शाळा सुटली, पाटी कायमची फुटली… परीक्षांचा हंगाम सुरु आहे. मुलांमध्ये लगबग सुरु आहे. कोणते प्रश्न येणार? पेपर कसा जाणार? काही मुले शेवटच्या टप्प्यात उजळणीवर भर देताहेत. परंतु, बीड तालुक्यातील कुर्ला येथील प्रेरणा झिटे, मांजरसुंबा परिसरातील सुदर्शन तंजपवार ही दोन शाळकरी बालकं कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांवर ऊसतोडणीत गुंतली आहेत. ‘मला शिकायचे आहे, पण सद्या आमच्या कुटुंबावर कर्ज आहे. माई, आबा दोघे राब-राब राबताहेत. गावी कुणी नाही. मग मीही आलो कारखान्यावर. दोन पैसे मिळतात, घरच्यांना मदत होतेयं. हे वर्ष गेलं आता पुढच्या वर्षी बघू जमतयं का शाळेत जायला!’ सुदर्शन सांगत होता. प्रेरणाचीही अशीचं कथा. ‘मला शाळेत जायला आवडतं. शिकून सवरून मोठं व्हावसं वाटतं. आमचे बाबा कारखान्यावर ट्रॅक्टर घेऊन जातात. आई, भावंडं आहेत. गावी जवळचं कुणीच नाई. मग कुणाकडे थांबू. त्यांना काळजी वाटते. त्यामुळे यंदा शाळा सुटली.’ असे ती सांगते. सुदर्शन आणि प्रेरणा ही दोन प्रातिनिधिकं उदाहरणं. बीड जिल्ह्यातील विविध भागातून शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा पध्दतीने गोड उसाच्या शिक्षण हिरावणाऱ्या कडू चक्रात भरडली गेलीतं. राज्यात ऊसतोड मजूरांची सर्वाधिक संख्या असणारा जिल्हा असल्याने या मालिकेत प्रामुख्याने बीड जिल्ह्यातील माहितीचा आपण आढावा घेतोयं. राज्य शासनाने ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून कामगारांनी नोंदणी तर सुरु केली आहे. परंतु, प्रशासन कामगारांपर्यंत पोहोचण्यात कमी पडल्याने संपूर्ण राज्यभरातून केवळ दीड लाख कामगारांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. एकट्या बीड जिल्ह्यातूनच साडेपाच ते
Read Moreमाझ्या इमारतीत राहणारी मैत्रीण शीतल. एक दिवस सहज बोलता बोलता तिच्याकडून कळलं की सहा सहा महिने तिला मासिक पाळी येत नाही. आम्ही गेल्या १३ वर्षांपासून एकमेकींना ओळखतो. मात्र, या एक दोन वर्षात तिचं वजन वाढत असलेलं बघून मी तिला सहज म्हणाले की वजन कमी व्हायला हवं. नाहीतर मासिक पाळीच्या समस्या वाढतील. तेव्हा तिनं तिच्या पाळीची सध्याची समस्याच सांगितली. हे ऐकून खरंतर मी चक्रावून गेले. तिला म्हटलं, “अगं, मग डॉक्टरांना दाखवायला हवं.” त्यावर ती हसून म्हणाली पण मला आता सवय झाली आहे. या विषयाचं गांभीर्य तिला समजलं नव्हतं. मग मी तिला याबाबत भविष्यातील धोके समजावून सांगितले आणि डॉक्टरांकडे जायला तयार केलं. आता महिना झाला तिने चालायला वगैरे सुरू केले आहे, डॉक्टरांनी औषधांपेक्षा व्यायामावर भर द्या म्हणून सांगितलं. एक मैत्रीण म्हणून मी तिच्या मागे लागते. जबरदस्तीने तिला चालायला वगैरे नेते. आता बघूया, माझी मैत्रीण या परीक्षेत यशस्वी होतेय का? मासिक पाळीचे चक्र दर महिन्याला सुरळीत सुरु राहिले तर महिला, मुलींचे आरोग्य उत्तम