कर्जबाजारी शेतकरी ते लखपती कृषिउद्योजक

||अपना टाईम आएगा|| मालिकेतील पुढील भाग जालना जिल्ह्यातल्या सिंधी काळेगावमध्ये मुळे परिवाराची चांगली 18 एकर जमीन. त्यातली दहा एकर काळी कसदार तर उर्वरित आठ एकर काहीशी पडीक. पण सिंधी काळेगावजवळ सरकारी योजनेत एका तलावाची निर्मिती झाली आणि दुर्दैवाने उत्तम काळी कसदार दहा एकर जमीन तलावाच्या पाण्यात गेली. अर्थात जमिनीचा सरकारी मोबदला मिळाला, पण दुर्दैवाने बाजारमूल्य कमी असल्याने लाखोंच्या जमिनीचे अवघे काही हजार हाती पडले. मुळात उत्तम कसदार जमीन गेल्याचं दु:ख या पिढीजात शेती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाला झालं ते वेगळंच. या कुटुंबातील एकनाथ मुळे जि. प. शाळा काळेगाव- घारे इथं शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी असणारे मुळे सर, अत्यंत मन लावून मुलांना शिकवितात. याचंच परिणामस्वरूप म्हणून 2012 साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे. पण घरात शेतीचं वातावरण असलेल्या मुळे सरांना शेतीत काहीतरी करून दाखवायची उर्मी गप्प बसू देत नव्हती. पडीक असलेल्या शिवारात नांगरणी करून, खतं- माती टाकून आधी ती जमीन वापरण्यायोग्य करून घेतली, त्यातही भरपूर खर्च झाला. मग पारंपरिक मूग, उडीद, ज्वारी, कपाशी, हरभरा अशी पिकं घ्यायला सुरूवात केली. पण दरवेळी बाजारभावाची बोंब. शेतीत मेहनत जास्त आणि उत्पन्न नगण्य अशी परिस्थिती होती. मग मुळे सरांनी द्राक्ष- डाळिंबाचे उत्पादन घ्यायचे ठरविले. फळशेतीतून उत्तम उत्पादन मिळेल, या आशेवर. पण रासानिक खतं, कीटकनाशकं, फवारणी, फळं काळजीपूर्वक बाजारपेठेत

Read More

घाटावरचं कोकण

पाच माणसांनी घेर करून जरी मिठी मारली तरी मावणार नाही एवढा खोडाचा घेर असणारी वडाची तसेच कडुलिंब,बाभूळ, बहावा, काटेसावराची झाडे रस्त्याच्या दुतर्फा होती. गावात दोन पदरी रस्ता झाला आणि सगळी झाडे तोडण्यात आली. पाचवडपासून 8 किमी आणि सातारा शहरापासून 20 किमीवरचं हे आमचं बिभवी गाव. महाबळेश्वर- सातारा रोडला लागूनच गावाची हद्द सुरू होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव घनदाट जंगलांनी वेढलेले होते. अजूनही रात्री फार उशिरा रस्त्यावर गेल्यास बिबट्या दिसण्याच्या वार्ता अनेक गावकऱ्यांकडून ऐकायला येतात. शिवाजी महाराजांनी ज्या घनदाट जावळीच्या जंगलांचा वापर करून शाहिस्तेखानाचा पराभव केला त्याच जावळी तालुक्यातील हे गाव. यावरून आपल्याला तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा अंदाज आला असेल. महाबळेश्वर, पाचगणी सारख्या धो धो पडणाऱ्या पावसाच्या क्षेत्रातच गाव येतं. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर दोन महिने गावात पावसाचा धुमाकूळ असतो. हिवाळ्यात थंडी अंगातून निघत नाही. उन्हाळ्यात ऊन अंगाला स्पर्श करत नाही. अशा नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या गावातील लोक स्वतःला कोकणीच संबोधतात. त्यामुळे पर्यटकांचा ओढा आलाच. पाऊस जास्त असल्याने गावात भात हे प्रमुख पीक. मोठी साळ असणारा दोडकी, रक्तवाढीसाठी काळी साळ, सुगंधासाठी आंबेमोहोर, पेजेसाठी चिमनसाल अशी असंख्य भाताची वाणं पूर्वी होत असतं. हरितक्रांती आली आणि सगळी वाणं नामशेष होत गेली. सध्या कावेरी, इंद्रायणी अशा संकरित आणि विकल्या जाणाऱ्या जाती घेतल्या जातात. हिवाळ्यात दगडी ज्वारी, भुईमूग, खपली गहू, काळा घेवडा, विविध प्रकारचे कडधान्य अशी

Read More

मारोतीरावांची जिद्द भारी, त्यांना गवसलं पाणी

बीड जिल्ह्यातला गेवराई तालुका. पाऊस कमी झाला की बीड जिल्ह्यात दुष्काळ ठरलेलाच. पाच वर्षापूर्वी जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर या तालुक्यांनी दुष्काळाचे चटके सोसलेले आहेत. यात गेवराई तालुक्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. गेवराई तालुक्यातल्या पाडळसिंगी गावातल्या एका शेतकऱ्याने मात्र या दुष्काळावर कायमस्वरूपी इलाज केलाय तो कोणता? चालू वाचूया. पाडळसिंगी गावात मारोतीराव बजगुडे यांची 12 एकर कोरडवाहू शेती. शेतीला मंडपाचा जोडधंदा आहे. कमी पावसामुळे ओढावणाऱ्या दुष्काळामुळे त्यांच्या  शेतीला  पाणी मिळत नव्हतं. तेव्हा त्यांनी शेततळे तयार करायचं ठरवलं. पण या तळ्यात फक्त पावसाचं ठराविक पाणी साचेल असा विचार त्यांच्या मनात आला. मग काय करायचं असा विचार करता करता तीन वर्षांपूर्वी त्यांनी एक एकरात विहिर खोदायचं ठरवलं.   त्यांच्या शेताजवळूनच येडशी औरंगाबाद हा राष्ट्रीय महामार्गाचे जातो. या महामार्गासाठी त्यांची काही जमीन गेली. त्याचे त्यांना तेव्हाच 25 लाख रूपये मिळाले. अडीच एकर जमीन त्यांनी बहिणीला विकली. त्यातूनही काही पैसे जमले. सोबतच महामार्गाचे काम करणाऱ्या आयआरबी कंपनीने त्यांना विहिर खोदण्यासाठी मदत केली. खोदकामातून निघालेला मुरूम त्यांनी कंपनीला दिला. त्याचेही 15 लाख मिळाले. आता बजगुडे यांच्या हातात जवळपास दीड कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे विहिर पूर्ण करायचीच असा निश्चय बजगुडे यांनी केला. साडेसहा महिने चाललं खोदकाम या विहिरीच्या खोदकामासाठी साडे सहा बांधकामासाठी अडीच महिने लागले. जवळपास ८० मजूर या विहिरीसाठी काम करत होते. विहिरीतुन निघालेला मुरूम व पाषाण

Read More