पहिला रुग्ण आढल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि मग..

 

उस्मानाबाद जिल्हा आता ग्रीन झोनमध्ये आला आहे. इथे आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही. यामागे आहेत इथल्या डॉक्टरांचे, पोलीस,प्रशासनाचे अथक प्रयत्न आणि लोकांची त्याला साथ. काही ठिकाणी पतीपत्नी दोघेही ड्यूटीवर. त्यापैकी एक म्हणजे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले आणि त्यांच्या पत्नी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रथमच उमरगा आणि लोहारा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती .त्यानंतर प्रशासनाने प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तातडीने उपाययोजना केल्या.


‘’कोरोनाचा पहिला रुग्ण उमरगा तालुक्यात आढल्याचे रात्री ११ला डॉक्टर पंडित पुरी यांनी सांगितले.’’ विठ्ठल उदमले सांगत होते. ‘’तात्काळ घराबाहेर पडलो. डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर त्या रुग्णाला दवाखान्यात नेले. तो राहत असलेल्या बलसुर गावच्या सीमा बंद करण्याचे आदेश काढले. त्याच दिवशी रात्री लोहारा तालुक्यातील धानुरी येथील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यामुळे तात्काळ लोहारा तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना दिल्या. रात्री ३ च्या सुमाराल त्या रुग्णालही उमरगा उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यानंतर सदरील रुग्ण कोणाच्या संपर्कात आले याबाबत माहिती घेण्यास सांगितली. दोन रुग्ण आढळल्याने दररोज दोन्ही तालुक्यातील उपाययोजनावर लक्ष ठेवले.‘’
त्यांच्या पत्नी अनुराधा उपविभागीय पोलीस अधिकारी. ‘’लोकांनी घराबाहेर पडू नये याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली.’’अनुराधा मॅडम सांगतात. ‘’जिल्हाच्या सीमा बंद ठेवल्या. चेकपोस्टला वेळोवेळी भेटी द्यायचो. कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाणी, जेवण याची सोय व्यवस्थित आहे का याकडे लक्ष दिले. तसेच वेळोवळी निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने समस्या हाताळत आहे. आमचे फील्ड वर्क असल्याने कामाची वेळ निश्चित नसते. बऱ्याच वेळा अचानक फोन आल्यामुळे लगेच बाहेर जावे लागले आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला तेव्हा असा प्रसंग आला होता. ‘’
त्यानंतर एक प्रसंग म्हणजे, मुंबईहून तेलंगणा राज्यात जाणाऱ्या मजुरांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कसगी गावाजवळ कर्नाटक पोलिसांनी अडवले. उमरग्याचे पोलीस निरीक्षक माधव गुंडीले घटनास्थळी गेले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवारही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कर्नाटकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली परंतु काही मार्ग निघाला नाही. त्यामुळे पहाटेपर्यंत तेथेच थांबावे लागले होते. त्यानंतर सर्व मजुरांना उमरगा इथे आणून त्यांची एमआयडीसीमध्ये सोय करण्यात आली.
– गिरीश भगत, उस्मानाबाद

Leave a Reply