राहते असे आयुर्वेदात सुद्धा म्हटलं आहे. मात्र गेल्या पाच सहा वर्षापासून महिलांमध्ये विशेषत: अविवाहित मुलींमध्ये मासिक पाळीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याविषयी अनेक महिला, मुलींशी आणि स्त्री रोग तज्ज्ञांशी बोलून याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, बदलती जीवनशैली एकमेव कारण समोर आले. मात्र सध्या मासिक पाळीच्या अनियमित चक्रामुळे स्त्रियांमधील
Read More“ना नफ्यासाठी ना स्वार्थासाठी माझी कला गरजवंतांच्या आधारासाठी” या विचारातून रोज किमान एक संगीत मैफिल करायची आणि किमान एका गरजू बंधू भगिनींस आधार देताना गरिबी नष्ट होईपर्यंत हेच काम करत राहायचं हेच ध्येय. १ हजार ४०६ दिवसात तब्बल १ हजार ७०९ वी मैफल करून हजारो व्यक्तींना विशेषतः रूग्णांना मदतीचे हात देणारे कोल्हापूरचे प्रशांत जोशी सांगत होते. १९८० चा सुमार. कोल्हापुरातील भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूलमध्ये प्रशांत सहावीत होते. त्यांचे गुरुजी प्रदीप गबाले यांच्या दिग्दर्शनाखाली ते मुख्याध्यापक संघाच्या एकांकिका स्पर्धेत सहभागी झाले आणि त्यांचं रंगमंचावर पदार्पण झाले.१९८४ पासून प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर अभिनय… महाराष्ट्रभर नाट्यप्रयोग झाले. १९९३ ला एका नाट्यप्रयोगा दरम्यान अभिनयाचे प्रचंड कौतुक होत असताना, रसिक प्रेक्षकांना स्वाक्षरी देत असताना, छायाचित्र काढत असताना मात्र प्रशांत जोशी अस्वस्थ झाले. त्यांनी नाटकात काम करणं थांबवलं. त्यानंतर पुढे ५ ऑक्टोबर २००० रोजी एका प्रसंगानं त्यांना सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली. वर्तमानपत्रात आलेल्या मदतीच्या आवाहनानुसार कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या एका रुग्णाची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी नाट्यप्रयोग केला . २२ ऑक्टोबर २००० रोजी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावर रुग्णाच्या नातेवाईकांना, नाट्यप्रयोगाच्या तिकीटविक्रीतून जमा झालेली रक्कम सुपूर्त करताना, मनाला मिळालेल्या समाधानामुळे लक्षात आलं. ज्या कारणासाठी नाटकात काम करणं थांबवलं होतं, सात वर्ष ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो ते मिळालं. पुन्हा नाट्यनिर्मिती सुरू केली. नाटकाचे प्रयोग करायचे आणि त्यात जमा
Read More”एसटीनं माझा संसार सावरला”-मीनाक्षी वायंडे एसटी महामंडळाच्या नाशिक आगारात कार्यरत असलेले राजेंद्र वायंडे यांचं ड्युटीवर असताना अपघाती निधन झालं. चार वर्षांनी २००१ मध्ये त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांच्या पत्नी मीनाक्षी वायंडे यांना काम करण्याची संधी मिळाली. पदरी चार मुलं असल्यानं खरं तर त्यांना नोकरीची गरज होती मात्र वाहक म्हणून काम करण्याची खात्री वाटत नव्हती. आजवर