सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आगळी सेवा ही 23 मार्च 2018 रोजी नवी उमेदवर प्रसिद्ध झालेली गोष्ट

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आगळी सेवा ही 23 मार्च 2018 रोजी नवी उमेदवर प्रसिद्ध झालेली गोष्ट. स्टोरी लिंक – https://www.facebook.com/naviumed.org/posts/2031681163821706 बीड शहरातील ज्या वृद्धांना सांभाळणारं कुणीही नाही अशा 52 निराधारांना दोन्ही वेळचा डबा देणाऱ्या दत्तप्रसाद भोजनालयाची ही गोष्ट. नवी उमेदवर प्रसिद्ध झाल्यानंतर या स्टोरीवर कौतुकाच्या कमेंटसचा अक्षरशः पाऊस पडला. ही पोस्ट आजही वाचली जाते आहे. गेल्या तीन वर्षात दत्तप्रसाद भोजनालयाने काय केलं, त्यांचं काम वाढलं की त्यात काही बदल झाले याची उत्सुकता आमच्या टीमलाही होती. म्हणून नवी उमेदच्या प्रतिनिधीने तिथं भेट दिली. वाचूया- नवी उमेदच्या प्रतिनिधीने त्यांच्या या कामाची सकारात्मक स्टोरी फेजबुक पेजला केल्यानंतर सुरूवातीलाच बेंगलोर येथील उद्योजक संजय पाटील यांनी ही स्टोरी वाचून दोन वर्षापूर्वी ५२ निराधारांसाठी घरी अंथरण्यासाठी सतरंजा पाठवल्या होत्या. आता प्रत्येक वर्षी पाटील हे सतरंज्या देत आहेत. तर बीड येथील व्यापारी राजेंद्र मुनोत हे दरवर्षी ब्लँकेट देत आहेत. बीड येथील डॉ.पी.के कुलकर्णी, डॉ.अनिल बारकुल व डॉ.बि.जी. झंवर हे या निराधारांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करत आहेत. २०१८ च्या तुलनेत या प्रसादालयाला मदत करणारे दानशूर सध्या चार पटीने वाढले आहेत. सध्या मराठवाड्यासह मुंबई, नागपूर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, नगर, सांगली, कोल्हापूर इथून मदत मिळत आहे. याच मदतीतून निराधारांना दोन घास मिळत आहेत. अमेरिकेतून अभियंता अव्दैत प्रकाश कुलकर्णी यांनी सुध्दा आर्थिक मदत केली. दत्त प्रसादालयाचे अध्यक्ष शिवशंकर कोरे यांच्या पुढाकारातून

Read More

एक पोस्ट अन् महाराष्ट्रभर ओळख..

सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन प्रकल्प, तागडगाव ता. शिरुर जि. बीड बीड म्हणजे महाराष्ट्रातला ग्रामीण जिल्हा, त्यातही शिरुर अगदीच मागास. या तालुक्यातील तागडगावसारख्या एका छोट्या गावातील माळरान. जिथं काल परवापर्यंत चारचाकी वाहनही जात नव्हतं अशा ठिकाणी आम्ही केवळ प्राणीप्रेमापोटी ‘वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅण्ड सेक्युअरी असोसिएशन संस्थे’ची सुरुवात करुन ‘सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन प्रकल्प’ सुरु केला. जखमी प्राण्यांवर उपचार करुन, ते बरे होईपर्यंत त्यांची सुश्रृषा करणे आणि त्यांना पुन्हा निसर्गात सोडून देणं हे आमच्या कामाचं स्वरुप. खरंतर आमचं हे काम आमच्या तालुक्यात, जिल्ह्यातही अनेकांना माहिती नव्हतं. ना कुठलं शासकीय अनुदान ना कोणतीही मोठी आर्थिक मदत अशा स्थितीत मित्र परिवार आणि काही प्राणीप्रेमींकडून मिळणारा सहभाग. उपचारासाठी वन विभाग आणि पशूवैद्यकीय रुग्णालयाकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे आम्ही हा प्रकल्प सुरु ठेवला. आणि, 29 जानेवारी 2018 रोजी नवी उमेदने ‘अनाथ प्राण्यांची सृष्टी’ ही पोस्ट प्रकाशित केली आणि आमचं काम एका दिवसांत लाखो लोकांपर्यंत पोहचलं. (पोस्ट लिंक – https://www.facebook.com/naviumed.org/posts/1999674413689048) या पोस्टला उदंड प्रतिसाद मिळाला. हजारो लोकांनी ही पोस्ट शेअर केली. मागच्या तीन वर्षांच्या काळात नवी उमेदमुळे प्रकल्पाचा चेहरामोहरा बदलण्यात मोलाची साथ मिळाली. मुंबई, पुण्यापासून ते राज्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रकल्पाची माहिती पोहचली. नवी उमेदच्या शेकडो वाचकांचे फोन आले, त्यांनी प्रकल्पाची माहिती घेतली. कुणी वस्तू स्वरुपात, कुणी आर्थिक रुपात मदत केली. प्रकल्पाला भेट देणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. यातून प्रकल्पासाठी काही नियमित

Read More

तुमच्या घराच्या दारावर कुणाच्या नावाची पाटी आहे?

24 ऑक्टोबर 2016 ची ही गोष्ट. नवी उमेदवर “लोककारणार्थ” या मालिकेत “तुमच्या घराच्या दारावर कुणाच्या नावाची पाटी आहे?” ही पोस्ट प्रकाशित झाली होती. (पोस्ट लिंक – https://www.facebook.com/naviumed.org/posts/1726604150996077) तेव्हा ही पोस्ट जवळपास 61 हजार लोकांपर्यंत पोहोचली. ही पोस्ट प्रकाशित झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांत काय घडलं याची आम्हालाही उत्सुकता होती. त्याविषयी वाचूया – माझी लेक माझा सन्मान या उपक्रमअंतर्गत मुलीच्या नावाची पाटी घरावर लावून मुलीचा सन्मान करत तिला पाठबळ देणे, ती या कुटुंबाची अविभाज्य घटक आहे हा संदेश देण्याचं काम जालन्यातील दादाभाऊ जगदाळे सरांनी स्वतःच्या घरावर मुलीच्या नावाची पाटी लावत सुरू केलं. जालन्याच्या शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात दादाभाऊ जगदाळे कंत्राटी पद्धतीने साधनव्यक्ती पदावर काम करत आहेत. त्यांची ही संकल्पना खूप जणांना आवडली. कित्येकांनी ती अमलात आणली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कन्या दिशा, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कन्या दर्शना आणि पत्नी सिमा, माजी पाणी पुरवठा मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांनी कन्या भक्ती ,तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्नी निर्मलाताई, अनिरुद्ध खोतकर यांनी श्रध्दा, सतीश टोपे यांनी प्राची व सई दोघींच्या नावाची पाटी घरावर लावून मुलींचा सन्मान वाढवला. नंतर त्यांच्या या संकल्पनेला औरंगाबादेतील पत्रकार, सध्या Etv भारतचे औरंगाबादचे प्रतिनिधी अमित फुटाणे व त्यांच्या पत्नी वैशाली यांनी खूप विशाल रूप दिलं. त्यांच्या मेधावी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून हा

Read More