शाळा बंद पण सातपुते सरांचं काम सुरू आहे

मुंबईतल्या सांताक्रुझ पूर्व इथली घरकुल ही विशेष मुलांची शाळा. ही सगळी मुलं अत्यंत गरीब घरातली. सुनील सातपुते..घरकुलचे संस्थापक. शाळा हे त्यांचं कुटुंबच. सोबत ४ शिक्षक आणि ४ मदतनीस. शाळा पूर्णपणे देणग्यांवर चालते.
लॉकडाऊनमुळे सर्वच बंद. पण मुलांची, त्यांच्या घरच्यांची काळजी केली नाही तर ते सातपुते सर कसले?
लॉकडाऊन जाहीर झाल्यावर ८-१० दिवसात सरांनी ५० कुटुंबाला प्रत्येकी १५०० रुपयांचं वाणसामान दिलं. त्यात तांदूळ ,गहू ,साखर,चहापत्ती ,डाळी तूर आणि मूग ,खाण्याचे तेल, भांडयाचा आणि आंघोळीचं साबण. तीन देणगीदारांनी यासाठीचा पूर्ण खर्च उचलला. जवळपास ७५ हजारांवर निधी जमला. काम चांगलं असेल तर मदतीचे हात पुढे येतातच.
वाटपासाठी काही मुलांच्याच पालकांनी पुढाकार घेतला.
मुलं घरी असल्यामुळे त्यांचं थेरपी सेशन चुकू नये म्हणून डॉक्टर काझी त्यांना विडिओ कॉल/व्हाट्स अपद्वारे मार्गदर्शन करत आहेत. मुलांचा आणि शिक्षकांचा व्हाट्स अप ग्रुप आहेच. त्यामुळे मुलांना क्राफ्ट शिकवणं, त्यांच्या प्रगतीचा आढावा घेणं सुरू राहिलंय.
प्रत्येक अडचणीवर तोडगा असतोच, नाही का? फक्त गरज असते सकारात्मकतेची.
-मेघना धर्मेश, मुंबई