बातम्या तुमच्या आमच्या-मुलांच्या राज्यातल्या ६ ते ५९ महिने वयोगटातल्या ६८. ९ बालकांमध्ये रक्ताल्पता

बातम्या तुमच्या आमच्या मुलांच्या
राज्यातल्या ६ ते ५९ महिने वयोगटातल्या ६८. ९ बालकांमध्ये रक्ताल्पता

– नवी उमेद प्रतिनिधी

राष्ट्रीय कुटुंब पाहणीचा पहिला अहवाल या महिन्यात जाहीर झाला. यात महाराष्ट्रासह १७ राज्य आणि ५ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. लोकसंख्या, कुटुंब नियोजन, आरोग्य पोषण याविषयीच्या १३१ बाबींची ही पाहणी.
महाराष्ट्रातल्या महिला आणि बाल आरोग्यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बाबी :-
* ६ वर्षांवरील शाळेत जाणाऱ्या मुलींचं प्रमाण – ७९. ६%. चौथ्या म्हणजे २०१५-१६ मधलं प्रमाण ७७. ४ %
* १५ ते ४९ वयोगटातील साक्षर महिला ८४. ६%. शहरी ९०. २ तर ग्रामीण ७९. ५%
* १० वर्षांहून अधिक काळ शाळेत जाणाऱ्या महिला ५०. ४% . शहरी ६१,१ तर ग्रामीण ४०. ७ %. पुरुषांमधलं हेच प्रमाण ६१%
*इंटरनेटचा वापर केलेल्या महिला ३८%. शहरी ५४. ३, ग्रामीण २३. ७ %. पुरुषांमधलं हेच प्रमाण ६१. ५ %.
* १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच लग्न झालेल्या २० ते २४ वर्ष वयोगटातल्या महिला २१. ९% . शहरी १५. ७, ग्रामीण २७. ६%. वर्ष २०१५-१६ मधलं प्रमाण २६. ३%. बालविवाह होणाऱ्या मुलांचं प्रमाण १०. ५ %
* लिंग गुणोत्तराचं प्रमाण १००० पुरुषांमागे ९६६ महिला. शहरी भागात ९५४ तर ग्रामीण भागात ९७७
*नवजात मृत्यू दार १६. ५
*बालमृत्यू दार २३. २
*पाच वर्षांखालील बाल मृत्यू दार २८
*कुटुंबनियोजनाच्या आधुनिक पद्धती वापरणाऱ्या महिला ६३. ८ %. शहरात ६२. ७ तर ग्रामीण भागात ६४. ७%
*गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत तपासणी केलेल्या महिला ७०. ९%. शहरात ६९. ५ तर ग्रामीण क्षेत्रात ७२.
*रुग्णालय/ आरोग्य केंद्रात झालेल्या प्रसुतीचे प्रमाण ९४. ७ % उल्लेखनीय बाब म्हणजे लसीकरणाची आकडेवारी प्रत्येक बाबतीत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक नोंदवण्यात आली आहे.
*लसीकरण कार्डावरील माहितीच्या आधारे किंवा मातेच्या पुढाकारातून १२-२३ महिने वयोगटातील लसीकरण झालेली बालके – ७९% शहरात ७१. ७ तर गावात ७४. ७. पाच वर्षांपूर्वी हे प्रमाण ५६. २ होते.
*बीसीजी प्राप्त बालके- ९३. ८.
*पोलिओ डोस प्राप्त १२-२३ महिने वयोगटातली बालके ७९. गेल्या वेळचे प्रमाण ६७.
*गोवर प्रतिबंधक पहिला डोस मिळालेली ८४.७ तर दुसरा डोसही दिलेली बालके २६. ३
*डीपीटी लसीचे ३ डोस मिळालेली बालके ८३. ४%.
६ ते २३ महिने वयोगटातील बालकांना स्तनपान आहार, याबाबतची आकडेवारी पाहता ग्रामीण भागात अधिक जागरूकता झालेली दिसते मात्र एकंदरीतच अशक्तपणाचं प्रमाण विचार करायला लावणारं आहे. याबाबत ग्रामीण भागातली आकडेवारी शहरी भागापेक्षा अधिक आहे.
*वजन कमी असलेली ५ वर्षांखालील बालके- ३६. १%
* ६ ते ५९ महिने वयोगटातली अशक्त बालके- ६८. ९ . गेल्या वेळेस हे प्रमाण ५३. ८ होतं.
*१५-४९ वर्ष वयोगटातल्या ऍनिमिक महिला- ५४. २. गेल्या वेळेस हे प्रमाण ४८% होतं. *१५-४९ वर्ष वयोगटातल्या ऍनिमिक गर्भवती – ४५. ७. गेल्या वेळेस हे प्रमाण ४९. ३ % होतं
*१५-१९ वयातील अशक्त मुली – ५७. २. गेल्या वेळेस हे प्रमाण ४९. ७ होतं.
*मासिक पाळीदरम्यान आरोग्यपूर्ण पद्धती अवलंबणाऱ्या १५- २४ वर्ष वयोगटातल्या मुलींचं प्रमाण ८४. ८% शहरात ९०. २ तर ग्रामीण भागात ८०. १ %
*घरात शौचालय असणारी लोकसंख्या ७२% . चौथ्या अहवालातलं प्रमाण ५२%
#नवीउमेद
UNICEF India Swati Mohapatra