नको लगीनघाई!!

नवरात्रात स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. भारतीय संस्कृतीत स्त्री हे देवीचं, शक्तीचं रूप मानलं गेलं आहे. म्हणून नवरात्राच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा गौरव करणं योग्यच. याच निमित्ताने स्त्रियांच्या वाट्याला येणार्‍या समस्यांबद्दलही बोललं गेलंच पाहिजे. विश्वास बसायला कठीण, पण बालविवाह ही सुधारणावादी महाराष्ट्रातली एक मोठी समस्या आहे. बालविवाहांचं वाढतं प्रमाण असणार्‍या देशभरातल्या ७० जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातले १६ जिल्हे आहेत. हे वास्तव बदलण्याची गरज आहे.