद्दल आत्ता धारावीची चर्चा आहे. धारावीत गेली ३५ वर्ष वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि आत्ता, धारावीने आरोग्यासाठी दिलेल्या लढ्यातले एक भागीदार डॉ कैलास गौड सांगाताहेत, धारावीची गोष्ट.
गरीब मजूर ही इथली एकच जात
दीडशे वर्षांचा इतिहास असलेली धारावी. या उद्योगनगरीने कोरोनासारख्या कृत्रिम आणि नैसर्गिक अशा बऱ्याच संकटांचा सामना केलेला आहे. शतकापूर्वीच प्लेगचं संकटही या धारावीने अनुभवलं आहे. एके काळी नको असणार्या या भूखंडाचा उपयोग गुन्हेगार लपून राहण्यासाठी करत असत. चार रेल्वे स्टेशन्स (माहीम, माटुंगा, शीव, कुर्ला) आणी दोन द्रुतगती मार्ग (पूर्व आणि पश्चिम) यांना लागून असलेली ही धारावी. इथे मूळ कोळी समाजाचा कोळीवाडा अस्तित्वात होता. माहीमच्या खाडीतून मच्छिमारी करणारा समाज इथे राहत होता. मुंबईत आल्यावर हक्काने आपलं घर करून रहावं, आपला उद्योग चालवावा, असं हे ठिकाण. दुर्गंधी असणाऱ्या कामासाठी आपल्या या कक्कया आणि रोहिदास समाजबांधवानी निवडलेली ही जागा.

पहिला कोरोनारुग्ण सापडला आणि…
मार्च महिन्याचा तिसरा आठवडा. धारावीतला पहिला कोरोनाचा रुग्ण डॉ. बालिगानगर या आठ इमारती असलेल्या वसाहतीत आढळला. त्याला दिल्ली प्रवासाचा इतिहास होता. तो ज्या कुटुंबासोबत राहिला होता, त्या कुटुंबाला कोरोनाची लागण झालेली होती. मुंबईत झपाट्याने रुग्णसंख्या वाढत होती, तशीच धारावीतही रुग्णसंख्या वाढायला लागली होती.

परिस्थिती सुधरू लागली
पोलिसांवर ताण वाढत होता. शहरातली वाहतूक थांबलेली. खाजगी डॉक्टर्स, हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि कर्मचारी धारावीत येऊ शकत नव्हते. त्यामुळे सर्व दवाखाने बंद होते. वयस्कर डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवले. धारावीतील तीनशे डॉक्टरांपैकी जेमतेम चार-पाच डॉक्टर्स दवाखाने उघडे ठेवत होते, त्यांपैकी मी एक होतो.
हे श्रेय प्रत्येकाचं आणि सगळ्यांचंच..
गेला आठवडा रुग्णवाढीचा वेग मंदावलाय. तरीही, कोरोना धारावीतून गेला, असं म्हणता येणार नाही. पण, तो नक्कीच जाईल. आपण नियम पाळले तरच.
एवढ्या मोठया प्रमाणात वाढत असलेला कोरोना धारावीत रोखला गेला. मग हे यश कुणाचं, असा प्रश्न नेहमी विचारला जातो.
आम्ही डॉक्टर्सनी आशा वर्कर्सबरोबर धारावी पिंजून काढली
आज, धारावीत कोविड होऊन बरे झालेले कितीतरी लोक आवर्जून भेटायला येतात. माझ्या तपासणीमुळे, समुपदेशनामुळे जिवंत असल्याचं सांगतात, तेव्हा मला विलक्षण समाधान वाटतं. धारावीत मार्चअखेरीलाच कोरोनाच्या धोक्याची घंटा वाजू लागल्यावर महापालिकेचा मास्टर प्लान तयार होऊ लागला.

आम्ही खंबीर आणि पेशंट्स धिराचे
संशयित रुग्ण महापालिकेच्या पथकाकडे स्वॅब तपासणीकरता जायला कधी कधी घाबरायचे. कारण चौदा दिवसांचं विलगीकरण किंवा सायन हॉस्पीटलमध्ये भरती झालं की मृतावस्थेतच बाहेर येणार हा लोकांचा गैरसमज असायचा. या लोकांना ‘तुमची चाचणी आणि उपचार मोफत होणार आहेत. तुम्हांला हॉस्पीटलमध्ये व्यवस्थित उपचार मिळतील आणि तुम्ही बरे होणार’ हा विश्वास आम्ही डॉक्टर्सनी दिला.

आम्हांला एकमेकींचा आणि कुटुंबाचा आधार.
धारावीतले रुग्ण वाढायला लागले तेव्हा, काम करताना माझ्याबरोबरच्या दोघींना कोरोनाची लागण झाली. भीतीने मी पाच दिवस कामावरच गेले नाही. माझ्या नवर्याने मला धीर दिला. “एवढ्या मोठ्या पोलिओ निर्मूलनाच्या कामात होतीस आणि आता का मागे हटतेस? मी तुझ्यासोबत आहे”. त्यांच्या शब्दांमुळं मला हिंमत आली.

सामूहिक कामाचा परिणाम
माझा जन्मच धारावीतला. त्यामुळे धारावीची पहिल्यापासूनच तपशिलात माहिती होती. त्यामुळे, कोविडकाळात काम सुरू करणं, त्यासाठी इतरांची मदत घेणं, लोकांपर्यंत पोचणं सोपं गेलं. माझ्या परिसरातील लोकांसाठी मी ते कर्तव्य भावनेनेच केलं. धारावीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण सुरू झाली आणि आमचा धारावी कलेक्टिव्ह ॲक्शन गृप सज्ज झाला. धारावीसारख्या भागात क्वॉरंटाईन राहणे, एकमेकांपासून अंतर ठेवणे या कृती लोकांनी ठरवल्या तरीही करणं अशक्य आहेत.