अशी काही वेळ आली नव्हती आणि एकाचवेळी तिकीट काढणं, पैसे घेणं, हिशोब ठेवणं, प्रवाशांवर लक्ष देणं, वेळीअवेळी असणाऱ्या ड्यूटीज अशा अनेक् गोष्टी करणं जमेल का या विचारानंच त्या गांगरून गेल्या होत्या. पण म्हणतात न पाण्यात पडलं की पोहोता येतं. मीनाक्षीताईंच्या बाबतीत असंच झालं. अंगावर पडेल त्या जबाबदाऱ्या त्या पार पडत गेल्या. आज त्यांच्या नोकरीला २२ वर्ष होत आली असून आता सात-आठ वर्षात त्या सेवानिवृत्त होतील. आपल्या या प्रवासाबद्दल मीनाक्षीताई सांगतात, ”एसटीनं माझा संसार सावरला. त्याबद्दल मी महामंडळाची कायम ऋणी राहील. माझं माहेर मालेगाव जवळील रोन्झाणे इथलं तर सासर पेठचं. दहावीपर्यंत शिक्षण झालं. खरंतर मला शिक्षक व्हायचं होतं पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. पती निधनानंतर इतर कशाचा विचार करायला वेळच मिळाला नाही. २००१ साली अनुकंपा तत्वावर आम्हा ६ जणींचं प्रशिक्षण सुरू झालं. तिकीट कसं काढायचं, पैसे कसे लावायचे, हिशोब कसा ठेवायचा अशा सगळ्या गोष्टी करताना सुरवातीला तर माझी धांदलच उडत होती. रडू यायचं, त्यात घरी ६ महिन्यांचा मुलगा
Read Moreमराठवाडा आणि दुष्काळ हे समीकरण इतकं फिट्ट झालं आहे की इथं कुठं जंगल असेल यावर मराठवाड्याबाहेरच्या लोकांचा तर विश्वासच बसत नाही. पण याच मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यात अत्यंत मौल्यवान वनसंपदा आहे. सोबतचे फोटो पहा, भुरळ पडणारच, हे नक्की ! विशेष म्हणजे सर्व प्रकारचा वन्य अधिवास इथं आहे. जिल्ह्यातल्या १६०३ गावांपैकी ४१० गावं वनक्षेत्र असलेली. नांदेड वन विभागाचे क्षेत्र १,३०,०७६.५०२ हेक्टर. त्याच्या व्यवस्थापनासाठी माहूर, किनवट, मांडवी, बोधडी, ईस्लापूर, अप्पारावपेठ, हदगांव, हिमायतनगर, नांदेड, भोकर, मुखेड आणि देगलूर अशी १२ वनपरिक्षेत्र. इथलं वन मिश्र शुष्क पानझडीचं. साग, सप्तपर्णी, बांबु खैर, हिवर, हळद, बेल, महारुख, कृष्णा, शिरस, चिचावा, किन्ही, धावडा, रक्त, पळस, कवट, पिंपळी, वड, उंबर, पिंपळ, घोगर, शिवण, कड, अंजन, रुषी, मोई, सुबांबुळ, मोहा, केसरी, खिरणी, बाकन, बाकुली, कळंब, शेवगा, तिवस, शिडी, आवळा, बिजा, करंज असे वृक्ष. जिल्हयाच्या दक्षिण भागात अत्यंत विरळ झाडोरा किंवा पडीत वनक्षेत्राची व्याप्ती अधिक. नीलगाय, चितळ, अस्वल, बिबट, हरीण, सांबर, कोल्हा, तळस, रानडुक्कर, काळवीट, सायाळ, ससा, लांडगा या प्राण्यांसोबत वाघाचं भ्रमणही आढळलं आहे. पक्षी तर असंख्य प्रकारचे. देगलूरच्या केरूर गवताळ माळरानात यंदाच्या थंडीत ४० ते ५० प्रकारचे पक्षी दाखल झाल्याचं सहायक वन संरक्षक श्रीनिवास लखमवाड सांगतात. स्थलांतरित पक्षांपैकीच एक द पॅलिड हॅरियर. लखमवाड सर आणि वन्यजीव रक्षक अतिंद्र कट्टी यांनी या पक्षाविषयी माहिती दिली. आपले अन्न आणि भक्ष्य असलेल्या परिसराभोवती सतत घिरट्या मारतो, म्हणून त्याला भोवत्या
