वळणावरही हॉर्न टाळणारा पक्षीमित्र

 

गाड्यांचा कर्णकर्कश हॉर्न मानवी जीवनावर घातक परिणाम करतोच शिवाय या आवाजाने पशुपक्षीही बिथरतात. म्हणूनच अनिल भगिरथ जोशी हॉर्न न वाजवता गाडी चालवतात.


जोशी सोलापूरचे. स्थापत्य अभियंता. प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट यामध्ये उच्च शिक्षण त्यांनी घेतलंय.
हॉर्नमुळे पक्षी सैरभैर होत असल्याचं, प्रसंगी त्यांना जीवही गमवावा लागत असल्याचं जोशी यांच्या लक्षात आलं. तेव्हापासून म्हणजे साधारण 10 वर्षांपासून ते हॉर्न न वाजवता गाडी चालवतात. वळणावरही ते हॉर्न वाजवत नाहीत. हॉर्न वाजवण्याचा प्रसंगच येऊ नये म्हणून ते कमी वेगात गाडी चालवतात.


15 वर्ष झाली. घराच्या अंगणात त्यांनी ठिकठिकाणी पाण्याचे बाऊल आणि धान्याची सोय केली आहे. कृत्रिम घरटी तयार केली आहेत. पक्ष्यांच्या सेवेत आपल्याला आणि घराच्यांना आनंद मिळत असल्याचं जोशी सांगतात. पोपट,चिमणी, ग्रीन बी इटर, रॉबिन, रॉबिन पक्षी, शिंपी, सनबर्ड, राखी वटवट्या, भारद्वाज, कोकीळा, बुलबुल पक्षी या पक्षांचा मंजुळ स्वर रामप्रहरी ऐकू येतो. त्यानेच संपूर्ण जोशी कुटुंब जागे होते.
पावसाळ्यात जोशी यांच्या अंगणतील धान्य टिपण्यासाठी मुनिया आणि सुगरण पक्ष्यांचे थवे येतात.
तीन-चार वर्षांपासून प्राणी आणि पक्ष्यांसंबधीची कात्रणे ते संग्रही ठेवत आहेत. पुढच्या पिढीला माहिती देता यावी यासाठी. अनेक पर्यावरणपूरक उपक्रमात जोशी यांचा सहभाग असतोच.

– अमोल वाघमारे, सोलापूर

Leave a Reply