१६ वर्षांपासून जालन्यात होतेयं गांधीविचारांची पेरणी

 

जालना येथील जेईएस महाविद्यालय. शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या नामांकित असलेल्या महाविद्यालयाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्र.
गेल्या दीड दशकांपासून, या केंद्रातून महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे. केंद्र समन्वयक प्रा.डॉ.यशवंत सोनुने या चळवळीतील व्यक्तीमत्त्वाने संस्थेंचे पदाधिकारी आणि प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीविचारांचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरु केले.


सन २००४ मध्ये, जेईएस महाविद्यालयाने पहिले राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिर घेतले. यात राज्यभरातील अभ्यासक, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा आदर्श घेत समाज परिवर्तनाचे रचनात्मक काम व्हावे, हा या शिबिराचा उद्देश. १६ वर्षात देशभरातील अनेक नामांकित या शिबिरात सहभागी झाले, त्यांच्या मार्गदर्शनातून अनेकांनी गांधी विचारांची शिदोरी घेत जीवनाची वाटचाल आरंभिली. शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांसाठी गांधीविचार प्रमाणपत्र हा अभ्यासक्रमही काही विद्यालयात उपलब्ध करुन देण्यात आला.
विद्यार्थी, युवकांमध्ये हे काम पोचत असतानाचं कारागृहातील कैद्यांमध्येही गांधीविचारांची जागृती व्हावी, यासाठी चार वर्षांपासून मुंबई सर्वोदय मंडळाच्या साथीने जालना कारागृहात गांधी विचार परिक्षेचा उपक्रम हाती घेण्यात आला. शिक्षा भोगत असताना गांधीजींच्या चरित्राचा अभ्यास झाल्याने अनेक कैद्यांच्या जीवनाचे तत्वज्ञानही बदलले. ही गांधी विचारांची शृंखला अधिक विस्तारत जावो, ही सदिच्छा…

नवी उमेदने महात्मा गांधी अध्ययन केंद्र, जालना यांच्या सहकार्याने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १, २ व ३ ऑक्टोबर २०२० रोजी प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजली होती. या स्पर्धेत खालील दहा जणांनी पारितोषिक पटकावले.

१) अश्विनी बनसोडे
२) सलमान निगेबन
३) शिवानंद नंदी
४) भानुदास पाटील,
५) प्रतिक्षा बनसोडे
६) भोलेनाथ सिताफळे
७) शागुफ्ता म्हसकर
८) शेखर घाडगे
९) विभावरी निगले
१०) विजय तांबे
(प्रश्नमंजुषेत सहभागी सर्व स्पर्धकांचे आभार. अनेकांची उत्तरे योग्य आली. त्या सर्वांचे अभिनंदन.)

 

Leave a Reply