Read Moreसगळ्या बंधनांना, मर्यादांना झुगारून, अडचणींवर मात करत, एकमेकांचा हात हातात घेऊन ताठ उभं राहतं, ते खरं प्रेम- अशी प्रेमाची व्याख्या आपण कित्येकदा ऐकतो. पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवड परिसरात गेल्या वर्षी 22 जुलै 2022 रोजी हे वाक्य सत्यात उतरवणारा एक विवाह झाला- रूपा टांकसाळ आणि प्रेम लोटलीकर यांचा. हा महाराष्ट्रातील पहिला ट्रान्सवुमन आणि ट्रान्समॅनचा विवाह आहे. म्हणजे काय? तर रूपाचा जन्म पुरूष म्हणून झालेला, नंतर वयात येताना आपण बाई आहोत हे जाणवल्यानं, त्या तृतीयपंथिय समाजात सहभागी झाल्या, यथावकाश त्यांची लिंगबदलाची शस्त्रक्रिया झाली. तसंच प्रेम लोटलीकर हे मुलगी म्हणून जन्माला आले होते, पण त्यांच्यात आपण बाई नाहीत तर पुरूषच आहोत ही भावना ठामपणे वाढत गेली आणि लिंगबदल शस्त्रक्रियेने ते पुरूष झाले. या दोघांचा हा प्रवास सोप्पा होता का? रूपा यांचा तर नाहीच नाही. रूपा मूळच्या विदर्भाच्या बुलडाणा जिल्ह्यातील. वयात येताना त्यांना आपण पुरूष नाहीत हे जाणवायला लागलं, त्यात त्यांचे वडील अकाली गेले. घरात धाकटी बहीण, तिलाच विश्वासात घेऊन रूपाने आपल्या आयडेंटिटी बद्दल सांगितलं. बहिणीने भावाचं हे वेगळं रूप स्वीकारलं, “तुला तुझं आयुष्य मनासारखं जगायचा अधिकार आहे पण मला आणि आईला कधीच विसरू नकोस, कायम संपर्कात राहा” अशी विनवणी केली. अर्थातच आई- बहिणीची ही मागणी मान्य करत रूपा बाहेर पडल्या आणि नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रेणुकादेवी संस्थानात येऊन राहिल्या. तिथं तृतीयपंथिय समाजाच्या परंपरेनुसार त्यांनी गुरू केला, भिक्षा मागून आयुष्य जगायला
Read Moreमहिला पोलीस ललिताचा, पोलीस नाईक ललित होताना! “विचार करा, तुम्ही वयाची 29 वर्षे मुलगी स्त्री म्हणून जगलायत आणि अचानक एके दिवशी डॉक्टरांकडे तपासणीला गेल्यावर ते तुम्हांला सांगतात- तुमच्यात पुरूषी हार्मोन्सचं प्रमाण खूप जास्त आहे, तू मुलगी नाहीएस- मुलगा आहेस. काय होईल तुमचं? पायाखालची जमीन सरकेल ना? डोळ्यात पाणी येईल ना? माझी परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. अक्षरश: डॉक्टरांच्या हातापाया पडून मला मुलगीच ठेवा ना! असा आग्रह मी करत होतो, मी आई बापाला, नातेवाईकांना, समाजाला तोंड कसं देऊ, अक्षरश: नवं आयुष्य कसं जगू असे प्रश्न मला पडले होते. पण डॉक्टरांनी उच्चारलेले ते वाक्य- “ललिता तुम लडकी रहोगी तो कठपुतली जैसी रहोगी. ना कुछ भावनाए होंगी, ना कोई अच्छा लाईफ. इससे अच्छा है जो तुम अंदर से हो, लडका बनो- आप खुद अपने आप से मिल गए ऐसा एहसास होगा” – यानं माझं आयुष्यच बदललं आणि मी ललिताचा ‘ललित’ झालो.” बीडचे पोलीस नाईक ललित साळवे सांगत होते. अक्षरश: चित्रपटात शोभावी अशी ललित साळवेंची ही कथा आहे. मुलगी म्हणून जन्म झाला, 29 वर्षे बाई म्हणून जगले,मनातून थोड्या पुरूषी भावना होत्या- पण आपण पुरूषच आहोत याची जाणीव व्हायला डॉक्टरांशी भेट व्हावी लागली. ललित साळवे म्हणजेच, आधीच्या ललिता साळवे या मूळच्या बीड तालुक्यातील माजलगावच्या. तेव्हा ते पोलिस खात्यात डिसिप्लीन विभागात महिला पोलीस म्हणून कार्यरत होते. त्यांच्या
