मेड इन चंद्रपूर मेडी-रोवर रोबोट

 

चंद्रपूरमधले जिल्हा सामान्य रुग्णालय. इथे सध्या एक रोबोट रुग्णांच्या शुश्रुषेत मदत करत आहे. रुग्णांपर्यंत औषधे, खाणेपिणे पोहोचवत आहे.
त्यामुळे रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यात अनावश्यक संपर्क कमी झाला आहे आणि रुग्णांची काळजीही व्यवस्थित घेता येत आहे. हाताळायलाही सोपा आहे.
या रोबोटचे नाव आहे मेडी-रोवर रोबोट. विशेष म्हणजे हा रोबोट मेड इन चंद्रपूर आहे बरं!
टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने तो तयार केला आहे. टाटा टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनीष कुमार, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण आणि त्यांची टीम या रोबोटचे निर्माते.

चंद्रपुरातल्याच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी प्रयोगशाळेत तो तयार झाला आहे. यासाठी विशेष मार्गदर्शन बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांचे.
रोबोट वायरलेस असून बॅटरी ऑपरेटेड आहे. याची वाहक क्षमता ३० किलो आहे. १० मीटरपर्यंत तो ऑपरेट करता येतो.
१० दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा रोबोट जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुपूर्द केला.
”भविष्यात यामध्ये काही सुधारणा करून नमुने तपासणीसाठी मदत करता येणार आहे”, असे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी यावेळी सांगितले

-ओमप्रकाश चुनारकर, चंद्रपुर

Leave a Reply