वरातीचा खर्च टाळून मुलींना सायकल देणारे गुरुजी

 

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातलं डोंगरगण. इथल्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक शिवाजी परसराम कोल्हे.
कोल्हे सर तालुक्यातल्याच दादेगावचे रहिवासी. वय ५२. गेली २९ वर्ष ते शिक्षकी पेशात आहेत.
गेल्या वर्षीपासून डोंगरगणच्या शाळेत. पहिली ते सातवीपर्यंतची ही शाळा. शाळेतल्या २५ मुली लांबून दोन -तीन किलोमीटरवरून येणाऱ्या. त्यांना कराव्या लागणाऱ्या पायपिटीबद्दल सरांना नेहमी वाईट वाटायचं. त्यांच्यासाठी काही करता येईल का हा विचार असायचा.

सरांच्या मुलाचं लग्न जवळ आलं होतं. तारीख ८ मार्च. जागतिक महिला दिन. विचार पक्का झाला. लग्नानंतर संध्याकाळी निघणाऱ्या वरातीवर खर्च आवश्यक आहे का? हे पैसे वाचवले तर नक्की काहीतरी करता येईल.
४८ हजार रुपयांच्या दहा सायकली कोल्हे सरांनी घेतल्या. लकी ड्रॉ पद्धतीनं चौथी ते सातवीतल्या दहा मुलींना त्यांनी या सायकली मोफत दिल्या.
त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे.

-राजेश राऊत ,बीड

Leave a Reply