Read Moreवाढदिवस, सण, अशा वेगवेगळ्या निमित्तानं आपण मजा करतो, खरेदी करतो. पण त्याचवेळेला समाजात अनेक अशी गरजू माणसंही असतात, ज्यांना दोन वेळेला पोट कसं भरावं, लेकराबाळांच्या शालेय साहित्याच्या गरजा कशा पूर्ण कराव्यात, तुटपुंज्या कमाईत कसं भागवावं असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर असतात. अनेक जण आपापल्या परीने अश्या गरजूंना मदत करतही असतात. पण कित्येकदा त्यात मदत घेणारा आपण ‘दान’ घेतोय, या भावनेनं अघडलेला असू शकतो, किंवा देणाऱ्याला आपण ‘दाता’ आहोत याचा किंचितसा का होईना अहंकार येऊ शकतो. अथवा काही वेळेला देणारी व्यक्ती समोरच्याची गरज काय आहे हे जाणून न घेता, त्याला काय द्यायला आवडतंय, परवडतंय अशाच वस्तू देते. ज्याचा समोरच्याला कधी कधी काहीच उपयोग नाही, असंही होऊ शकतं. माणसाची नेमकी गरज काय आहे, हे ओळखून मदतीचा हात दिला तर? तो सुद्धा आपण स्वत: पडद्याआड राहून? म्हणजे मग घेणाऱ्यालाही अवघडल्यागत होत नाही, आणि आपल्यातही ‘दान’ वगैरे केल्याचा अहंकार येत नाही. अगदी याच विचाराने ‘दान’ या संकल्पनेपेक्षा गरजू माणसांप्रति सदभावना बाळगीत, अनाम राहून आवश्यक ती छोटीशी मदत करण्याचा एक उपक्रम मुंबईच्या माधवीताई कुलकर्णी करत आहेत. माधवीताई मुंबई दूरदर्शनच्या निवृत्त अधिकारी. विलेपार्ले उपनगरात त्या हा छोटासा उपक्रम करतात. उपक्रम म्हणजे काय, तर पार्ल्यातील वर्षानुवर्षे ओळखीचा झालेला वडापावविक्रेता आणि स्टेशनरी दुकानदार यांना त्या दर तीन महिन्याला ठराविक रक्कम देतात. त्या विक्रेत्याला सांगितलेलं आहे की, “रोज तुमच्या दुकानावर
Read Moreजालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातली लालवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. याच शाळेत सावन शिकतो. सावन ११ वर्षांचा. लालवाडी गावातल्याच रामदास बारवाल यांचा मुलगा. गोष्ट साधारण दीड महिन्यांपूर्वीची म्हणजे २९ सप्टेंबरची. संध्याकाळची वेळ होती. सावन घरी अभ्यास करत होता. तोच त्याची बहीण भाग्यश्री धावतच आली. भाग्यश्री आणि शेजारची चौथीतली गौरी विहिरीवर पाणी आणायला गेल्या होत्या. विहीर ३५ फूट खोल आणि खडकाळ. विहिरीला पाणीही भरपूर. पाणी भरताना गौरीचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. ती बुडू लागली. भाग्यश्रीनं जोरजोरात आरडाओरडा केला, पण आजूबाजूला कोणी नव्हतं. मग तिनं लगेच घराकडे धाव घेतली. सावनला सांगितलं. कोणताही विचार न करता सावनने विहीर गाठली आणि पाण्यात उडी मारली. त्यानं गौरीच्या ड्रेसला पकडून विहिरीतला पाईप आणि मोटारीला धरून गौरीला विहिरीच्या कडेला आणलं. तोपर्यंत ही बातमी हा हा म्हणता गावात पसरली.गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत विहिरीच्या कडेला असलेल्या गौरी आणि सावनला बाहेर काढलं. भाग्यश्री आणि सावनमुळे गौरीचा जीव वाचला. सावनच्या धाडसाचं कौतुक करण्यासाठी लालवाडी ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. यावेळी बदनापूरचे गटशिक्षणाधिकारी नारायण कुमावत, शिक्षण विस्ताराधिकारी क्षीरसागर, केंद्रप्रमुख तथा दाभाडी बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी देशमुख, सरपंच सुनील घोरपडे, मुख्याध्यापिका एम. यू. पाटोळे, सहशिक्षिका डी. एम. जोंधळे उपस्थित होते. बदनापूर तहसीलचे तहसीलदार मुंडलोड यांनी सावनला बोलावून त्याचा सत्कार केला.बदनापूरच्या गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनीही सावन आणि त्याच्या आई- वडिलांचा कार्यालयात सत्कार केला. त्याला एक पुस्तक
Read Moreघरी कांदा चिरतांना आईच्या डोळ्यात टचकन पाणी का बरे आले असेल? या जिज्ञासेपोटी बीड तालुक्यातील कुर्ला जिल्हा परिषद शाळेचा बालवैज्ञानिक ओंकार शिंदे याला त्या दिवशी रात्रभर झोपच आली नव्हती. त्याने शाळेतील विज्ञान शिक्षकांच्या मदतीने आपल्यातील जिज्ञासू वृत्ती आणि बालवैज्ञानिक जागा ठेवून कांदा कापतांना डोळ्यात पाणी येऊच नये म्हणून स्मार्ट चाकू तयार केला. याच त्याच्या स्मार्ट चाकूने दिल्लीत दोन महिन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पारितोषिक मिळवून दिलं आहे. आता हा लहानगा बालवैज्ञानिक काही महिन्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जानेवारीमध्ये जपानमधील टोकीओ येथे जाणार आहे. विशेष म्हणजे आता भारत सरकारच्या नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनने त्याच्या स्टार्ट चाकूची पेटेंटसाठी नोंदणी केली आहे. पेटेंट मिळाल्यांनतर भविष्यात कमी वयातील मराठवाड्यातील पहिला शास्त्रज्ञ होणार आहे. दिल्ली येथील प्रगती मैदानावर सप्टेंबर महिन्यात यंदाचे राष्ट्रीय इन्स्पायर अॅवार्ड प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनासाठी देशभरातून ५ लाख ६७ हजार नावीन्यपूर्ण आयडिया आल्या होत्या. तर राज्य स्तरावरून राष्ट्रीय पातळीवर ५८५ नाविन्यपूर्ण आयडिया होत्या. त्यात या प्रदर्शनासाठी सुपर सिक्सटी आयडिया निवडण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील एकूण नऊ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पारितोषिक पटकावले असून त्यात सहावीत शिकणारा ओंकार शिंदे हा राष्ट्रीय पारितोषिक पटकावणारा सहावा विद्यार्थी ठरला आहे. त्याला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. ओंकारचे विज्ञान शिक्षक भाऊसाहेब राणे म्हणाले, की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलातही प्रचंड
Read More